Thursday, 11 December 2014

एका समुद्रापार

बऱ्याच दिवसात काही लिहिलं नव्हतं  आणि लिहिण्याची खुमखुमी काही स्वस्थ बसून देत नव्हती......इतक्यात भटकंती पण नव्हती झाली मग काय लिहा तर आपलं ओमानच्या स्थलांतराविषयी लिहू असं वाटलं  आणि लिहायला सुरवात केली ..... फार काही लिहिता येईल असं नव्हतं वाटला पण तरी बरच झालय बहुदा :) .... ओमान आणि आपल्यामध्ये (म्हणजे भारत) फक्त अरबी समुद्रच असल्याने एका समुद्रापार हे शीर्षक दिलंय.... 
तर ३1 ऑक्टोबरला माझं प्रस्थान होतं...हा हा म्हणता माझ्या प्रस्थानाचा दिवस उजाडला.....वाटलं होतं तेवढं हळूवार मन काही झालं नाही कारण शेवटच्या क्षणापर्यंत सामानाची बांधाबांध चालू  होती......विमान कंपनीने दिलेल्या मर्यादेत सामान बसवणे किती कठीण असतं याची तेव्हा कल्पना आली....कारण सगऴंच महत्वाचं वाटतं.....प्रायोरीटी ठरवता नाही आली की असं होतं न बहुतेकांच असं होत असावं ..... आणी माझी बायको म्हणते त्या शॅबी का काय शब्दाला ही जागायचे होतेच ना...... असो ...फोन तर थांबत नव्हते आणि त्या मुळे कामात व्यत्यय येत होता पण सदिच्छांचा अव्हेर करून कसे चालणार..... शेवटी कसंबसं मनासारखे आणि विमान कंपनीच्या मर्यादेत समान बसवलं...ह्यात माझा वाटा फक्त सामान उचलून वजन करण्यापुरताच बाकी सगळी करमत आमच्या सौंची :) ... हे सगळं होईस्तोवर काहीतरी खावून बाहेर पडायची वेळ झाली होती ..... माझ्यासाठी खास केलेल्या  बटाट्याची भाजी आणी पोळी चे घास कसेबसे खाल्ले (कारण बैचेनी फार वाढत होती..... साहजिकच  होतं म्हणा ..... एक सिक्युअर लाइफ सोडून अज्ञाताकडे चाललो होतो..... कितीही आत्मविश्वास असला तरी)
सगळेच येणार होते एअरपोर्टवर सोडायला..... म्हणून मोठी गाडी केली होती...... गाडीत बाकीच्यांच्या गप्पात सामील व्हायला तसदी घ्यावी लागत होती..... मधेच  आई आणि सासूबाईनी मिळून टोमणा मारलाच की सगळं सुरळीत चालू असताना काय हे मध्येच वगैरे पण मी ऐकून न ऐकल्यासारखं 
केलं     ........ त्यांचं ही बरोबर आहे म्हणा.....आपली माणसं आपल्या बरोबर असावीत असं वाटलं तर त्यात वावगं ते काय???
           एअरपोर्टवर  माझी बहिण,  तिचे सासरे  आणि माझी भाची तनूडी (तन्वी) आले होते...... बाहेर कोणी जात असले की येवढा लवाजमा लागतोच..... जाणारा एकटाच किंवा फार तर दोघे पण  सोडायला गाव ...... त्यामुळे थोडं इमोशनल व्हायला होतं पण ठीक आहे ...... जसं आत जायला निघालो तसा आईचा बांध फुटला.... माझा ही म बांध फुटायच्या बेतात होता पण कसंबसं सावरलं......माझा बोर्डींग पास मिळून लगेज चेक इन करेपर्यंत सगळ्यांना थांबायला सांगितले होते कारण सामान जास्त झालं तर जास्तीचं सामान काढून परत पाठवायला... पण आमच्या सौ आणि आमच्या आठवडाभराच्या मेहनतीला फळ आले होते.... एकदम परफेक्ट वजन झालं सामानाचं...... बाकी मग सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन फटाफट पार पडले...... दुपारचे फ्लाइट असल्याने काहीच गर्दी नव्हती ...... हे सोपस्कार आटपल्यावर मग भुकेची जाणीव झाली .. पिझ्झा हट चा पिझ्झा खाऊ म्हटलं.... भरपेट खाण्यात अर्थ नव्हता (अर्थ नव्हता असं नाही .... कमीत कमी अर्थात (अर्थातच) भागवायच होतं :) )  अस विमानात मिळणार च होतं आणि तेवढाच खिशाला चाट कमी ....


मग पिझ्झा हाण्ल्यावर T2  वारी करत होतो तेवढ्यात एका ओळखीतल्याचा  फोन आला.... माझ्या बहिणीच्या ओळखीतला आहे तो अन माझ्याच flight  ने ओमानला येणार होता....म्हणजे तो बराच काळ deputation वर इथे होता....त्याच्याशी बोर्डिंग गेट वर भेट अन ओळखीचा कार्यक्रम झाला आणि flight रिकामे असल्याने आम्ही शेजारीच बसलो ... तो ओमान विषयी सांगत होता आणि मला  जेवढे जमेल तेवढे जाणून घ्यायचे होते.... तशी बऱ्यापैकी माहिती मी काढलेली होती पण त्याने प्रत्यक्षात काही काळ व्यतीत केला असल्याने त्याचे ऐकणे जास्ती महत्वाचे होते.... विमानातील 'खानपान' (म्हणजे खान (खाणं) च फक्त) आस्वाद घेतल्यावर मला झोप येत होती पण अजून त्याचे सांगणे संपलेले नव्हते सो जांभया देत ऐकत होतो .... मध्ये त्याने service विषयी तक्रारीचे पत्र लिहायला घेतल्यावर झोपायचा प्रयत्न केला पण ते शक्य नाही झाले :) ... ३ तासांनी ओमानच्या भूमीवर आमचे विमान उतरल्यावर मला त्याची जास्ती मदत होणार होती immigration  आणि विसा stamping करून घ्यायला...ह्या गोष्टी फार नवीन नाहीत पण तरी हि कोणाची मदत होत असेल तर हवीहवीशी वाटतेच.....

आम्ही उतरल्यावर विसा फी भरल्याची पावती भरून विसा घ्यायचा होता आणि त्या खिडकीवर गेल्यावर हा कोणाला तरी हाक मारत धावत पुढे गेला... म्हटलं काय झालं ह्याला???.... मग ground staff  च्या वेशात असलेली एक अरेबिअन स्त्री समोर आली .... तिच्याशी त्याची बरीच चांगली ओळख होती आणि त्यामुळे त्याचा न त्या कृपेने माझं हि काम पटकन झालं... मग ह्याला त्या बाईला लग्नाचं आमंत्रण द्यायचं होतं.... मला अजून एक धक्का ... कारण ह्याचं लोकेशन मस्कत पासून सलाला म्हणून ११ तासावर (किंवा दुसर्या विमानानं जावा लागणाऱ्या ठिकाणी) होतं आणि म्हटलं जर मस्कत विमानतळावरून  बाहेरच नाही पडावा लागत तर ओळख कशी काय.... अजून तर धक्के पुढेच बसायचे होते..... त्याने मग त्या बाईला सांगितल,  मला लग्नाचं आमंत्रण द्यायचंय तुला (त्याचं लग्न होतं नोव्हेंबर मध्ये)... मग ती बाहेर आली आणि मग तिच्या पाया पडून तिला आमंत्रण दिलं आणि मग माझ्याशी ओळख करून दिली  ... मग कळलं त्याच्या पहिल्या visit  च्या वेळी त्याला काही प्रोब्लेम झाला होतं आणि तिने त्याला मदत केली होती आणि मग ओळख वाढून वाढून मैत्री झाली (मैत्रीला जात पात, वय , सत्र-पुरुष अशी काही बंधन नसतात - इति अगणित साहित्यिक आणि विचारवंत)... आणि जेव्हा तिच्या डोळ्यावर भारतात (हो इथले लोक medical treatment साठी भारतात येतात) शस्त्रक्रिया करायची होती तेव्हा ती ह्याच्याच घरी उतरली होती...  एकंदरीत जाणवलं आणि छान  वाटलं कि इथल्या लोकांच्या मनात हिंदूंविषयी अढी नाहीये आणि पुढे पण लोकांकडून कळत गेलं की हे लोक भारतीयांना मानतात

 मग सगळे सोपस्कार पार पडल्यावर बाहेर आलो तर माझे मित्र बाहेर वाट पाहत होते ...कंपनीचा माणूस अजून काही आला नव्हता पिकअपला...रूम म्हणजे guest house  ची चावी त्याच्याकडेच होती सो त्याची वाट  पाहणं गरजेच होतं .... तेवढ्या वेळात सीम कार्ड वगैरे घेतलं आणि तो माणूस आल्यावर आम्ही माझ्या रूम वर समान टाकलं आणि मित्राच्या (सायमन) घरी जेवणाच आमंत्रण होतं तिथे गेलो ..... जेवायला  जरा वेळ होता सो त्याने मला तिथल्या तिथे फिरवून आणलं... घरी आलो तर जेवायला पुरणपोळीचा बेत होता ... स्वप्नातही वाटलं नव्हतं की वाळवंटात पहिल्याच दिवशी मला पुरणपोळी मिळेल :)

सायमनने त्याच्या आईला ओमान फिरवायला आणल  होतं आणि दुसऱ्या दिवशी त्या भारतात परतणार होत्या .... म्हणून मिलिटरी मध्ये म्हणता तसा "बडा खाना" होतं....त्या जाणार म्हणून रात्री बिल्डिंग मधले अजून काही लोकं (आपटे आणि देशपांडे) कुटुंबीय त्यांना भेटायला आले (हे हि अप्रूपच की केरळी लोक भेटण्याआधी चक्क आपटे आणि देशपांडे भेटले).... ते पण  आधी जेकब्स मधेच होते म्हणून ओळखीचे होते... मग गप्पा वगैरे झाल्यावर सायमनने guest  house  वर सोडले ...

दुसऱ्या दिवशी सकाळी ११ ला उठलो ..... मस्त निवांत झोप लागली .....उठल्यावर चहाची सवय...माझ्याकडे चाह्चे काही सामान नव्हते आणि म त्यामुळे पुढच्या हालचालींना काही वेग येईना.. आणि हॉटेल हि माहित नव्हते .... मग शेजारीच एक पुनीत जैन माझ्यासारखाच नवीन joinee (पण त्याला २ आठवडे झाले होते) त्याने मला कॉफ्फी चे सामान दिलं आणि माझ्या दिवसाला सुरवात झाली.... dupari jevaycha काय करायचा हा प्रश्नच होता ... घरून आणलेले पराठे आणि सफरचंद खावून भगवा भगवी करावी का असं वाटत होता....म्हटलं संध्याकाळी हॉटेल बीटेल शोधू.... आणि परत सायमन धावून आला.... तो म्हणाला मी तुला घ्यायला येतो माझ्याकडेच जेवायला चाल....आणि दुपारच्याही जेवायची सोय झाली... मग तिथून आम्ही सुपर मार्केट मध्ये गेलो आणि जीवनावश्यक वस्तू म्हणजे चहा, साखर, मीठ , म्यागी, ब्रेड, दूध, पाणी , फळं, juices आणि लबान(ताकाला इथे लबान म्हणतात) घेऊन आलो .....साधारण आठवडाभराची तरतूद केली आणि मला रूम वर सोडून गेले.....


एकंदरीत परदेशात गेल्यावर कसे काय होणार ही  जी नाही म्हटले तरी धास्ती होती ती सायमनच्या मदतीमुळे बरीचशी निवळली .... आता मी बराचसा रुळलो आहे आणि आता माझ्या सौंना आणायच्या खटपटीत आहे....खाण्यापिण्याचे काही ही हाल झाले नाहीत आणि आफिसात बरयापैकी रेस्पोन्सीबिलीटी दिलीय...  फक्त अजून फार से फिरणे झाले नाहीये ....पण फिरेनच आणि पुढच्या ब्लोग ची लिंक आली की तुम्हालाही कळेल की आलाय भटक्या कुठेतरी भटकून..... तसे हि ते गाणे आहेच ना काहीतरी "फिरुनी नवी जन्मेन मी" ...तसे फिरुनी नवीन ब्लोग लिहीन मी :)

اشوفك تاني
Ashofak tany
(पुन्हा भेटूच)

Tuesday, 2 September 2014

सज्जनगड - 2

ll जय जय रघुवीर समर्थ ll

सज्जनगड २ म्हण्यापेक्षा सज्जनगड ४ जास्ती योग्य वाटले असते पण bagpackers बरोबर मी दुसऱ्यांदा सज्जनगड वर जात होतो म्हणून सज्जनगड २ हेच शीर्षक जास्ती समर्पक वाटले......हो सज्जनगडावर मी चवथ्यांदा जात होतो...कारण विचाराल तर प्रत्येकाची काही श्रद्धा स्थानं असतात आणि त्या ठिकाणी माणूस वेळात वेळ काढून वर्षातून एकदा का होईना जात असतो आणि सज्जनगडावरून दिसणारा निसर्ग (खास करून श्रावणात), तेथील प्रसन्न वातावरण हे माझ्या मते त्यावर श्रद्धा ठेवण्यास पुरेसे आहे. आणि कमी वाटल्यास बलोपासना आणि स्वयंशिस्तीचा पाठ देणारे तसेच साक्षात शिवाजी महाराजांचे गुरु/मार्गदर्शक रामदास स्वामी आहेतच..... तर सज्जनगड करायचा आणि सह्यपठार  आणि कोंकण ह्यांना जोडणाऱ्या असंख्य घाटांपैकी एका घाटातून खाली उतरायचे असा आमचा उपक्रम... ह्या घाटांचे पावसाळ्यातील सौंदर्य अगदी खास जाऊन अनुभवावे असे असते .......

ह्या वेळी फारसा विचार करायला वावच नव्हता अमेयला malaysia ला जावे लागले आणि मी  काम आणि काही घरगुती अडचणीत अडकलो होतो तरीही आम्ही ८ ऑगस्ट हि तारीख ठरवली... ह्या वेळी bagpackers मध्ये सुर्वे, डेडली झोपे आणि पाटील हे तीन नवे मेम्बर add झाले (तसे तर साधारण १४-१५ जन येणार होते पण ऐन वेळेची गळती...त्याला काही इलाज नाही) आणि धुरा हाती घेऊन फार आधीपासून दौऱ्याची सुनियोजित आखणी करायला लागले (म्हणजे tempo  traveller  ची चौकशी, खाण्या-राहण्या ची सोय वगैरे वगैरे) bagpackers चे founder  members  (म्हणजे अमेय आणि मी) अचंबित होऊन हा प्रकार पाहत होतो कारण आम्ही कधीच आधीपासून काही न ठरवता ठरल्या दिवशी bags  घेऊन मोकाट सुटतो .... पण आकस्मिक गळती मुळे ह्या सर्व गोष्टीच्या त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आणि  bagpackers च्या परंपरेला अनुसरून अमेय आणि आम्हीच काय ती थोडीफार रूपरेषा आखली... मी हो तर म्हणालो होतो पण मनाची तयारी होत नव्हती कारण घरी प्रोब्लेम होते आणि विचारलं ही नव्हतं पण अमेय ने "समर्थाचिया सेवका वक्र पाहे! असा भूमंडळी कोण आहे!!" असं सांगून हुरूप वाढवला आणि हो नाही करता करता निघायची तयारी झाली 

Bagpackers
ऐनवेळी आमचा भरवशाचा सदस्य प्रशांत बेंद्रे (ज्याच्या सहनशिलते विषयी  मागच्याच लेखात माहिती दिली गेलीय) आकस्मिक कारणामुळे गळला आणि सावत्या दुसऱ्या दिवशी येउन आम्हाला join होणार होता (bag packers  बरोबर येण्यासाठी सावत्याने त्याच्या department च्या पिकनिकलाही टांग दिली त्याबद्दल त्याचे आभार आणि त्या ग्रुप कडून त्याला शिव्या खाव्या लागू नयेत म्हणून आम्ही त्याचे येणे गौप्य ठेवले) ....शेवटी आम्ही ७ जणांनी (आणि शनिवारपासून पुढे  सावत्या असे ८ जण) आमच्या श्रद्धास्थानाकडे प्रस्थान केले ....शुक्रवारी रात्री टोनी दा धाबा वर जेवण हाणून मग निगडी ला अमेयकडे राहायचे ....दुसऱ्या दिवशी पांचगणी आणि अम्बेनळी घाट उतरून परत चढायचा आणि सज्जनगडावर मुक्काम आणि रविवारी सकाळी लवकर निघून दुपारपर्यंत रक्षाबंधनाला घरी असा सुटसुटीत प्रोग्राम ठरला ....

   ठरल्याप्रमाणे टोनी दा धाबाला थांबलो आणि u mumba चा  कबड्डीचा सामना पाहत पहिले रबडी - जिलेबी ची ओर्डर दिली आणि सुरवातच dessert पासून केली मग गुलाबजाम काय पनीर अंगारा काय आणि नोन-वेज वाल्यांची त्यांची सामिष भोजनाची ओर्डर काय ....खाण्याला काही सुमारच उरला नव्हता (तरी ह्या वेळी फ्रुट-पंच घेतला नाही)  .. आणि कदाचित आमची खा-खा पाहून u mumba चे खेळाडू ही सुस्तावले आणि जिंकणारा सामना बरोबरीत सोडवून बसले....टोनी दा धाबा कडून आम्ही अमेय च्या घरी आलो आणि आवराअवर करून पत्त्यांचा डाव रंगवला..........३ पत्ती खेळायचे ठरले आणि झोपे गुरुजींनी पुराणीकाला दीक्षा दिली आणि जुगाराचा डाव उत्तरोत्तर रंगत गेला...पहिलाच डाव मारणाऱ्या झोपे गुरुजीना नंतर काही नशिबाने साथ दिली नाही आणि सुरवातीला साथ न देणाऱ्या नशिबाने पुराणिकची साथ भैरवीपर्यंत काही सोडली नाही ....

कॉलेज नंतर बऱ्याच वर्षांनी रात्री जागून पत्त्यांचा डाव रंगवला होता आणि मजा पण  खूप येत होती पण सकाळी लवकर (??) निघायचे असल्याने रात्री २ ला आटोपते घेतले आणि शेवटचा डाव २ ला मांडला आणि अगदी फिल्म्स मध्ये दाखवतात तसे शेवटचा डाव कातील रंगला गुरु आणि शिष्या मध्ये.... पण शिष्याचा अनुभव कमी पडल्याने त्याला गुरुला रिकामे करता आले नाही .... झोपताना अजित  आणि स्वप्नील मध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगलेली आणि मजा ही येत होती कारण शुद्ध बाळ्बोधपणा आणि चतुरस्त्र उपमा अलंकार ह्यांच्यातला सामना काही औरच असतो :) ...कोणीतरी म्हणाले की ही  जुगलबंदी अजून बरीच रंगली आणि इतरांची हसून हसून पुरेवाट झाली  पण माझ्याच्याने आता काही जागरण होत नाही सो मला काही कळलेच नाही .....

समर्थांच्या दर्शनासाठी चाललेलो आम्ही त्यांनी घालून दिलेला स्वयंशिस्तीचा पाठ किती काटेकोरपणे पाळत होतो नाही ... एकदम मोजून मापून खाणे... वेळेत झोपणे - वेळेत उठणे  आणि सदाचार :)

सकाळी ३-४ जन सावत्याला आणायला चिंचवडला गेले आणि तिथपर्यंत आमच्यासारखे सूर्यवंशी तयारी करत होतो ...सावत्याच्या आगमने उत्सवी वातावरण पार शिगेला पोहोचले ....ठरल्याप्रमाणे वेळेतच प्रवासाला सुरवात झाली ... कात्रजचा टोल क्रॉस करून पुढे नाश्ता करावयास थांबलो आणि भरपेट मिसळ, साबुदाणा खिचडी, डोसा वर चहा, कॉफी हादडून घेतले आणि पुढे आंबेनळी घाटाकडे प्रस्थान केले .... खंबाटकी घाट, पसरणीचा घाट , वाई पार करत आम्ही पांचगणी जवळच्या भिलार धबधब्या जवळ आलो .... फार च अप्रतिम साईट आहे भिलारचा धबधबा .... फार उंचावरून म्हणजे साधारण ४५०० फूट उंचीवरून कोसळतो आणि निसर्गाचे तो मुक्त अविष्कार आपण साधारण त्याच उंचीवरून पलीकडच्या पठार  म्हणा रोड म्हणा किंवा टेकडी म्हणा तिथून अनुभवत असतो.....आणि पावसाळ्यात तर तो अगदी आवेगाने कोसळत होता ....आम्ही तिथे शिरस्त्याप्रमाणे फोटो काढले आणि पुढे मोराच्या केकावलीचा आवाज आल्याने कुठे मोर दिसतोय का पाहण्यास उतरलो आवाजाच्या दिशेने ....आमची चाहूल लागताच तो पुढे उडायचा आणि परत लांडोरीना सावध करायचा पण दिसत मात्र नव्हता..... आणि अचानक तो समोरून उडत पुढे खाली दरीत उतरला....अहाहा! काय अप्रतिम नजर होता ... आपल्या असाधारण अश्या पंखाचा पिसारा फुलवून उडणारा मोर पाहण्यासाठी भाग्यच असावे लागते बहुदा कारण अजून पर्यंत २-३ अभयारण्यात शेकडोंनी मोर पाहिले पण उडणारा मोर कधीच पहिला नव्हता .... तो क्षण मी कॅमेऱ्यात उतरवू नाही शकलो पण माझ्या स्मृतीत तो कायमचा कैद झालाय .... आणि जसे अजून जवळ गेलो बाकीच्या लांडोरही ४-५ असाव्यात मागोमाग उडत दरीत उतरल्या.... सावत्या महाराजांनी मोराचा आवाज काढत त्याला साद द्यायचा प्रयत्न केला पण निष्फळ ठरला... पहिल्यांदीच असे झाले असेल की आमच्या सावत्या महाराजांनी साद घातली आणि पक्षी-प्राणी त्यांच्या जवळ घुटमळले नाहीत  ....असो ... परत फोटोग्राफी केली आणि चहापान करून आम्ही माप्रो गार्डन कडे जावयास निघालो....माप्रो गार्डन मध्ये फक्त strawberry icecream खायचा प्लान होता पण जेवणाची वेळ झालीच होती आणि wooden  smoked pizza  आणि grilled  sandwitches पाहून आम्हास राहवले नाही गेले आणि पिझ्झा आणि sandwitch ओर्डर केले आणि एवढं सगळं झाल्यावर hot sizzling chocolate brownie must होतं....मग सगळ्यांनी घरच्यासाठी माप्रोमध्ये मनसोक्त शोप्पिंग केलं आणि आम्ही माप्रो गार्डनची धावती भेटही ....तिथले breads आणि पिझ्झा बेसेस hand made होते आणि म्हणूनच कदाचित फारच सुंदर लागत होते ...पांचगणीच्या वातावरणात सगळेच हरखून गेले ....धुंद ढगाळ पावसाळी असे रोमांटीक होते की सगळ्यांना जाणवून गेले की family picnic ही इथेच झाली पाहिजे .....मी पुढाकार घेऊन ऑक्टोबर मध्ये काढूया असे ठरवेल पण हे सगळे प्लान हवेतच विरतात हे माहितेय मला....






पांचगणीत माप्रो गार्डन मधेच येवढा उशीर झाला होता की आम्हाला अंबेनळी घाट उतरून पुन्हा येउन सज्जनगडावर जायला फारच उशीर झाला असता आणि कदाचित गडाचे दरवाजे बंद झाले असते .... आमच्यातल्या सामिष भोजन घेणार्यांचे जेवण आणि अजून व्हयाचे होते त्यांच्यासाठी सामिष जेवण मिळणाऱ्या धाब्याच्या शोधात पांचगणीकडे मोर्चा फिरवला ..... पांचगणीचे मला एकदम नॉर्थ कडल्या हिल स्टेशनशी साधर्म्य जाणवले आणि लोकांकडून ऐकलेले की बोर जागा आहे वगैरे  सगळे झूठ आहे असे वाटून गेले.... पांचगणी मला प्रथम दर्शनी तरी आवडून गेले आणि परत एकदा इथे यायचे असे मनोमन ठरवले ....













                                                            माप्रो गार्डन

 आमच्या non-veg खाणाऱ्या मित्रांनी धाबा शोधलाच आणि मनसोक्त चिकन हादडले ....आता आम्ही गडाकडे जाण्यास निघालो आणि वाटेत पारसी point ला थांबून खालच्या दरीचे मनसोक्त दर्शन घेतले आणि फोटोसेशन ही :) .... तिथे ईश्वर , बेटा, तारे झमीन पर, राजा हिंदुस्तानी आणि चेन्नई express चे शूट झालेले स्पोट बघायला मिळाले दुर्बिणी लावणाऱ्यान्कडून   :) ....सुर्वेनी त्यांच्या बालपणात सुलभ प्रवेश करून balling ची भारतीय आवृत्ती खेळून घेतली ... मग येतानाच मी harrison folley पाहून ठेवलेली आणि सगळ्यांना जायचा आग्रह केला....सुरवातीला फार कोणी तयार नव्हतं कारण  गडावर लवकर पोहोचायचं होता पणमी हट्ट धरून ठेवला न तिथे गेलो आणी नंतर तिथून  कोणाचा हि पाय च निघेना.... तुफान point आहे harrison folley ...स्वप्नीलच्या गाडीचा त्या पठारावर वारू उधळला आणि ८ च्या आकड्यात गाडी चालवायला लागला.... तिथेच विंचू, पैसा असे सरपटणारे प्राणी दिसल्यावर आमच्यातले steve irwin जागे झाले आणि त्या विंचवाचे एवढे फोटो काढले की त्याला रातोरात सुपरस्टार झाल्यासारखे वाटले असावे ..... वेळेच्या कमतरते अभावी आम्हास पाय काढता घ्यावा लागला नाहीतर तंबू ठोकून मुक्काम करावा अशी जागा आहे ती ....







 Harrison Folley & Parsi Point


मग मजल दरमजल करीत आम्ही एकदाचे सज्जनगडावर पोहोचलो.....चहापान केले आणि धर्माशालेतल्या खोल्यांचा ताबा घेतला .....सगळेच थकलेले असल्याने आरतीची आणि दासबोध पठणाची वेळ होवोस्तोवर सगळ्यांनी पाठ टेकवली .... पाटलाची जर थट्टा मस्करी चालू होती पण सज्जनगड  दातारांच्या विशेष श्रद्धेचा भाग असल्याने त्यांनी पाटलास  थोडे दमात घेऊन स्वतावर कंट्रोल ठेवण्यास सांगितले .... उगाच आपल्यामुळे गोंधळ उडून शांततेचा भंग नको व्हायला .... सुरवातीला म्हटल्याप्रमाणे सज्जनगड आहेच अप्रतिम आणि तेथील अध्यात्मिक वातावरणात तुमच्या मनास १ वेगळीच प्रसन्नता लाभते जी शब्दात नाही वर्णन करता येत!!!!
सज्जनगड महादरवाजा
....

मग आम्ही आरती चालू असताना उतरलो ...समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतले .....आणि प्रसादाचे जेवण जेवावयास आलो .... प्रसादाचे भोजन म्हणजे आमटी, भात आणि ताक ... पण त्याची चव काय वर्णावी ..... सज्जनगडावर येण्याचे हे ही एक कारण की तिथल्या अप्रतिम प्रसादाच्या जेवणाचा आस्वाद घ्याता यावा,.... एकदम सरळ , साधे आणि सात्विक ...छानच ....साधारणतः ते खूप आग्रह करतात पण ह्या वेळी घळीतून (शिवथरघळीतून) १ कुटुंब अचानक आणि उशिरा आले आणि त्यांच्या जेवणाचेही बघणे क्रमप्राप्त होते म्हणून त्यांनी फार आग्रह नाही केला तरी ही व्यवस्थित झाले...जेवण वाढत असताना रामनामाचे स्मरण केले जाते ते तर ऐकावयास खूप सुंदर वाटते ... खूपच तालासुरात आणि एवढे छान ऐकल्यावर जेवण का नाही गोड लागणार हो ....

समर्थांच्या मंदिरात खाली त्यांची समाधी ही आहे आणि मंदिराच्या बाजूस समर्थांच्या रोजच्या वापरात असलेल्या काही गोष्टी जतन केल्या आहेत  ज्यात त्यांची पाणी पिण्याची भांडी, त्यांना शिवरायांनी दिलेला पलंग, त्यांची शस्त्र अशा गोष्टींचा समावेश आहे ... इतर धार्मिक विधींबरोबर त्यांच्या समाधीस दररोज अभिषेक केला जातो ... त्या मंदिरात समर्थांची माहिती ....तसेच त्यांचे शिष्य कल्याणस्वामी आणि इतर काही शिष्यांची तसेच गडावरील महत्वाच्या प्रसंगाची छान  माहिती दिली आहे ... दुर्दैवाने आता दोन गट पडले असून दोन वेगवेगळ्या संस्था तिथे कार्यरत आहेत आणि त्यांच्यात समर्थांवरील हक्कासाठी भांडणं चालू आहेत .... समाधानाची बाब एवढीच की दोन्ही संस्था भक्तांना व्यवस्थित वागणूक देतात आणि त्यांची गैरसोय नाही होऊन देत  ,,, असो ....समर्थांच्या वापरातील वस्तू पाहूनच कळून चुकते की माणूस किती दणकट आणि कणखर असावा आणि बलोपासना त्यांनी नुसतीच सांगितली नाही तर स्वतः ही आचरणात आणलीय... बोले तैसा चाले म्हणूनच त्यांची वंदावी पाऊले.....

जेवण झाल्यावर आम्ही गडाच्या एका टोकास असलेल्या धाब्याच्या मारुतीच्या मंदिराकडे गेलो आणि मनोभावे मारुतीस्तोत्र म्हटले आणि थोडा वेळ गप्पा मारल्या .... धाब्याच्या मारुतीची स्थापना स्वतः समर्थांनी गडाच्या रक्षणासाठी केली आहे... हे गडाच्या टोकाला असल्याने फार निवांत जागा आहे .... मला विचारलं तर गडावरची माझी सगळ्यात आवडती जागा...आता रिमझिम पावसास सुरवात झाल्याने आम्हास हलणे क्रमप्राप्त होते ... आता खोली वर येउन पहुडलो आणि पटकन निद्रादेवीच्या स्वाधीन झालो कारण बऱ्याच जणांना काकड आरतीस जायचे होते ....
धाब्यावरचा  मारुती

सकाळी लवकर उठण्याशी माझं फारच सख्य असल्याने मी काकड आरतीस जाणं शक्यच नव्हतं.... सकाळी जाग आली तेव्हा पुराणिक काकड आरतीस जाऊन आला होता आणि त्याची चाहूल लागल्याने आमची झोप चाळवली गेली  आणि अमेय नाराज झाला होता कारण त्याला फार जायची इच्छा होती नि त्याला कोणीच उठवलं नव्हतं... सावत्या आणि डेडली दोघे ही गायब होते आणि नंतर कळलं की ते धाब्याच्या मारुतीवर जाऊन आले आणि तिथे भीमाशंकरच्या धुक्याचा आस्वाद घेतला तसेच गाणाऱ्या पक्ष्याचे गाणे ऐकले आणि प्रसन्नतेचl आस्वाद घेतला ज्यास आम्ही मुकलो ....




साधारण ७.३० पर्यंत आम्ही सगळे  तयार झालो आणि खाली चहा पिण्यास उतरलो ..... मग तिथेच नाश्ता करायचे ठरले .... मिसळ, उपमा आणि पोह्यांचा भरपेट नष्ट करून आम्ही परत धाब्यावरच्या मारुतीस जायला निघालो .... वर म्हटल्याप्रमाणे ती माझी आवडती जागा आहे आणि जे पहिल्यांदी आले होते त्यांना सकाळचे धाब्याच्या मारुतीवरून दिसणारे सौंदर्य दाखवायचे होते ... ..म्हटलं एकदा आलोय तर मन भरल्याशिवाय परत नाही जायचं.... तसे ही माझ्यासाठी बरीच emotional trip होती (कारण नंतर कळेलच किंवा ब्लोग पब्लिश होईस्तोवर कळलंच असेल)....पूर्वी धाब्यावरचा मारुती हे छोटेखानी जीर्ण झालेलं कौलारू मंदीर होतं... आता त्याला व्याय्व्स्थित बांधून, रंग रंगोटी करून जीर्णोद्धार करण्यात आलाय आणि डोंगराच्या कडेने चालताना समोरच  असलेल मंदीर अफलातूनच भासतं ... त्या landscaping च्या कोणी प्रेमात न पडलं तरच नवल ... तसेच त्या मंदिराच्या दोन बाजूस खोल दरी आणि एका बाजूस सुंदरसं धरण ....adbhutनजारा आणि दूरवर दिसणारा ठोसेघरचा धबधबा आणि ढगांचे म्हणजेच उन - सावलीचे खेळ  ....... एखाद्या कवीला ही हे वर्णायला शब्द सापडणार नाहीत ... तसच खाली पायाशी असणाऱ्या गावातले दिसणारे हिरव्यागार अशा  शेतांच्या मधोमध असणारे रंगरंगोटी केलेले मंदिर...मधूनच काळ्याभोर सडकेवरून  जाणारी लाल s.t.  ....हा सर्व कॅनवास काय वर्णावा ....आहाहा ....निसर्गाने रंगांची मुक्त उधळण केलीय असे वाटून जाणारा नजारा ..... मधूनच पक्ष्यांचा किलबिल... वेळ कसा निघून जातो कळतच नाही .... पण आता बहिणी घरी वाट पाहत असल्याने निघणे गरजेचे होते .... म समर्थांच्या समाधीचे, धाब्याचा मारुती न पेठेतला मारुती ह्या सर्वांचे दर्शन घेत आम्ही धर्माशालेतल्या आमच्या खोलीकडे परत आलो ....आमचे समान घेतले आणि परतीच्या प्रवासास सुरवात केली.....




दत्तगुरू (उर्फ सावत्या महाराज)


 सज्जनगड भवताल

 गडावर अजून ही बरीच पाहण्यासारखी काही ठिकाणे आहेत उदाहरणार्थ अंग्लाई देवीचे मंदिर, रामघळ, अशोकवन इत्यादी पण त्यांचे वर्नार्ण परत कधी तरी नाहीतर हा ब्लोग बराच लांबेल...




मग आता आम्ही सरळ पुण्याच्या वाटेस लागलो आणि साधारण १२.३० च्या सुमारास कुलकर्णी वडे वाल्यांकडे भोजनासाठी थांबा घेतला. ..., आम्ही भाजणीचे थालीपीठ आणि पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला तर इतरांनी मटणाचा आस्वाद घेतला आणि तिथून जे सुटलो ते थेट डोंबिवलीलाच थांबलो .....डेडली आणि अमेय दोघाही मात्तबर मंडळीनी १५०क्म/हर च्या स्पीड ने express way ला गाडी रेमटवली... पनवेल लागल्यावर सगळ्यांनाच जाणवले की परत आता नरकात चाललोय आणि त्याला काही इलाज नव्ह्ता (नंतरच्याच आठवड्यात मी गावाहून येत असताना गाडी पनवेल स्थानकात आल्या आल्या माझा चुलत भाऊ बोलला की आलो आता घाणीत परत ... ह्याचाच अर्थ कि शहरातलं आयुष्य  किती monotonus होत चाललंय आणि आपल्याकडे काहीही पर्याय नाहीये ते जगण्याशिवाय)... असो..पण आता आमच्या मनावर सज्जनगड आणि आजूबाजूच्या निसर्गाच्या सौंदर्याचा गारुड होतं जे आमच्या मनावर अजून काही दिवस राहणार होता आणि आमच्यासाठी पुढच्या पिकनिक पर्यंत टोनिक म्हणून काम करणार होतं...  आणि तसे वेळेत घरी पोहोचल्याने घराचे ही खुश असणार होते ..... भेटू लवकरच अशाच एखाद्या सहलीच वर्णन घेऊन  ... तोपर्यंत

                                                          II जय जय रघुवीर समर्थ II


पूर्ण फोटो (फक्त माझ्या कॅमेऱ्यातील) पाहण्यासाठी येथे क्लिक करा   :-

https://plus.google.com/photos/115038496210123492293/albums/6054513077283590945?authkey=COaTg6OE6rfITg

Saturday, 12 July 2014

कर्नाळा

कर्नाळा - माझ्या अगदी आवडीचा किल्ला ......
ह्या मार्च-एप्रिल मध्ये आमचे बरेच मनसुबे होते - वेळास, ताडोबा -अंधेरी व्याघ्रप्रकल्प , एखादा सागरी किल्ला वगैरे वगैरे........... पण ऑफिसमध्ये ही  बरीच कामं होती, घरी ही काही कामं होती अन अमेय हि मलेशिया ला गेला होता डेप्यूटेशन वर ............ अगदीच कुठे गेलो नाही असे व्हयला नको...bagpackers ला लांच्छनास्पद ठरले असते आणि क्षीण ही थोडा घालवायचा होता ....... मग मी प्रशांत बेंद्रे, अतुल सावत्या न अमोद असे जायचे ठरले ...बाकी कोणी कर्नाळ्याला एप्रिल च्या उन्हात येईल ही सुतराम शक्यता नव्हती......आमचे ही बरेच पर्याय चाचपून झाले खास करून प्रशांत बेंद्रे साठी (त्याची मानसिक तयारी होत नव्हती) बाकीच्यांचा प्रश्न नव्हता कारण अतुल काटक आहे, सावत्या obess असला तरी त्याच्यात उत्साह फार आहे न माझा ट्रेक शी फार संबंध राहिला नसला तरी हौसला अब भी बुलंद है :) .... अमोद ला कसे न्यायचे  हा प्रश्न होताच ....पण मला कर्नाळ्याला च जायचे असल्याने त्यांना तयार केले .....उन्हाची धास्ती होतीच बाकीच्यांना पण म्हटलं कि कर्नाळ्यायेवढी झाडी कुठे असणं शक्य नाही आणि वारा ही अफलातून असतो...कसे बसे तयार केले सगळ्यांना.........

कर्नाळाच का......... १ तर तो सगळ्यात जवळ आहे .............. २ माझ्या पक्षी निरीक्षणाचा आणि पक्ष्यांचे फोटो काढण्याचा नव्याने लागलेला छंद जोपासता आला असता आणि  कर्नाळा म्हणजेच लिंगोबाचा डोंगर ......जैत रे जैत ह्या चित्रपटातली मराठीतली काही अजरामर गाणी (जी माझी खूप आवडती आहेत) ज्या चित्रपटात आहेत त्याचे चित्रीकरण ही इथेच झालेय त्या मुळे  तो ही १ धागा जुळलाय ......माझे शिक्षण (डिग्री चे)  पेण म्हणजे ह्याच भागातले .........लग्नानंतर जोड्याने केलेला पहिला किल्ला असे एक ना अनेक धागे जुळले आहेत ह्या किल्लाय्शी ........पावसाळ्यात तर ह्याचे सौंदर्य अप्रतिम खुलते आणि वारा म्हणजे वारा असतो ....एवढा वारा मी फक्त eiffel  वर च अनुभवला आहे ................. नभ उतरू आलं म्हणा काय किंवा हिरव्या रानात चावड चावड चालती म्हणा काय हे शब्दशः इथे अनुभवता येते आणि ही गाणी माझ्या अविस्मरणीय अनुभवात नेहमीच साथ सांगत करत आली आहेत .........जस कि पेण ला पावसाळ्याच्या सुरवातीला (पेपरच्या मधल्या PL मध्ये) पेंडश्यांच्या वाड्यात राजू ने मस्त जैत रे जैत ची गाणी लावलेली असायची आणि खिडकीतून पाउस अनुभवात ती गाणी क्लास च वाटायची (अजून वाटतात) ....... रिलायंस मध्ये असताना बस मधून प्रवास करताना ह्या गाण्यांवर चर्चा व्हायची आणि संध्याकाळी परतताना पिकनिक सारखे वातावरण असायचे ....मोस्टली गाणी म्हणत  आम्ही यायचो आणि जीत रे जैत ची गाणी त्यात असायचीच .......असे कैक प्रसंग आहेत. .........फार च nostalgic झालो का????

तर शनिवारी सकाळी साधारण ७ ला निघायचे ठरले............सावत्या वगैरे अजून लवकर म्हणत होते पण फार लवकर उठणे मला काही जमत नाही.......सो परत ७ साठी सगळ्यांना convince केले.....शुक्रवारी च अमोद चा फोन आला कि त्याच्या सौ आजारी असल्याने त्याला यायला जमणार नाही (फेब. मध्येच त्याचं  लग्न झाल असल्याने तो  येईल असे वाटलं नव्हतं पण तो यायला हो म्हणाला हेच खूप होतं)........म आम्ही तिघं डोंबिवली वरून आणि अतुलला कळंबोलीला वाटेत बरोबर घेऊ असं ठरलं .........साधारण ७.३० ला आम्ही डोंबिवली सोडल्यावर अतुलला तयार राहा म्हणून फोन केला पण भाई नी उचललाच नाही ......आम्हाला वाटलं तयार होत असेल ......मग अजून १० मिनिटांनी केला परत उचलला नाही ........मग कळंबोली आल्यावर करू असे ठरले .......कळंबोली आल्यावर केला तरीही उचलेना......मग आम्ही फोन करण्याचा सपाटाच लावला. पण काही केल्या उचलेना मग आम्ही निष्कर्ष काढला की ह्याने कल्टी दिलीय .......मग आम्ही पुढे जाऊन पनवेलला नष्ट करण्यासाठी थांबलो ....माझा तर उपास  होता आणि ट्रेक करताना सहसा मी फार तेलकट खात नाही... बाकी दोघांनी नाश्ता आणि मी चहा पिउन पुढे जाण्यास निघालो ........... कर्नाळ्याला पोहोचतो न पोहोचतो तर अतुल चा फोन की अरे आत्ता उठलो अन मी येतोय म आम्ही तिघे च होतो म ठरवलं थांबू.....नसतो थांबलो तरी त्याने गाठलेच असते म्हणा आम्हाला ..............

कर्नाळ्याला एन्ट्री करताना तुम्हाला काही अनामत रक्कम भरावी लागते आणि तुमच्या कडचे प्लास्टिक किंवा तत्सम आधीच सांगावे लागते.......... येताना जर तुम्ही ते जसेच्या तसे आणले तरच अनामत रक्कम परत मिळते..........पैशांसाठी का होईना लोकं किल्ल्यावर आणि अभायरण्यात कचरा करत नाहीत ......... आपल्यासारख्या बेशिस्त देशाला अशा काही कठोर उपयानीच काही शिस्त लागली तर ...........थोडं वर चढून गेल्यावर पुढे गेस्ट रूम आणि महिला बचत समितीची खानावळ आहे तिथे काही पिंजरे आहेत ......त्या पिंजऱ्यात जंगलात सापडलेले जखमी पक्षी वगैरे उपचारासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी ठेवतात आणि एकदा का ते व्यवस्थित तंदुरुस्त झाले की म्हणे ते जंगलात सोडतात पण मला काही तसे वाटले नाही मला ते प्रदर्शनासाठीच ठेवले असावेत असे वाटले . पहिल्या २-३ पिंजऱ्यात वेगवेगळ्या जातीचे पोपट होते..........पुढे एका पिंजऱ्यात १ मोर होता आणि त्याच्या  पुढच्या पिंजऱ्यात मोर आणि लांडोर होते ....... त्या मोराने अचानक पिसारा फुलवला आणि नाचायला लागला .... आम्ही आजूबाजूला पपाहिले पण मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागला ह्याचे आश्चर्यच वाटले आणि आम्हास रेड कार्पेट वेलकम केल्यासारखे वाटू लागले....आणि मनुष्य स्वभावास अनुसरून बरेच फोटो ही काढले .......पण ही निव्वळ कवी कल्पना (पाउस पडायला लागला कि मोराचे नाचणे वगैरे) हे आम्हास ठाऊक आहे .....


तो मोर त्या लांडोरीला आकर्षित करण्यासाठी नाचत होता आणि ती लांडोर त्याच्याकडे ढुंकून हि पाहत नव्हती आणि सारखी त्या आधीच्या पिंजऱ्यात असलेल्या मोराकडे धाव घेई ...............इथे हि प्रेमाचा त्रिकोण पाहून आम्हास हसायला आले .......तेवढ्यात अतुल आला आणि मार्गक्रमणास सुरवात केली ... उन्हाचा तडाखा जाणवत च होता आणि पहिलाच १ चढ चढल्यावर प्रशांत बेंद्रे साहेबांनी ब्रेक ची आज्ञा केली ..... आता गड आम्हाला त्याच्याच चालीने चढायचा होता आणि त्यातून त्याचा पहिला ट्रेक........तिथे अतुलने आणलेला वडापाव खाण्याचा प्रोग्राम केला....
प्रशांत म्हणाला मी इथेच बसतो तुम्ही जाऊन या .......त्याला समजावून पुढे चालण्यास तयार केले.........फारशी गर्दी आणि trekkers नव्हते....जरा पुढे गेल्यावर १ बरयापैकी सपाट जागा होती आणि झाडी ही होती उन्हामुळे त्यांनी आपली पानं गाळून भार कमी केला होता तरीही शेंड्याकडे बरीच पानं होती ...आता मला पक्ष्यांची चाहूल लागली .....बरेच छोटे छोटे पक्षी , कोतवाल, सातभाई म रान चिमण्या ह्यांची वटवट चालू होती आणि तेवढ्यात एका हळद्याचे दर्शन झाले आणि माझा येण्याचा उद्देह्श सफल झाल्यासाखे वाटले सुरवातीलाच.......हळद्या चा पिवळा रंग काय वर्णावा ....तोडच नाही .....
हळद्या
बाकीचे सावलीत पुढे थांबले होते सो मला पण जाणे गरजेचे होते....आता एक मोठा चढ चढायचा होता जो चढला कि म फार काही चढण नव्हती ... मोकळा plateu च चालायचं होता ......पण हा चढ चढताना वाट लागणार ह्याची जाणीव होती आणि त्यात बरेच थांबे घ्यावे लागणार हे ही माहित होते ......त्या प्रशांत मध्ये उत्साह पेरण्याचे काम सावत्याने अंगावर घेतले होते आणि तो त्याचे काम चोख पार पडतोच....तो एकदा भूमिकेत शिरला की त्याला थोपवणे कठीण असते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ह्या चढणावर झाडी असल्याने उन आमच्यापर्यंत पोहोचत नव्हते ,,,,,,,,,,कर्नाळा आवडण्यामागचे हेच तर कारण आहे न भाऊ....पाहिजे तेव्हा पाहिजे त्या झाडाखाली पथारी पसरता येते .........

तो चढ चढल्यावर पुढे सपाटीच्या जागी शेड आणि बेंचेस बांधलेत विश्रांतीसाठी आणि हे बर्याच ठकाणी करण्यात आलंय.....हि नवीन development .....कदाचित डोंगरावर असलेल्या देवाच्या उत्सवासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी असावी ................. आता पाठीमागे रसायनी तिथून जाणारी कोंकण रेल्वे आणि रसायनी चा औद्योगिक विभाग स्पष्ट दिसत होतं....आता अजून एक चढ (पण मगाचच्या पेक्षा कमी) ती चढली कि सपाटीचा रस्ता आणि किल्ल्याच्या प्रवेशदाराशी असणाऱ्या पायथ्यांशी ........ती चढ एका दमात चढली आणि पुढे बांधलेल्या शेड मध्ये अंग टाकून दिला ....वारा ही होता छान आणि थंड वाटत होते ...गटागट   पाण्याच्या बाटल्या संपवल्या आता आणि पडून होतो कित्येक वेळ....थंड फरशीवर शेड खाली .... सावत्या म्हणाला आता कळले की कुत्री पाणवठ्याजवळ किंवा ओल्या जागी जीभ काढून का बसतात ...........कधीही त्याला काहीही उपमा सुचू शकतात .....तसाही कुत्र्यांचा न त्याचा फार जवळचा संबंध आहे .....दत्तगुरूंच्या पायाशीही एवढी कुत्री नसतात जेव्हढी सावत्याच्या पायाशी असतात (इति deadley ) ....

तिथून उठावेसे वाटत नव्हते पण आपले लक्ष्य पुढचे असल्याकारणाने पुढे जाणे गरजेचे होते ....किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच भव्य  लिंगोबा दिसतो (आमच्या अतुल ने मागच्याच आठवड्यात लिंगोबासर केला होता) आणि परत सर करूया का असा विचार आला पण नसते धाडस नको म्हणून तो विचार मनातच गिळला ....एका ट्रेकर चा लिंगोबा सर करतना अपघाती मृत्यू झाल्यानंतर तिथे चढाईस  बंदी आहे आणि वर चढताना दोरी वगैरे सामुग्रीही लागते ....आता आम्हास पाणी हवे होते आणि समोर  लिंगोबाच्या गुहेतील पाणी खराब होऊ नये म्हणून त्यावर जाळ्यांचे कव्हर टाकले होते ....ते उचकटावेसे वाटत नव्हते म्हणून अजून कुठे पाणी आहे का टाक्यांमध्ये ह्याची पाहणी करत आम्ही पाठच्या बाजूला आलो........

पाठच्या बाजूला थोडे traverse मारल्यावर आत गुहेमध्ये १ टाके आहे पाण्याचे  ...आणि पाठच्या बाजूला खूप शांत वाटत होते आणि भर उन्हाची वेळ असून ही अफलातून थंडगार वर वाहत होता ..... आणि मुख्य म्हणजे किल्ल्यावर आम्ही आणि अजून कुणी १-२ जन असतील फारतर ....पण पाणी थोडे आत गुहे मध्ये होते आणि थोडे traverse मारून जावे लागणार होते .... अतुल सराईत असल्यामुळे पटकन गेला आणि त्याने आमची तहान भागवण्याचे काम केले.....मग सावत्या  गेला.... प्रशांत आणि मी सुरवातीला गेलो नाही पण डर के आगे जीत है म्हणत मी हि गेलो ....पण प्रशांत काही आला नाही....त्या गुहेच्या (पाण्याच्या टाक्याच्या) तोंडाशी मस्त पाय टाकून आम्ही बसलो....एवढं  अफलातून वाटत होतं .......गुहेतलं म्हणजे टाक्यातल पाणी आत कातळ असल्यामुळे थंड होतं आणि वारा गुहेत जाऊन आतील थंड पाण्यामुळे अजून थंड येउन बाहेर परत येत होता ........ घरातला A C . झक मारेल त्या हवेपुढे.....आणि समोर नजर जाईल तेथवर कोकणचा भव्य मुलुख दिसत होता .......... कर्नाळ्याच महत्वच बोर घाटावर लक्ष ठेवण्यासाठी होतं जो कोंकण आणि विदर्भाला जोडतो .....सध्या आम्ही कोकणावर लक्ष ठेऊन होतो :)
हीच ती जागा जिथे a c ही झक मारेल 

बाजूलाच पानोरमा रिसोर्ट मध्ये DJ वर गाणी वाजत होती ....तिथे असणाऱ्या लोकांची आम्हाला कीव वाटली ......आम्ही थोडाच वेळ तिथे होतो पण प्रशांत एकटाच खाली असल्याने आम्हाला पटकन उतरणे भाग होते ...ते स्वर्गीय सुख मोडवत नव्हते पण प्रशांतने त्याच्या मानाने खूप धीर धरला आणि आता त्याच्या सहनशक्तीची आम्हाला कल्पना असल्याने पुढची स्तुती -सुमनं ऐकण्याआधी   आम्ही खाली उतरलो .....

आता परतीच्या मार्गाला लागणे भाग होते आणि आमच्या बरोबर आणलेला शिधा हि संपवावा अशी जाणीव झाली...प्रशांतने येता येता एक मोक्याची जागा पहिली होती....झाडांची सावली होती ...वारा अफलातून वाहत होताआणि खालची खोल दरी पण सुंदर भासत होती ..... तिथेचं जाऊन आम्ही निवांत पसरलो ......वेफर्स , मोसंबी असा माझा सात्विक आहार आणि उपास नसलेल्यांनी ब्रेड बटर आणि आम्लेट असा चौरस आहार करून आम्ही क्षुधा शांती केली आणि आता त्या झाडाखालीच निवांत पसरलो ....सावलीत खूप छान झोप लागली ....हे सुख घेण्यासाठीच तर कर्नाळ्याची निवड केली होती ....निवांत जागी कोणाची गडबड नाही , कोलाहल नाही .... अशा जागी झोप किंवा लोळत पडण्यास  किती मजा असते हे सांगून समजायचे नाही   ....
.काही ग्रुप जे देवीच्या दर्शनाला आले असावेत असे वाटले ते जाता जाता आमच्याकडे पाहून जायचे आणि त्यांची काही कुजबुज चालायची .....कदाचित हेवा च वाटत असेल आमचा त्यांना.....थोडा वेळ झाल्यावर आमचे अतिसाहानशील व्यक्तिमत्व प्रशांत ह्यांची चुळबुळ चालू झाली आणि आम्हाला आता निघावे लागेल ह्याचे संकेत मिळाले......आम्हास फार आश्चर्य वाटते कि देव नेमके patience कसे द्यायला विसरला .... एखाद्या ठिकाणी ह्यांना जाण्याची फार घाई असते आणि एकदा गेलो की  त्याचा मनसोक्त आस्वाद घ्यावा की  नाही पण ह्यांना फक्त त्या जागी गेलो ह्यातच समाधान असते आणि पोहोचलो त्या जागी की तेवढीच निघायची ही घाई ....... असो

वाटेत उतरत उतरत माझे पक्षी निरीक्षण चालूच होते आणि मला एक छोटा धनेश हि दिसला पण टिपता (म्हणजे कॅमेरा मध्ये) काही आला नाही ....वातावरण आता बरेच निवळले होते आणि पक्ष्यांचा मुक्त विहार चालू होता  पण ते फार आत झाडींमध्ये असल्याने माझ्या लेन्सेस पोहोचत नव्हत्या ..... आता पायथ्याच्या जवळ आलो होतो न आम्हाला काही प्रेमीयुगुल दिसले ....कॉलेज मधलीच पोरं  असतील ....आणि कर्नाळ्याचसारखी निवांत जागा त्यांना कुठे भेटणार होती प्रेमाच्या आणा-भाका  घ्यायला ...आम्ही त्यांना डिस्टर्ब न करता चालत होतो आणि काहीच अंतरावर २-३ जोड्या आमचीच वाट पाहत उभ्या होत्या....झाले असे होते कि ते उतरत असता त्यांच्या समोरच एक साप खाली पडला ..... झाडावरून की एखाद्या पक्ष्याने त्यास मारण्यासाठी वरून सोडून दिल्यामुळे कुणास ठाऊक पण पडला खरे.... आणि त्यामुळे ते घाबरले होते आणि कोणाची पुढे जाण्याची हिम्मत होईना....तो साप वरून पडल्याने अर्धमेला झाला होता आणि हाडं मोडल्याने हालचालपण करू शकत नव्हता .... सावत्या आणि अतुल ने पुढे होऊन त्याला रस्त्याच्या बाजूला केले आणि सगळ्यांचा मार्ग सुकर केला.....
 अर्धमेला झालेला साप

आत उतरून महिलाबाचत गटाची खानावळ आहे तिथे आलो आणि चहाची नितांत आवश्यकता जाणवायला लागली आणि माझ्या शरीरातली चहाची लेवल तर फार पटकन कमी होते :) ......पण बाकीच्यांच्या आग्रहामुळे 3-४ ग्लास लिंबू सरबत घेऊन ती कमतरता भरून काढली सर्वानीच .....मग पोटभर जेवण झाले नसल्याने अतुल ने जेवणाची ऑर्डर मग बराच वेळ होता म्हणून मी परत पक्षी निरीक्षणासाठी  गेलो आणि मला शिकारी बुलबुल चे काही चांगले फोटो मिळाले ....परत आलो तर बाकीचे तिघे मस्त चटई  वगैरे घालून वन-भोजनाचा आनंद घेत होते .....बटाट्याची भाजी आणि फोडणीचे वरण/आमटी (डाळ) फार च tempting वाटत होते .........पण माझा उपास :( ....

आता आम्ही उतरायच्या तयारीस लागलो होतो पण  तिथे पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या लोकांसाठी खास तयार केलेल्या मार्गिके वरून जायची हुक्की आली आणि बाकीच्यांना पुढे पाठवले .... थोडा वेळ मी फिरलो असेन नसेन म मला प्रशांत चा चेहरा आणि त्याची चल - बिचल आठवली आणि क्षणाचाही विचार न करता मागे फिरलो ...उगाच शिव्या कोण खाणार :) ...तरी नंतर कळलेच मला कि माझ्या नावाने गजर केलाच त्याने :) .....परत मगाचच्या मोराच्या पिंजर्याकडे   आलो ...तर तो मोर अजून ही पिसारा फुलवून नाचत होता आणि ती लांडोर शेजारच्या पिंजर्याकडे   अधीर झालेली ..... पण त्या मोराने त्या लांडोरीची निर्भया मात्र केली नव्हती ..... एकाच पिंजऱ्यात राहून ही... खरच आपण फक्तच शिक्षित झालोय पण प्राणीमात्र न शिकता सवरता सुशिक्षित आहेत हे जाणवून गेले .....असो

अतुल आम्हास आपट्या वरून नदीकिनार्या जवळून पनवेलला जाणारा जो रस्ता  जो तिथून जा असे सांगत होता पण प्रशांतचे patience आता संपलेले आणि घरचे वेध  लागलेले त्याला .......वाटेत त्याने चहा साठी पण गाडी थांबवली नाही ह्या वरून कल्पना यावी .....पण एकंदरीतच छानट्रेक झाला छोटासा आणि पुढच्या वेळी कर्नाळ्याला यायला कारण आहेच वन भोजनाचा आणि चविष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी   ..............
आता तर पावसाळा चालू झाला आहे आणि कर्नाळ्याने हिरवे गालिचे अंथरले असतील आमच्या स्वागतासाठी .....अगदीच कुठे जाणे नाही झाले तर कर्नाळा आहेच...अगदी हक्काच्या माणसासारखा...............

 फोटोसाठी इथे क्लिक करा

https://plus.google.com/photos/115038496210123492293/albums/6035177022458228129?authkey=CIin-Nqj8quAcA 

Sunday, 25 May 2014

JPL - 4

'नेमेचि येतो पावसाला' ह्या युक्ती प्रमाणे JPL हि आता दरवर्षी नेमेचि होतं आणि पावसाप्रमाणे आताशा आम्ही JPL ची हि वाट पाहतो .................. JPL म्हणजे आमच्या कंपनी ने टीम बिल्डिंग च्या नावाखाली सुरु केलेलं IPL च पायरेटेड वर्जन आहे आणि IPL प्रमाणे JPL ची लोकप्रियता दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे ..... यंदाचं JPL च चौथं वर्ष ....

साधारणतः JPL नेहमी डिसेंबर मध्ये आयोजित करण्यात येत (म्हणजे गेली ३ वर्ष) .....पण यंदा सर्व स्टेडीअम  काही न काही कारणाने बुक असल्याने ते फार म्हणजे एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आलं.....  ........... १२ संघ (आमच्या ऑफिस मधील प्रत्येक department  चा १ संघ) दरवर्षी भाग घेतात .......... पहिल्या वर्षी काहीशी वेगळी संकल्पना होती पण पुढे IPL प्रमाणेच त्या मध्ये हि सुधारणा घडवण्यात आल्या ......तर १२ संघामधले ६ विजयी संघ पुढे येतात त्या ६ संघामध्ये सामने खेळवण्यात येउन ३ संघ पुढे येतात आणि त्या ३ संघातील २ उत्कृष्ट NRR असणारे २ संघ अंतिम सामना खेळतात ..........असा आमचा छोटेखानी कार्यक्रम.... साधारण मार्च मध्ये JPL चे वारे पुन्हा वाहायला लागले

आमच्या piping department ची स्ट्रेंग्थ जास्ती असल्याने आमच्या मध्ये क्रिकेट खेळणारे जास्ती खेळाडू असतात आणि सहसा आम्ही फेवरीट असतो ........दुसऱ्या वर्षी आम्ही JPL जिंकलो होतो (अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मीच होतो बरं का)........... तिसऱ्या वर्षी सर्वाना संधी मिळावी ह्या उद्देशाने आम्ही चीत्ठ्या   टाकून संघ निवडला (त्यात माझ्या हि नावाची चिट्ठी आली होती पण माझा मोरोक्को/Paris दौरा असल्या कारणाने मला माघार घ्यावी लागली होती) ........... त्या वर्षी आम्हाला दुसऱ्या फेरीत च हार पत्करावी लागली होती.....मग ह्या वर्षी आम्ही पुन्हा आमची फुल स्ट्रेंग्थ टीम उतरवली....

पण ह्या वर्षी सर्व ऋतून्प्रमाणे उन्हाळा हि कडक आहे आणि ४ एप्रिल ला सामने खेळवण्यात येणार होते ... मी तर नाही नाहीच म्हणत होतो पण ऐन वेळी मला नाही म्हणता आले नाही .......... दुसरी गोष्ट अशी कि गेले दीड वर्ष न खेळल्याने आत्मविश्वास हि नव्हता पण आलिया भोगासे असावे सदर आणि क्रिकेट हे तसे हि passion आहे सो काय करणार ..... ऑफिसमध्ये खूप काम असल्याने प्र्याक्टीस ला हि जाता येत नव्हते  आणि बाकीच्या संघांनी जोरदार सराव चालवला होता ....

शेवटी २ दिवस आधी जे खेळाडू उपलब्ध असतील त्यांनी तरी सराव करा असा फतवा काढून आमच्या संघातील काही खेळाडूंनी सराव करायला सुरवात केली ..... त्या मध्ये एका फलंदाजाचा अंगठा दुखावला आणि त्याच्या सहभाग विषयी शंका उपलब्ध झाली (उन्हाळा असला कारणाने आणि  प्रवेश फी भरायची असल्याने १२ च खेळाडू निवडले होते आणि ऐन वेळी कोणी उपलब्ध होईल असे वाटत हि नव्हते) पण तो दुखापतग्रस्त असून हि खेळायला तयार झाला ..... (पहिल्या वर्षी JPL चा तोच सर्वोत्कृष्ट फलंदाज होता)............

JPL चा दिवस उजाडला आणि माझं  हेच चालू होतं कि बारावा खेळाडू म्हणून ठेवलं तर बरं आणि आमचा सामना हि नेमका १२ चाच होता म्हणजे उष्माघाताचीच शक्यता .................. पण आमच्या कर्णधाराने
strategy ठरवली आणि माझ्यावर opening ची च जवाबदारी टाकली (माझि आवडती जागा आहे ती) पण ह्या उन्हात?????

तर ४ एप्रिल ला आम्ही राजीव गांधी स्टेडीअम, खारघर इथे JPL - ४ जिंकायला सज्ज झालो.........पहिला सामना प्रदर्शनीय (४० वर्षावरील piping चे खेळाडू आणि उर्वरित jacobs चे ४० वर्षावरील खेळाडू) होता ८.३० ला .......... तेव्हाच सूर्याने आपली कमाल दाखवायला सुरवात केलेली ......stand मध्ये छताखाली /पंख्य्खाली बसून हि समोरची उष्णता जाणवत होती .....तो सामना चालू असे पर्यंत आम्ही breakfast / चहा वगैरे उरकला ........... तो सामना आमच्या ४० वर्षावरील piping च्या खेळाडूंनी गमावला ........


अजून हि स्टेडीअम वर फारशी गर्दी नव्हती ............. १२ संघाचे १२ असे १५० खेळाडू आणि इतर सर्व मिळून फार फार तर २२५ पर्यंत आकडा पोहोचला असता ............. एवढा मोठ्या प्रतिसादाची खचितच कोणी अपेक्षा केली नव्हती ............ उन होतं हे खरं आहे पण जर कोणी एवढा खर्च करून स्टेडीअम भाड्याने घेऊन खर्च करत असेल आणी १ जरा रोजच्या रुटिंगपेक्षा वेगळं काही अनुभवता येणार असेल तर काय हरकत आहे यायला ..............आमचा सावत्या म्हणालाच जर कि शनिवारी स्टेडीअम वर उपस्थिती लावली तर किमान अर्धा ओवर टाईम चा अलौन्स मिळेल असे सांगितले असते तर stand पूर्णतः भरला असता प्रेक्षकांनी ............ असो.

सिविल DEPARTMENT ची स्ट्रेंग्थ आमच्या खालोखाल असते आमच्या ऑफिस मध्ये ........आणी आमचा तसं त्यांच्याशी हाड वैर असतं  कारण त्यांच्या प्रत्येक DELAY च खापर आमच्यावर फोडतात आणी आमच्या कडून ते स्पून फीडिंग एक्स्पेक्ट करतात ........असे असले तरी काही जण त्यांच्या DEPARTMENT  आमचे चांगले मित्र आहेत जसा कि सावत्या ........... त्यांच्या DEPARTMENT चा सामना चालू होता आणि सावत्या (सिविल ची बेबी डॉल आम्ही ठेवलेलं टोपण नाव) पूर्ण जोशात त्यांना cheer up करत होता (जोशात बेबी डॉल जोशात नाचत होती) ........ त्याच्या cheer up च्या परिणामाने सिविल चा संघ आरामात जिंकला आणि त्यांचा कर्णधार रोहित शर्मा ह्याने JPL -४ चा पहिला षटकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केले...रोहित हा Indian team च्या रोहित प्रमाणेच शैलीदार फलंदाज आहे आणि त्याची फलंदाजी पाहायला मजा येते ...आणि तो jacobs च्या संघामध्ये असावयास हवा पण अंतर्गत राजकारणाचा तो बळी  ठरलाय आणि त्याला संघात जागा नाकारण्यात आलीय .........

इतरही काही सामने झाले त्यात प्रोसेसचा संघ (गतविजेता) पहिल्याच फेरीत बाद झाला. आणि आमच्या सामन्याची वेळ झाली ....आम्ही थोडे warm - up केले सामन्याधी ...आमचा सामना construction संघाशी होता .......... दर वेळी पहिल्या फेरीत आमची गाठ त्यांच्याशीच पडते............ तो बर्यापैकी कमकुवत संघ आहे......(ह्यास त्यांचे दुर्दैव म्हणावे कि आमचे सुदैव :) ............. आम्ही नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली ..........ठरल्याप्रमाणे मी आणि साई सलामीस उतरलो ........... फटकेबाजीच्या नादात आमचा साई पहिल्याच ओवर मध्ये बाद झाला ........ मग मी आणि अमय रानडे ह्यांनी सावध भागीदारी केली ........... short ball वर मी तुटून पडत होतो पण ball फक्त उंच जायचा फार लांब नाही जायचा ..........आम्ही २-२ ३-३ धावा घून धावफलक हलता ठेवला पण मोठे फटके काही लागत नव्हते ....सराव नसल्याकारणाने timing जुळत नव्हते.......... आणि असाच १ मोठा फटका खेळण्याच्या नादात अमेय यष्टीचीत झाला आणि आमचा कर्णधार संतोष हरुगडे फलंदाजीस आला (हा आमच्या jacobs संघाचा हि कर्णधार आहे आणि खूप चांगला गोलंदाज हि...त्याने आमच्या jacobs  च्या संघास २-३ trophies जिंकून दिल्यात) ........... ३ ओवर्स  संपता संपता आमची धावसंख्या साधारण ३५ वगैरे  होती........ आणि हि संख्या आम्हाला जिंकण्यास पुरेशी होती.............. चवथ्या ओवर ला सुरवात झाली आणि मी चेंडू मारला ........... short ball च होता आणि रेगुलर टच मध्ये असतो षटकार हि गेला असता पण तो मधेच पडला उंच जाऊन आणि आत्ता पर्यंत एवढा थकून गेलो होतो कि २ धावा पळणे हि जिकीरीचे झाले (सध्याच्या जीवनशैलीचे परिणाम) .....मग नाइलाजाने निवृत्त व्हायचा निर्णय घेतला ........... पण लोकांनी कौतुक केले (का ते कळले नाही ...माझ्या मनाप्रमाणे फलंदाजी नव्हती झाली) ..........मग आमच्या कर्णधाराने लागोपाठ खणखणीत षटकार लागून धावसंख्या ६० पर्यंत पोहोचवली आणि आता construction संघाचा डाव म्हणजे निव्वळ सोपस्कार राहिले होते.........आम्ही हि गोलंदाजीत प्रयोग करून पाहिले ..................मी हि जरा style मारण्यासाठी जरा dive वगैरे करून ball अडवला फिल्डिंग करताना आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जो यशस्वी झाला............... त्यांना आम्ही तिशी हि गाठू न देत ३२-३४ धावांच्या फरकाने सामना जिंकला ...............आता आमचा पुढचा सामना प्रोजेक्ट department शी होता...दुपारी २.३० वाजता 

प्रोजेक्ट च्या संघाने अनपेक्षितरित्या प्रबळ आणि गतविजेत्या प्रोसेस संघावर विजय मिळवला होता ..... त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणारच नव्हते आणि आता NRR हि १ घटक असणार होता पुढच्या फेरीत जाण्यासाठी.....

प्रोसेस संघाने ह्या वेळीही कसून सराव केला होता आणि व्यास्थित डावपेच हि रचले होते........ पण आमच्या ढवळे ची नेमकी १ ओवर महागात पडली (आम्ही डोंबिवली बसचे मेम्बर शनिवारी क्रिकेट खेळायचो तेव्हा ढवळेचा च पुढाकार असायचा .... पण चिडाचिडी फारच वाढल्याने क्रिकेट बंद पडले आणि ह्या वर्षी काही ढवळेने पुढकार घेतला नाही आणि त्या मुळे  ह्या वर्षी काही खेळलोच नव्हतो) ......साहजिकच ढवळेला चिडवायला आम्हाला मोकळे रान मिळाले आणि आम्ही चिडवत राहिलो कि दुसऱ्यांना टिप्स देत देत ढवळे स्वतासाठी टिप्स म्हणून ठेवलेल्या चीत्ठ्या वाचायला विसरला ....उदाहरणार्थ ऑफ च्या बाहेर चेंडू असला कि चिट्ठी उघडून पहायची कि कसा टोलवायचा ......... catch पकडताना ball च्या direction नुसार हात कसे असले पाहिजेत हे चिट्ठी उघडून पहायचे आणि मग कसा झेल घ्यायचा वगैरे वगैरे :)

प्रोजेक्ट ने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली न ४ ओवर्स मध्ये २६ धावांचे लक्ष्य ठेवले ......सलामीस ह्यावेळी माझ्याबरोबर अमेय रानडे आला ........... आमची सुरवात फार काही खास नव्हतीच .......दुसरया-तिसऱ्या चेंडू वर मला strike मिळाला आणि लेग च्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला bat लावून धावा वसूल करण्याच्या नादात फेन्ट एड्ज लागली न कीपर ने झेल पकडला पण फारसे कोणाला जाणवले नाही आणि महत्वाचे म्हणजे कोणी अपील हि नाही केले (कीपर सोडल्यास) म्हणून पंचानी wide ball घोषित केला (आपण काय गिली नाही स्वताहुन crease सोडायला :) )...........पुढच्या हि चेंडूवर असेच घडले आणि तो हि wide  मिळाला  ....... त्या षटकात पाच च धावा आल्या आणि अमेय ची विकेट हि ............ मग पुढच्या ओवर च्या पहिल्याच चेंडू वर चौकार वसूल केला , पुढच्या चेंडूवर स्क़्वेअर कट मारण्याच्या नादात उंच झेल उडाला पण तो क्षेत्ररक्षकाने रापला आणि १ wide  आणि २ धावा वसूल करून  पुढे ६ मारण्याच्या नादात झेलबाद झालो.... २ ओवर्स नंतर धावसंख्या १४ वगैरे होती..... NRR च्या दृष्टीने जास्तीत जास्त चेंडू राखून विजय मिळवणे गरजेचे होते... मग आमच्या कर्णधाराने सूत्र ताब्यात घेतली आणि १ षटकार मारला ....पुढच्या चेंडूवर paddle स्वीप च्या नादात चेंडू पायावर आदळला आणि पायचीत चे जोरदार अपील झाले आणि ते पंचानी फेटाळले आणि थोडा वेळ प्रोजेक्ट संघाने गोंधळ घातला कि पंच बायस्ड आहेत वगैरे............ पण असे काही नसते ....... आणि त्याच म्हणजे ३ र्या ओवर मधेच कर्णधाराने अजून षटकार लगावत सामना संपवला ..... NRR च्या दृष्टीने हि आम्ही सुस्थितीत होतो .... नंतर  प्रोजेक्ट department च्या head ने हि पंचांवर दोषारोप केले आणि वेगळीच कलाटणी मिळाली ,,,,,, माग्ग त्या चक्रम माणसाला बाहेर नेण्यात आले.......प्रोजेक्ट department चे मेन  इरले साहेब मात्र आम्हाला thums up करून त्या माणसाला घेऊन गेले .......... उगाच काही लोकं गालबोट लावतात त्यातला प्रकार ........(खिलाडूवृत्ती हा शब्द मी मुद्दाम नाही वापरात कारण मी हि ती दाखवली नवती हा हा हा )

मग उर्वरित दोन सामन्यांपैकी सिविल विरुद्ध instrument हा सामना बर्यापैकी रंगतदार झाला.......आम्ही सिविल ला पाठींबा करत होतो कारण त्यांच्या मध्ये असलेले आमचे मित्र .............रोहित आणि गुरु ह्या बिनीच्या फलंदाजांनी ४ षटकात ४२ धावांची अभेद्य आणि विक्रमी भागी केली ती हि instrument च्या नावाजलेल्या गोलंदाजी समोर (मागील वर्षीचे inst उपविजेते होते) पण गोलंदाजीत त्यांनी कच खाल्ली ..........झेल टाकले ......महत्वाचे म्हणजे रेवडेकर म्हणून jacobs चा नामांकित फलंदाज आहे त्याचे हि झेल टाकले....क्षेत्ररक्षण अगदीच गलथान केले ......... प्रेशर घेऊन खेळले ते उगाच......... नंतर गुरु ने एक कठीण झेल  घेऊन आणि गोलंदाजीत टिच्चून मारा करत सामन्यात काही रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला बट tht  was  २ late ....... instrument शेवटच्या षटकात जिंकल्याने आम्ही NRR मध्ये त्यांच्या पुढे होतो .... सावत्याच्या चेहऱ्यावर खिन्नता स्पष्ट दिसत होती ....... रोहित आणि गुरु हि फार च खिन्न झाले....पण काही उपाय नव्हता ......क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हेच् प्रकर्षाने पुढे आले
उर्वरित jacobs आणि FEG हा सामना रटाळ आणि एकतर्फी झाला आणि उर्वरित jacobs ने तो सहज जिंकला आणि NRR मध्ये ते प्रथम आले. ..... पण सगळे सामने वेळेत संपल्याने अचानक दुसरा आणि तिसरा संघ ह्यात २ षटकांचा सामना खेळवायचे ठरवण्यात आले म्हणजे आम्ही आणि Instrument .........

ह्या उन्हात अजून २ सामने आता आम्हाला खेळायचे होते (Instrument  बरोबर आम्ही जिंकू असा विश्वास होता) ..........आम्ही आधीच गर्भगळीत झालो होतो ....

Instrument बरोबर आम्ही नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली ............ संतोष रेवडेकरने विकास च्या पहिल्याच चेंडूवर jorkas फटका मारला आणि तो चेंडू माझ्याकडेच येताना दिसला........ मी स्वताला gather आणि calm केले आणि व्यवस्थित चेंडू खाली उभा राहिलो..........फारच वरती गेलेला ............आणि आता मी confidant होतो आणि आरामात झेल पकडला.......... आणि झेल पकडून ४-५ पावलं मागे गेलो आणि माझ्या सहकाऱ्यांच्या काळजात धस्स झाले.......पण नशिबाने मी थांबलो ....चेंडू ला किस केले आणि चेलेब्रतिओन मध्ये चेंडू उंच उडवत धावत सुटलो (नंतर पंचानी सांगितले अजून २ पावलं पाठी गेला असता तर सीमारेषा पार केली असती न त्यांना ६ मिळाली असती आणि  ह्या गोष्टीची मला जाणीव च नव्हती) (हा झेल लवकरच you tube  वर upload  करण्यात येईल   ) ..........सर्व खेळाडू खूप उत्साहात  hi - 5 देण्यासाठी धावत आले कारण पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट मिळाली होती आणि सामना जिंकण्याच्या दृष्टीने आम्ही पहिले पाउल टाकले होते ..ते षटक मग उत्कृष्ट पडले ...फक्त ४ च्याच धावा गेल्या ........पुढच्या षटकात जरा जास्ती म्हणजे ८ धावा गेल्या आणि आम्हाला जिंकण्यास १३ धावांची गरज होती .......... ह्या वेळी साई आणि दिनेश सलामीस गेले आणि पहिल्या ३ चेंडूतच ८ धावा लुटल्या .........मग साई आणि दिनेश बाद झाले आणि संतोष अन मी crease वर होतो .............संतोष ने चुकीचा call दिल्याने मी हि धावचीत झालो आणि जरा प्रेशर आले पण आम्ही सामना जिंकण्यात यश मिळवले


आता आम्ही आणि underdogs उर्वरित jacobs  ह्यांच्यात अंतिम सामना होणार होता (Piping  मध्ये स्थान न मिळालेले काही खेळाडू उर्वरित jacobs मधून खेळत होते) .....आमच्याच विजयाची सर्वाना खात्री होती.......नाणेफेक जिंकून आम्ही पुन्हा गोलंदाजी घेतली ......मग protocall म्हणून मान्यवरांना दोन्ही संघातील खेळाडूंची ओळख करून देण्यात आली आणि त्यांनी आम्हाला चांगले खेळा म्हणून शुभेचा दिल्या .........

त्यांच्यात १ संतोष म्हणून खेळाडू त्यांच्या विजयाचा शिल्पकार होता..............तोच सलामीला आला आणि त्याने विकास महाडिक ला प्रेशर मध्ये आणले आणि एरवी ३-४ धावा देणाऱ्या विकास ने चक्क ११ धावा दिल्या ............अलीने जरा बरे षटक टाकले पण शेवटच्या चेंडूवर चौकार दिलाच .......बाकी संतोष आणि अनिकेत अम्या ची हि फार उत्कृष्ट गोलंदाजी झाली नाही .......... आमचे क्षेत्ररक्षण हि थोडे गलथान झाले नाही म्हणायला आम्ही थोडी चपळता दाखवून २ खेळाडू धावबाद केले पण तेवढेच .............. त्यांनी ४ षटकात आम्हाला ३७ धावांचे लक्ष्य दिले  ..........

ह्या वेळी आम्ही विकी (पहिल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फलंदाज) अन दिनेश गुरव ह्यांना सलामीला  पाठवले कारण आधीच आम्ही लागोपाठ दुसरा सामना खेळत होतो आणि आम्ही सकाळ पासून धावून फार थकलो होतो सो डावपेचात बदल करून आम्ही पाठी जायचे असे ठरले ......... मला वाटत होते कि सलामीस जावे पण संघासाठी मी काही बोललो नाही आणि शरीर आता साथ देईल ह्याची खात्री नव्हती ......... पहिलेच त्यांचे षटक उत्कृष्ट पडले ....... फक्त ५ च धावा आल्या ............ विकी ला तर connect करणे हि जमेना ............गुरव ने चांगले फटके मारले पण त्यांनी चांगले क्षेत्र रक्षण करत चौकार नाही जाऊ दिले .............दुसऱ्या षटकात गुरव , साई पाठोपाठ बाद झाले.......... विकी अजून हि connect करत नव्हता आणि आम्ही त्याला परत बोलावत होतो तर तो यायला हि तयार नव्हता अजून १ ball अजून १ ball असेच चालू होते त्याचे........ शेवटी आम्ही त्याला परत बोलावलेच पण तो पर्यंत उशीर झाला होता आणि २ षटकात आमच्या जेमतेम १२ धावा झाल्या होत्या आणि आम्हाला २५ धावांची गरज होती अजून १२ चेंडूत .......... तिसऱ्या षटकात संतोष हि बाद झाला आणि मी आणि अमेय मैदानावर होतो तेव्हा आम्हास ९ चेंडूत २१ ध्वांची गरज होती ........... पण तो हि बाद झाला       अन पुढच्या चेंडूवर केदार मुलीक हि ...............आम्ही धाव फलक हलता ठेवला पण आता मोठ्या फटक्यांची गरज होती अन किती हि ताणून मारला तरी चेंडू ३० मीटर पुढे जात नव्हता ......तेवढ्यात आम्हाला दिलेले स्टेडीअम ची वेळ संपली आणि लोकल पोर दादगिरी करून आत घुसत होती पण त्यांना सुरवातीला प्रेमाने आणि मग थोडा धाक दाखवून त्यान शांत केले ...........शेवटचे षटक फक्त औपचारिक होते कारण आम्हास १६ धावांची आवश्यकता होती आणि आमच्यातील उर्जा पाहता ६ चेंडूत ६  धावा करणे हि सुद्धा achievement  वाटत होती  ........... रोहित सामना संपल्यावर बोलला ही कि मक्या तू अजून १ ball अजून खेळला असता तर मैदानात च बेशुद्ध पडला असता .......वास्तविक ही अतिशयोक्ती होती पण आमच्या अवस्थेचे यथार्थ वर्णन करणारी प्रतिक्रिया होती ......... मग बक्षीस समारंभ पार पडला अन आम्हास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले......... कॉलेज  पासून पहिल्यांदाच माझा सहभाग असणारा अंतिम सामना हरण्याची वेळ अली होती....थोडे वाईट वाटत होते पण its part n parcel of the game .........तरी ही आमच्या पराभवास इतर मंडळी थकव्यास  कारणीभूत धरत होती वास्तविक पाहता उर्वरित jacobs ह्यांनी निर्विवाद पाने आमच्या पेक्षा सरस खेळ केला होता आणि ते विजयास पात्र  होते  :)

दुर्दैवाने विकी जशी इंनिंग खेळला तशीच इंनिंग युवराज श्रीलंकेविरुद्ध दुसरयादिवशी खेळला आणि विकी ला सोमवारी सगळ्यांनी Piping  चा युवराज म्हणत चिडवून हैराण केलं..........

अशा रीतीने अजून १ उनाड दिवस JPL ४ च्या रूपाने कारणी लागला ............... नंतर चे ३-४ दिवस हातपाय खूप दुखत होते पण कोणास सांगण्याची सोय नव्हती कारण जवाबदार आम्हासच धरण्यात आले असते  ..........जात जाता ह्या ठिकाणी सावंत साहेबांचे आभार न विसरता मानावे लागतील कारण त्यांनी भेदभाव न बाळगता शेवटपर्यंत आम्हास (आदरार्थी १ वचन) आणि आमच्या संघास शेवट पर्यंत नाचून आणि ओरडून प्रोत्साहन दिले ...............

आता पुन्हा पुढील वर्षी आमचे गेलेले विजेतेपद मिळवण्यासाठी JPL - ५ ची उत्साहाने वात पाहत आहोत फक्त १ च प्राथना कि ह्या वर्षी डिसेंबर मध्ये JPL व्हावी................

Saturday, 12 April 2014

वेळासचा खास वेळ

आज सकाळी नियमाप्रमाणे ऑफिसला जाताना fb बघत असता १ notification आले.......शिखरवेध चे वेळास च्या कासव महोत्सवासाठी आयोजित केलेल्या सहलीचे ......... आणि वेळास ला आम्ही शिखरवेध तर्फे च दिलेल्या भेटीचे सुखद २-३ दिवस तरळून गेले आणि असह्य उकाड्यात अचानक आलेल्या वाऱ्याच्या गार झुळूकेमुळे जी प्रसन्नता जाणवते तशी प्रसन्नता जाणवली....मन भूतकाळातील  वेळास च्या सुखद आठवणीत कधी रमून गेले न बस ऑफिस च्या दाराशी कधी उभी राहिली कळलेच नाही...............

वेळास हा डेडली म्हणतो त्या प्रमाणे माझ्या काळजाचा ठोका आहे (मी फक्त २-३ दिवस तिथे घालवून हि वेळास ची भुरळ पडली आहे) आणि 'का' हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्या कारणाने मी सुरवाती  पासून च सुरवात करतो ....

 वेळास च्या कासव महोत्सव उर्फ turtle festival बाबत फार आधीपासून वाचले होते आणि मनात त्याबाबत उत्सुकता होती पण माझ्या मित्र-मंडळींमध्ये त्या बाबत अनभिन्यता होती ....मग तर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता ............ वेळास आणि महाराष्ट्राच्या काही समुद्रकिनाऱ्यावर olive  ridley  जातीची कासवे साधारण डिसेंबर च्या सुमारास अंडी घालण्यासाठी येतात .......आणि समुद्रकिनारी घरटे करून अंडी घालून निघून जातात ........सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण चे कार्यकर्ते तेथील ग्रामस्थांच्या मदतीने त्या अंड्यांचे जतन आणि संवर्धन करतात आणि साधारण मार्च-एप्रिल च्या सुमारास त्या अंड्यातून कासवाची पिल्ले बाहेर येऊ लागतात आणि आपल्या जीवन प्रवासास उर्फ सागरी सफरीस सुरवात करतात .......ह्या olive  ridley जातीच्या कासवांचे वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या किनाऱ्यावर  मादी ने जन्म घेतलेला असतो त्याच  किनाऱ्यावर  ती मादी अंडी घालण्यासाठी येते ....... १ दिवसाचं पिल्लू जे अथांग सागरात जीवन प्रवासास सुरवात करते .......ते साधारण अचूक त्याच किनारयावर प्रसुतीस कसे येते हे विज्ञानाला  न उकललेलं कोडं आहे..........

तर गौरव ने शिखर वेध च्या शेड्युल मध्ये वेळास असल्याचे सांगितले न तो तिथे जाणार असल्याचे बोलला. मला तर फार जायचे होते सो मी लगेच तयार झालो पण कठीण होते आमच्या सौ. ना तयार करणे .........कसे बसे तिला तयार केले आणि ती हि नाईलाजास्तव तयार झाली .......आमच्याच ऑफिसचे अजून दोघे विश्वेश न संदीप सातपुते हि अचानक यायला तयार झाले....
पण म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न त्याप्रमाणे जायच्या आधी दोन दिवस आम्हास (आदरार्थी एकवचन) ताप आला (कि झाला कोणास ठाऊक) आणि 'घरच्यांची भुणभुण सुरु झाली कि जाण्याचे काही अडलेय का'....'विकनेस आहे तर आराम करावा' एक ना हजार ........पण मी हि जाण्याचे ठरवलेच होते सो त्यांच्या किरकिरी कडे फार से लक्ष दिले नाही .......... आणि शुक्रवार उजाडण्याची वाट पाहत राहिलो ......शिखर वेध ची बस आम्हाला कांजुरमार्ग स्टेशन बाहेर flyover वर पकडायची होती ११.३० च्या सुमारास....पण बस किमान पाऊन तास उशिरा आणि डासांनी  उच्छाद मांडलेला (ह्या परिस्थितीत मला किती शाब्दिक मार सहन करावा लागला असेल हे जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला वेगळे सांगायला नको) ......१२.१५-१२.३० च्या सुमारास बस आली नि मी सुटकेचा निश्वास सोडला .......रात्रीचा प्रवास असल्याने झोपेतच गेला आणि सकाळी ६.१५ च्या सुमारास आम्ही वेळास ला पोहोचलो श्री. प्रकाश जोशींच्या घरी...... त्यांच्या कडे आमची भोजन आणि निवासाची सोय करण्या आली होती..........अजून उजाडायचे होते, त्या मुळे आजूबाजूला काय आहे काही जाणवत नव्हते .........आम्ही जरा स्थिर स्थावर झालो....चहा घेतला आणि उजाडण्याची वाट पाहत होतो............

जोश्यांचा वाडा

साधारण 8.00-8.30 वाजता आम्ही वेलास च्या बीच वर गेलो आणि  SNM च्या कार्यकर्त्यांनी संवर्धन केलेल्या घरट्यान्मधल्या १३-१५ अंड्यामधून इवल्याश्या जीवiनी जन्म घेतल्याचे सांगितले आणि साधारण पाण्यापासून १०० फूट अंतरावरून त्या कासवांना त्यांच्या पुढील प्रवाशासाठी समुद्राच्या दिशेने मुक्त केले ...........त्यांना थेट समुद्रात न सोडता किनाऱ्यावरून चालत सोडण्यामागे वैज्ञानिक कारण असे कि त्यामुळे भू चुंबकीय क्षेत्र  का काय त्यांच्या मेंदूत ठसते आणि पुढे विणी च्या वेळेस ते ह्याच किनाऱ्यावर येतात :)  ............. छान प्रसन्न वातावरणात आम्ही त्यांच्या जीवन प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या ......... आणि SNM च्या कार्यकर्त्यांचे कौतुक कि हे सर्व अगदी शिस्तीत काही हि गडबड गोंधळ न होऊ देता पार पडले .........म हे पार पडल्यावर आम्ही ६ जणांनी  (४ जेकबाइटस, गौरव चा मित्र आणि कल्पिता) त्या मस्त लोनली बीच वर खूप TP केला ... फोटो सेशन पार पडले......अगदी कंटाळा येईस्तोवर  आम्ही तिथे होतो आणि पहिल्यांदीच जाणीव झाले कि समुद्रावर मजा येण्यासाठी भिजणे काही गरजेचे नाहीये ..........नंतर आम्ही परत जोश्यांच्या वाड्यावर आलो नाश्ता केला आणि शुचिर्भूत झालो .......मग मोकळा वेळ होता जेवणा पर्यंत .......... म काही जण  आराम करत मागे राहिले आणि आम्ही तिथून बाणकोट च्या किल्ल्यावर प्रस्थान केलं

बाणकोट चा किल्ला म्हणजे सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला आहे त्या किल्ल्याबाबत इतिहासाला फारसे ज्ञात नाही पण आदिलशाही- पोर्तुगिस असे करत कान्होजी अंग्रे ह्यांनी तो ताब्यात घेतला...,, फारसा प्रसिद्ध नसलेल्या ह्या किल्ल्यावरील बुरुज आणि दरवाजा मात्र बऱ्यापैकी चांगल्या परिस्थितीत आहेत .........निवांत असलेल्या ह्या किल्ल्यावरून समुद्राचा अप्रतिम देखावा दिसतो   ... हा किल्ला पाहिला कि DCH मधल्या किल्ले aguada ची आठवण येते ........ आम्ही किल्ला पूर्ण फिरून घेतला आणि मग किल्यावर मनसोक्त फोटो सेशन करून घेतले विश्वेश कडून :) ...... येताना उन असल्याने आम्ही बाणकोट च्या बाजारपेठेकडून किल्ल्यापर्यंत रिक्षा केली होती....... जाताना मात्र उतरत जाण्याचे ठरवले...... आणि shortcut पकडला.......मध्ये जरा चुकल्यासारखे वाटले मात्र तसाच मार्ग  काढत काढत आम्ही बाणकोट - वेळास च्या रस्त्याला लागलो......हा रस्ता अप्रतिम आहे समुद्राच्या बाजूने अगदी शांत असा .......येताना आम्ही ह्या रस्त्याने चालत च आलो होतो ......जाताना हि चालत जाण्याचा विचार होता पण एक महामंडळाची  गाडी (s t ) येताना दिसली आणि उन्हाचे का चाला म्हणून s t ने वेळास पर्यंत आलो............s t  मध्ये बरीच शाळकरी मुले होती ......बहुदा शाळा सुटली असावी.....त्यांची मजा मजा चालली होती..आणि आम्ही हि त्यांच्या गप्पा ऐकून मजा घेत होतो....... येताना आम्ही नाना फडन्विसंच्या समाधीचे दर्शन घेतले .... नाना फडणवीस हे पेशवाइ तील प्रसिद्ध सचिव........ त्यांचे जन्म गाव वेळास.   तिथेच देवळाच्या बाजूला त्यांची समाधी आहे ..........एकंदरीत छोटासा पण फार छान ट्रेक झाला..........मग आम्ही शिखर वेध च्या सहप्रवाशांबरोबर गप्पा मारत बसलो..........एव्हाना जेवणाची वेळ झालीच होती
जोश्यांनी जेवणाची फार उत्तम व्यवस्था केली होती.......... त्यांच्या अंगणात केळीच्या पानावर सात्विक घरगुती जेवण .......... आ हा हा ..........अप्रतीम....... त्या दुपारी साधारण १०० पानं उठली असतील...शिखर वेध चे ३० आणि इतर हि ग्रुप असे ...........आणि जेवणानंतर मस्त ताक.......आता झोपणं गरजेचंच होतं.............एक जागा पकडून आम्ही पथाऱ्या पसरल्या .....गौरव ची किरकिर चालू होती....घोरनार्यांच्या बाजूला नको वगैरे पण पर्याय नव्हता  .........छान शांत झोपून ४ -४.३० च्या सुमारास उठलो तर गौरव न त्याचा मित्र गायब .......... चहा पिउन आम्ही गौरव ला फोन केला तर तेवढ्यात तो हि आलाच  आणि आम्हा घोरनार्यांच्या नावाने शंख करून मोकळा झाला...... पण आम्ही दुर्लक्ष केले कारण किती हि म्हटला तरी ती प्रतिक्षिप्त क्रिया आणि विक्षिप्त माणसाला आम्ही काय समजावणार :) ....

संध्याकाळी हि कासवांची पिल्ल पाण्यात सोडण्याचा प्रोग्राम होता पण आम्ही बाणकोट च्या रस्त्याने जाणे पसंत केलं....आम्ही ६ जन ...........४ jacobites ....... कल्पिता न गौरव चा मित्र ............बाणकोट चा रस्ता आधी च वर्णन केल्याप्रमाणे समुद्राला लागून च बांधला आहे....थोडा पुढे गेल्यावर साधारण खडकाळ जागा बघून आम्ही तिथे थांबलो लाटा पायावर घेत ....अप्रतिम वातावरण होता....सुर्य  अस्ताला चाललेला आणि छान  वारा वाहत होता आणि महत्वाचा म्हणजे रस्त्यावर अजिबात वर्दळ नव्हती....मस्त फोटो सेशन झालं....गप्पा , मस्करी न गोस्सिपिंग.......वेळ कसा गेला कळलच नाही..........मी घालवलेल्या काही अविस्मरणीय evening पैकी एक ..... शब्दात वर्णन कारण अशक्य....

गावात आलो तर वीज नव्हती.........गावात येताना जागोजागी शंकासूर दिसले........होळी जवळ आली कि कोंकणात लोक शंकासुराच्या वेशात फिरायला लागतात आणि घराघरासमोर जाऊन गाणी वगैरे म्हणतात सुपारीच्या रुपात काही मिळेल ह्या आशेने ......आम्ही त्या शंकासुरासोबत हि फोटो काढले........... s . t. stand वर आम्ही वडा पाव खाल्ला न कडक चहा घेऊन जोश्यांकडे निघालो.... गावात वीज नव्हतीच ......... प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेला पांगला होता ........काही गाणी म्हणून , काही जण अंताक्षरी खेळून तर काही जण टिंगल टवाळ्या करून वेळ घालवत होते ......शेजारच्या वाड्यात आलेल्या पाव्हणे मंडळीनी त्या शंकासुराना बोलावून घेतले न त्यांच्या कडून गाणी म्हणवून घेऊन न नाचून घेऊन स्वताची करमणूक करून घेत होते ......... तो मला बाल मजुरीचा च प्रकार वाटला पण पिकनिक ला आल्यावर पर्त्येक गोष्टीचा विचार करून चालत नाही असे समजावले स्वतःला आणि बाकीच्यान्प्रमाणे त्या शंकासुरांचे चाले बघत विजेची वाट पाहत होतो 

अजून जेवायला बराच वेळ होता... तेवढ्यात वीज आली न सह्याद्री निसर्ग मित्र तर्फे गावच्या देवळात त्यांच्या संस्थेची माहिती देणारी आणि त्यांनी हाती घेतलेल्या प्रोजेक्ट्स ची माहिती देणारी फिल्म दाखवण्यात आली...त्यात गिधाडांचे संरक्षण न संवर्धन, समुद्री घारीच्या घरट्याचे संरक्षण आणि संवर्धन आदि प्रोजेक्ट सध्या चालू आहेत...(अधिक माहिती साठी इथे क्लीच्क करा http://www.snmcpn.org/)..............छान माहिती मिळाली आणि आपल्याला हि त्यात काही हातभार लावता आला तर बरे असे वाटून गेले....... पण नेहमीच्या गदारोळीत ह्या सगळ्या गोष्टी मागे पडतात आणि त्याला काही पर्याय हि नसतो....पण कोणी न कोणी काही निमित्ताने निसर्ग संवर्धनाचे काम करतोय विशेषतः इतर समाज निसर्ग ओरबाडत असताना ह्याचे समाधान वाटते.......

रात्रीचे जेवण हि पंगत मांडून च केळीच्या पानावर आणि अफलातून च होते..... मस्त वदनी कवळ घेतां म्हणून पंगतीला सुरवात झाली....छानच वाटले..जेवण हि अप्रतिम च होते न शेवटी मस्त घुसळलेले  ताक.......शेवटचे ताक पिताना आमच्या गौरव ने थोडा गोंधळ घातला म्हणजे त्याने वाटी ऐवजी पेल्यात घेतले तर जोशींनी ऐकून दाखवले कि पेला घासताना त्रास होतो वगैरे म्हणून आम्ही वाटीत देतो आणि ओशट पण भांड्याचा आता  कोण काढणार .... आम्ही गौरव म्हटले च कि तू आता सगळीच भांडी घासून दे.... जेवण झाल्यावर आम्ही ४-५ जण s t stand जवळ च्या मंदिरात गेलो...आमच्या सौ. झोपल्या होत्या सो आता जिभेला लगाम लावायची आवश्यकता नव्हती  :)  ........ बराच वेळ निरथर्क गप्पा आणि गोसीप चालू होते...मग डोळे पेंगायला लागले आणि मग परत जोश्यांच्या वाड्याकडे परतलो...
  
 झोपण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे बांधलेल्या guest house कम घरात व्यवस्था करण्यात आली होती... गौरव माझ्या आणि संदीप सातपुतेच्या शेजारी झोपण्यास तयार नवता (घोरणे हे १मेव कारण) त्याने त्यासाठी बरेच प्रयत्न केले पण जगदीश ने त्यास दाद नाही दिली..... शेजारच्या रूम मध्ये दोन मुली अजून जागेवर आल्या नवत्या म्हणून गौरव ने तिथे जाऊन जागा पकडण्याचा प्रयत्न  केला आणि आमच्या इथे झोपावे लागत नसल्यामुळे खुश होऊन celebration वगैरे केले .... पण नशीब त्याची साथ द्यायला तयार नवते ........त्या मुली आल्या च आणि गौरव ला तिथून हाकलण्यात आले आणि शेवटी आमच्या शेजारीच येउन त्याला पथारी पसरायला लागली.....आणि त्या नंतर चा अर्धा तास आम्ही फक्त हसत होतो ....आणि तो हेल्पलेस चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होता.......... त्या एका रात्रीत सातपुते प्रसिद्ध झाला...........शेरा या नावाने .............. तुम्ही चतुर असाल तर तुम्ही ओळखलेच असेल..........नाही तर शेवटी मी सांगेन च....
दुसऱ्यादिवशी प्रात: सकाळी उठून चहा नाश्ता आटोपून परत बीच वर गेलो छोट्याश्या पिल्लांच्या प्रवासास शुभेच्छा  देण्यासाठी......... आणि आज सकाळी तर ८०+ छोट्या olive ridleys नि जीवन प्रवासास सुरवात केली ............रविवार असल्याने बऱ्यापैकी गर्दी हि होती ........तरी हि सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध रीतीने वेळेत पार पडला आणि मुख्य म्हणजे ह्या सोहळ्याचा आनंद व्यवस्थित सगळ्यांना मनसोक्त रीतीने दृश्य डोळ्यात, कॅमेऱ्यात साठवून घेता आला .......(तुम्ही हि हा आनंद ह्या लिंक वर पाहू शकता http://youtu.be/bmTzwfHeyAQ ) .............

आज अजून हरिहरेश्वर ला हि जायचे असल्याने फार वेळ न दवडता प्रस्थान केले...........बाणकोट खडीवरून बस सकट आम्ही लौंच मधून आम्ही खाडी पार करून हरिहरेश्वर ला पोहोचलो...  तिथे काळ भैरवाचे चे दर्शन घेऊन प्रदक्षिणा मार्गावर आलो....  हरिहरेश्वर ला तुम्ही गेला असाल तर घळीतून  दिणारे समुद्राचे दर्शन तर अप्रतिम च आहे....तिथे खूप group फोटो सेशन करण्यात आले........... बरीच लोकं समुद्रावर खेळ खेळण्यात मग्न होती....आम्हाला भूक लागली होती ...तसेही आज दुपारचे जेवण सहलीच्या खर्चात नवते.....प्रत्येकाच्या आवडी निवडी नुसार घ्यायचे होते..........आम्ही थोडकेच शाकाहारी आमच्या साठी खानावळ शोधली आणि उदर भरणाचेनित्य कर्म करून घेतले......... एक एक जण मग हळू हळू बस जवळ येत गेला आणि आम्ही साधारण ३ च्या सुमारास परतीच्य प्रवासास  सुरवात केली...  खर्च अपेक्षेपेक्षा कमी  झाल्या असल्याने बहुदा जगदीश उर्फ जग्गू ने संध्याकाळचा नाश्ता हि आम्हास त्याच्या तर्फे दिला......साधारण ७ च्या सुमारास आम्ही पनवेल आणि ८.३०-८.४५ पर्यंत घरी पोहोचलो...
वेळास चे ते २ दिवस आज इतक्या वर्षांनी हि जसेच्या तसे आठवत आहेत..............त्या जागेने मनात कायमचे घर केले आहे............. ते पूर्णतः commercial  होण्याआधी प्रत्येकाने किमान एकदा तरी भेट द्यावयास हवी ..............

 वेळास सहलीचे फोटो इथे पाहावेत https://plus.google.com/photos/109764916559690377798/albums/5716462368131516225?authkey=COyn3vOHvaT1-wE



कळावे

लोभ असावा हि विनंती

ता. क. :- ब्लॉग लिहायला सुरवात केली तेव्हा वेळास ला जायचे आमचे ठरलेच होते पण अमेय ला अचानक साईट वर जावे लागल्याने आणि माझी हि मधल्या काळात अतिशय धावपळ झाल्याने ते हवेतच विरले.......... ते म्हणतात त्याप्रमाणे "There is always next time " ......... पुढच्यावेळी.........

Saturday, 15 February 2014

Raigad Trip



Venue - Rangoli (Where it all started)
JACOBS Dombivli bus members gathered for a usual get together n as usual somebody for some reason were treating us ;)..... We the group of 8 have just completed Road trip to Sajjangad-Shivthar Ghal via warandha ghat  n topic of discussion was of course the beauty of nature during India's best season i.e. Monsoon.

Mr. Surve suddenly got excited n decided our bus group will go for Raigad Trail on following weekend of Anant Chaturdashi n as per him just after the monsoon is the Best season to visit Raigad.... Everybody thrilled n immediately agreed. (How they cannot be as our bus group is planning Picnic 4 last 5 yrs. n the suddenly dream was coming true).

Prashant Patil who is generally coordinator for all parties was travelling to Rajasthan for a family outing so he handed over the batten to Mr. Surve for coordinating n for room booking immediately in the week to follow..He was convinced n wanted to take adv. Of wind to cover as much ground as possible before ppl getting time to rethink n change their mind.....

But, he forgot the past n also forgot the topic was discussed when flight of most of them was soaring high.....

I started to follow up with Mr. Surve in the following week but his response was like...'will do it tomorrow'...'rooms will be available' .... 'Do nt worry'.. 'I will go in person on nxt weekend n will book rooms' etc.etc..... I realized it’s not goin to happen n I ditched thoughts...But Ameya the Rider was keen n asked me 2  do it ourselves if nobody comes....

 Then planning started n decided to do it with family (Last trip's experience was crucial to have this dimension.))...... Initially 13 members were ready n accordingly 5 rooms were booked m considering it was trail cum trek its luxury.... But as the date neared like happened to every trip few members get dropped due to 'UNAVOIDABLE REASON' n gravity was such that 3 of them dropped on the mrng itself... Finally we 8 shatranjs travelled n we had a room in spare..... 

Finally the day arrived n we 8 shatranjs (6 jacobites, my wife n frnd) started Raigad trail on sat. Mrng n no 1 from bus grp who all initiated this  was accompanying us.... We picked Atul @ Mangaon (the Zurich of Konkan) near Rhine river (i.e. Kal nadi which is formed in Raigad range).... The journey was beautiful as ever.... Throughout lush greenery for which Konkan is famous n rainy atmosphere n nice company made it more beautiful....


We rchd the base @ around 11-11:30 & buttermilk vendors welcomed by forcefully selling buttermilk n curd.... 'Bhau ghya na' ....'Bhavani kara na'... 'Tumhi tichyakadun ghetala ata mazyakadun pan faksta 1 glass ghya na'...are few of the tricks to sell it....This was just beginning of the trouble n we were nt aware of more to come from this vendors.....

We 'Climbed' it in  record time of 15 min. (Thanks to Rope Way)..... As we were getting up we started entering in the clouds.... It’s just like we were entering the Heaven... Like Pandavas...we've beaten them by 2 in numbers though.....
                                                               8 Shatranj's
As we reached the top buttermilk vendors again caught us n we smhow managed to escape....The atms. was too pleasant n we were amidst the cloud....The glimpses of beautiful sonaki N terada kind of wild flowers were giving the hints of the Beauty of Raigad which we've cm to see.....
We checked in @ MTDC and gathered at MTDC canteen in half n hours’ time for Delicious 'Gad Special Pithala Bhakri'... Unfortunately grp of 70 occupied the canteen n it means we had to wait longer.... In the meanwhile we visited Balekilla, Rajdarbar, ashtapradhan Wade, Ranyanche Mahal n all ruined places... The sonaki n terada on ruined walls of the palaces  n other buidings pleased us by giving feeling of 'Navnirman' (This navnirman is not related to Krishnakunj but rebirth).....
 Sonaki
Terada ....... (This Dog seem to be chosen 1 as he always spotted to seat at this throne amidst flowers)
After we came bk to canteen where Bhakari Pithala awaited us n आम्ही आडवा हात मारला (For this sentence there is no synonym in English ;) ) .....Sawtya thought of sleeping for a while after such a heavy stuff bt we wanted to do Bhavani Tok by this evening itself n clock was ticking n weather was though awesome its too foggy to see anything clearly of nxt 15ft or so....

We covered Nagarkhana, Throne of Shivaji Maharaja, Holicha maal n Bajarpeth n started towards Jagdishwar Mandir.... There are two changes which I observed since my last visit.... They have placed statue of Maharaj in Meghdambari which looks good but now they have covered statue on Holicha Maal with Chatra cum Meghdambari which has ruined its beauty.....Also, the photographer are denied to take their fav. Photograph of Sunrise wherein sun while rising touches the feet of Maharaj.....I have yet to see  better sun rise than that of Raigad in my life.....
                                                                       
 Holicha Maal
(This new meghdambari ruined its beauty.....photographers must be cursing as the legenndary photo wherein Sun touches photo of Shivaji can not be taken now)
 The Hindu King

 Nagarkhana


At Jagdishwar, we came across some youths who were amazed to see tomb of Shri Chatrapati....Few moments later they started irritating us by posing against board indicating King's Tomb n giving Rock On Poses in front of tomb.... We felt sorry 4 them as they were nt aware what they were doing n left that palace n headed towards Bhavani Tok....
                                                                     
 Beautiful jagdishwar Mandir


Maharajanchi Samadhi

The small trek to Bhavani Tok was amazing with Kal i.e. Rhine River n Lingana on left n ridge of Potlyacha Dongar (this ridge played a crucial part ruining the Raigad during the attacks of British bt Jithe Manasech gaddar tithe gad, durga tari kaay karnar).....
 The Beautiful Kal River i.e. Rhine of Konkan :)
The Ever Challenging Lingana
After reaching Bhavani Tok we wanted to visit bhavanicha Khalaga n guhechi jaga....some of us stopped @ there itself due to sleepery n steep route which was bit danger..There is no point Visisting Raigad w/o being at Bhavani Tok....The Bhavani Tok where even Hawks do nt dare to fly is amazing place...just being there one can bring kms. N kms. of area under watch n any minute movement of enemies can be tracked n alert the entire troop in advance....

 Bhavanichaicha Khalaga @ Bhavani Tok

We didn't spend much time though intended as the rain clouds began to gather n rain would have caused return path to become more dangerous.... We come back rested 4 a while on plateau n returned to MTDC ....For entire afternoon we were amidst the cloud n sun even didn't took the stage...

Again we met at canteen n enjoyed the dinner with some melodious song n dance at canteenfire /canteen verandah of group of 70s ....

Luckily we escape the Jalus n c of everybody to meet nxt morning.... The wind at Night was such strong that we feared the roof will get blow away.....

We get up early in the mrng... still Raigad was covered by fog n to see sun rising to background of Holicha Maal is impossible.....Then we marched for Takmak Tok from which the sentenced prisoners were thrown to death....This is nt only the reason it is famous for but also for the pleasant wind & breathtaking view ....sawtya the grand entertainer tweeted 'जर कडेलोटाची शिक्षा झालेला माणूस खरोखर रसिक असेल तर तो सांगेल कि पोत्याला  डोळ्याच्या jagi  भोक पाडा म्हणजे मरताना तरी निसर्गाचा आस्वाद घेऊन मरीन'





'.....how true is that.... The wind were blowing the fog cont. N we were experirncing hide n seek of sun with base ....its quite an experience....The beds of sonaki  n terada along the  takmok Tok n all along the plateau added to the beuaty.....we spent hours there n were still nt satisfied......But we had to left as some of us promised to be home before 3 PM.....We wanted to see Wagh darwaza as well bt guide said u'll nt able to see anything due to fog.....

We left with happiest memories evern  feeling of being to heaven n goin bk to earth......

Still theirs is unfinished business with Raigad of watching sunrise n visiting Wagh Darwaza.... Another reason to b there.....


पावसाळ्या नंतर रायगड खरोखरच आपलं भव्य आणि दुर्गम हे रूप  पालटून   पहिलत करणी सारखा मोहरून  जातो    एकदम  सुंदर  भासू  लागतो ....

जाता जाता सावत्या :- ताक विक्रेते जेव्हा सकाळी सकाळी हि ताकाच्या मागे लागले तेव्हा  उद्विग्नपणे सावत्याने टोला हाणला कि गाई-म्हशी दुधाच्या ऐवजी direct  ताक देतात कि  काय????