माझ्या डोक्यात भिगवण चं घोळत च होतं २००७ पासून पण कोणी साथीदार मिळत नव्हता पण आता आमचा group फॉर्म झाला होता सो काळजी नव्हती .....पण गळती हि ठरलेलीच असते ........अमोद च लग्न तोंडावर आल्याने त्याला विचारण्यात अर्थ नव्हता ......दातार सध्या silent मोड मध्ये आहेत ...अजित, सोट्या ह्यांची अशीच काही कारणे न 'भरवश्याच्या म्हशीला टोणगा' ह्या प्रमाणे सावत्या ने हि कल्टी द्यायचे मनावर घेतले होते (म्हशीच्याच संदर्भातली म्हण सावत्या ला perfect लागू होऊ शकते......उभ्या महाराष्ट्रात पु. ल. नंतर म्हैस कोणी प्रसिद्ध केली असेल तर सावत्याने)........एक वेळ तर अशी होती कि ह्याही वर्षी जन शक्य होईल अशी चिन्ह नव्हती ,......अमेय ने पण सांगितले कि कोणी नाही तर आपण दोघे तरी जाऊच......तू मनसोक्त फोटो काढ न मी मनसोक्त गाडी चालवून घेतो .........असे करत कार्य आम्ही ४ जन अमेय, प्रशांत मी न अतुल असे जाण्यास सज्ज जाहलो :)
शनिवारी सकाळी प्रस्थान केले आणि आश्चर्य म्हणजे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर फार गर्दी नवती न टोल प्लाझा हि रिकामाच होता.....प्रवास हि सुखकर च होता (अपवाद पुणे आणि हडपसर ची वाहतूक वर्दळ) ....घरून च नाश्ता करून निघाल्यामुळे फार काही ब्रेंक नाहीच घ्यावा लागला......फक्त Jacobs Standard प्रमाणे जेवणाची वेळ सांभाळत आम्ही हडपसर पार केल्यावर हॉटेल गाठले न क्षुधा शांती केली (त्याच हॉटेल मध्ये एका शिक्क्षकाच्या निवृत्ती निमित्त मेजवानी चालू होती न सर्व शिक्षकांनी ते हॉटेल भरले होते....मुळात शिक्षकांकडे xuv न duster वगैरे गाड्या बघून आम्ही हैराण झालो कारण शिक्षक म्हणजे मुकी बिचारी कुणी हाका अशीच प्रतिमा माध्यमातून निर्माण झालीय न मुकी बिचारी जमत गाड्यांमधून फिरते हेच सहन होईना.....त्यातून निवृत्ती ची मेजवानी ती हि हॉटेल मध्ये जर अचंबित करणारे च होते असो ) .........
पुढे मयुरेश्वर अभयारण्य आहे (जे फार अपवादात्मक लोकांना माहित आहे.........तसे हि पिकते तिथे विकत नसतेच च) चिंकारा (indian gazelle) , कोल्हे आणि तरस ह्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध ....रस्ता विचारत विचारत च जावे लागत होते ....पण अभयारण्यात पोहोचल्या पोहोचल्या शेजारी एका चिंकारा ने दर्शन दिले आणि १ दम खुश व्हयला झाले........पुढचा सगळा मनाप्रमाणेच होणार ह्याची शाश्वती मिळाल्यागत वाटले....लगेच माणूस असल्याचे लक्षण असल्यागत सर्वांच कोळ/तरस ह्या पैकी काही तरी दिसावे असे वाटायला लागले :)
मयुरेश्वर अभयारण्य
चश्मिश/खाटिक |
संदीप नगरे आणि त्याच्या परिवारा ने पक्षी निरीक्षकांसाठी तिथे एक लघुद्योग च सुरु केला आहे ....ते तिथे येणाऱ्या पर्यतक्नचि राहण्याची सोय करतात आणि पक्षी निरीक्षकांसाठी होडी ने घेऊन जाऊन त्यांना व्यय्स्थित माहिती हि देतात आणि समवयस्क मित्र मंडळीना त्यने त्या व्यवसायात सामील करून घेतले आहे .......मराठी तरुणाने निसर्गान दिलेल्या संधीचे सोने करून फार चं उपयोग करून घेतल्याने फार आनंद वाटला ......पुन्हा हे सर्व ते किरकोळ किमतीत पर्यटकांना उपलब्ध करून देतात .....
जरा ताजे तवाने होऊन आम्ही पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडलो ...........आम्ही किनाऱ्यालागत पायी हिंडण्याचा विचार करत होतो पण ते म्हणाले इथल्या इथ फिरा होडी ने फिरा सकाळी आपण रोहित पक्षी जे ५ किमी वर असलेल्या दुसर्या किनाऱ्यावर होते तिथे जाऊ......किनाऱ्यावर च हुप्प्या (hoopoe ) आणि धोबी (yellow wagtail),हिवाळी गप्पीदास काही टिपायला मिळतेय का पाहत होते.....भारद्वाज हि लांब बसला होता)
हुप्प्या |
शराटी /Austrailian Ibis |
कॅट वाल्क/करकोचा वाल्क |
मुक्कामी येताच पुनस्च्य चहापान झाले आणि आम्ही गप्पा मारत बसलो.....तिथल्या वस्तीतल्या लोकांनी पकडलेल्या मासळीची (चिलापि मासे) मोजदाद होत होती आणि त्यांची शहराकडे विक्री साठी रवनग्चि तयारी हि ......सुरवातीला आम्ही सगळे च शाकाहार घेणार होतो पण प्रशांतला एवढी ताजी मासळी पाहून राहवले नाही सो त्याने मच्चि फ्राय हि मागवला.....आम्ही हि निवांत गप्पा मारत बसलो होतो ........गारवा नसला तरी उकडत हि नव्हते ....छान वाटत होते........८.३०-९.०० वाजता साधारण आम्ही जेवून घेतले...........जेवण १द घरगुती पण खूप छान होते..........पिठलं भाकरी.......रस्सा आणि टोमाटोचि भाजी कम चटणी आणि भात........यथेच्च आडवा हात मारला आणि पुनस्छ आम्ही गप्पा मारत बसलो.........खूप खूप मजा वाटत होती आणि कसलाही ताप आणि व्याप नव्हता सो अजून च छान वाटत होते (आणि मित्र आणि निवांतपणा ह्या गोष्टी असल्या कि गप्पा रंगायला किती स वेळ लागतो आणि आयुष्यात अजून काय हवे)........साधारण ११ च्या सुमारास आम्ही सकाळी ६ ला उठून पहिल्या फेरीतून रोहित पक्षी (मुख्य आकर्षण) पाहण्यास निघायचे ठरवून निद्रा देवीच्या अधीन झालो (typical सहित्य्कि वाक्य :) )
दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० लाच उठून आम्ही तयार होऊन बसलो.....नुकतीच सकाळ होत होती .........सुर्य नारायण हि दुलई तून बाहेर आले नव्हते ......... आम्ही किनार्याकडे जावयास निहलो ......वाटेतच भारद्वाज दिसला .........फार चकवत होता पण त्याला कैद केले च कॅमेराच्या लेन्स मध्ये ....होडी वर राखी कोह्कल आणि खंड्या येउन बसले......पाणपक्षी पाण्यावर hower करत होते भक्ष्यासाठी ..... काल दिसलेले पाणपक्षी आज हि पुन्हा दिसले आणि त्यांच्या flights पाहून भन्नाट वाटत होते....... वेळ जात होता पण उमेश (नावाडी) होडी काढण्याचे नाव घेईना ........प्रशांत जरा कावलाच त्याच्यावर ........पण अजून कोणी पुण्यावरून येत होते त्यांची वाट पाहत होता......म्हणजे भाडे विभागले गेले असते (आमच्याच फायद्याचाच विचार होता पण आम्ही रोहित पक्षी पाहायला एकदम उत्सुक झालो होतो आणि ते उडून जाण्याच्या आत आम्हाला पहायचे होते आणि आम्हाला त्याच्या शिवाय काही सुचत नव्हते) .......साधारण १०-१५ मिनिटांनी १०-१२ जण आले.....त्यात १ दहा जणांचा ग्रुप होता तो एका होडीने निघाला आणि उरलेले २ जण जे आमच्यासारखे मुंबईहून (पुणे मुक्काम करून) आले होते ते .........आम्ही पावणे आठ च्या सुमारास प्रस्थान केले..........पैलतीरावर रोहित पक्ष्यांचा थवा असल्यासारखे जाणवत होते त्याच दिशेने कूच केले ...........वातावरण थोडे ढगाळ होते पण उत्साहात कमतरता नव्हती ......कुरारी, बगळे, करकोचे, गंगाचील्ली, बदकं मुक्त विहार करत होते पण आम्हाला वेध फक्त रोहित पक्ष्याचे होते ........कुरारी (whiskered tern , river tern) , कुरारी हे पक्षी पाण्यावरच विहार करत असतात पण पाण्यात कधीच पाय भिजू देत नाहीत...........पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तूवर बसतात पण पाण्यात नाही........ पनकवले हि पंख सुकवत बसले होते .......धनवर बडदा, वारकरी पोहत होते पण होडी जवळ जाताच उडून जात होते........वारकरी हे नाव काळ्या बदकांच्या डोक्यावर असणाऱ्या पांढऱ्या ठिपक्या मुले जो वारकऱ्यांच्या कपाळावर असणाऱ्या गन्धाप्रमाणे दिसतो म्हणून पडले.......... राजहंस हि डोक्यावरून उडत गेले .......हा हि अजून एक दुर्मिळ प्रसंग
आणि शेवटी आम्ही रोहित पक्ष्यांच्या थव्या जवळ पोहोचू लागलो.......उमेश ने आम्हाला सर्व सूचना दिल्या कि फक्त निरीक्षण करा हालचाल करू नका वगैरे वगैरे ..........बहुदा ते खाण्या च मग्न असतात ......त्यांना बाकी जगाशी काही संबंध नसतोच.........तुम्ही जर शांत बसून राहिलात तर किती हि वेळ निरीक्षण करू शकतात .......त्यांचे मुख्य अन्न म्हणजे शेवाळे ..........तेजीतेह शेवाळे मुबलक तिथे रोहित पक्षी हि मुबलक.....आमच्या मुंबईत शिवडीच्या खाडी वर हि येतात न भांडूप पुम्पिङ्ग स्टेशन ला पण अजून तिथे जाण्याचा योग नाही आला ............आम्ही मशीन गन प्रमाणे कॅमेरे चालवत होतो आणि आमच्या बरोबर होडीत अल्सेल्य दोघांपैकी एकाचा कॅमेरा DSLR होता .....शटर स्पीड भन्नाट असल्याने ते खरच मशीन गनच वाटत होती......मनसोक्त फोटो काढले.........रोहित चे आणि इतर पक्ष्यांचे हि पण माझी लेन्स तोकडी पडत होती...........त्यांची flight पाहण्यात जबरदस्त मजा होती...........लम्बुलकि मान इंग्रजी 'U' सारखी करून आणि गुलाबी पंख पसरून एकत्र उडण्यात त्यांचे जे काही स्य्नच होते त्याला तोड नाही......वारकरी हि उडण्याच्या आधी अन्यवरुन धावत (म्हणजे रान अप घेऊन) उडत होते...........कल्पनातीतच असू शकते ............हे सगळे पाहताना माझ्या डोक्यात चितमपल्लींचे नवेगावबांध चे दिवस डोळ्यासमोर तरळत होते .............अप्रतिम
शेवटी त्यांना आमची चाहूल लगली अस्वी म्हणा किंवा आमच्या समोर त्यांना स्वताला फ़्लौन्त करायचे होते म्हणा ते सर्व उडाले आणि ज्वाला उठल्यास्राख्या वाटल्या ..........आणि ते मस्त सर्व दिशांनी गोलाकार उडत आम्हाला खुश करून लांब किनारी जाऊन बसले ............. आम्ही सर्वांनी मिळून निष्कर्ष काढला कि शेजारच्या होडीतल्या बायकांच्या बडबडीमुळे ते उडाले ............बायकांना कुठहि न्या त्या शांत बसत च नाहीत..........त्यांना कुठे नेण्यात अर्थ नाही :).......
अग्निपंख |
फ्लेमिंगो उडल्यावर नावाड्यांनी आपल्यासोबत आणलेली मासळी पाण्यात टाकायला सुरवात केली आणि सगळे गंगाचील्ली, बगळे, कावळे, आमच्या नावेसमोर गर्दी करायला लागले आणि आम्हाला त्यांचे अगदी जवळून मासे पकडताना वगैरे फोटो काढता आले ........हि कल्पना हि सुंदर च फोत्ग्रफेर्स न डोळ्यासमोर ठेवून केलेली :)
परतीच्या वाटेवर असताना त्या दोघजन्सोबत गप्पा रंगल्या ते हि अम्च्यय्च जातीतले भटके च होते.....DSLR वाल्याचा कॅमेरा आणि accessories मिळून किंमत लाखापेक्षाही वर जात होती......हौसे ला खरच मोल नसते.......... मग विषय अभयारण्यावर आला आणि आम्ही DSLR जवळ बाळगण्याचे आणि ह्या उन्हाळ्यात व्याघ्र दर्शन करायचे ठरवून किनाऱ्यावर परतलो...... वाटेत मैना, पिवळा धोबी, सातभाई , इंडिअन रोबिन फिमेल आदी पक्ष्यांचे दर्शन झाले.......
इथे मराठी हि डाऊन मार्केट झाल्याचे हि अनुभवले ..........लोकं गावातल्या लोकांशी मराठीत आणि स्व कुटुंबियांशी इंग्रजीत बोलत होती (हा प्रकार च हास्यास्पद आहे नाही.......इतस्तत लोकं घरच्यांशी मातृभाषेत बोलतात आणि इथे ह्यांची मातृभाषा च इंग्रजी झाली होती आणि हे सर्रास घडत आहे ह्याची खंत वाटते)....
अजून हि थांबण्याची इच्छा होती पण वेळेत घरी पोहचायचे असल्याने आटपते घेतले आणि check out करून निघालो....जातानाच्या प्रवासात भिगवण चेच गारूड होते आणि घरचे वेध हि लागले होते आणि घर येता येता दुसऱ्या दिवशीच्या ओफ्फिचे चे हि वेध लागायला लागले आणि मग मगरे आणि मित्र मंडळी आठवून त्यांचा अजून च हेवा वाटायला लागला ..........
आमची छोट्या कालावधीतली तिसरी हि सहल यशस्वी पार पडली आणि खूप धमाल हि आली सो ह्या सहलीची सांगता पुढच्या सहलीच्या प्लान ने झाली .............सगळे व्यवस्थित पार पडल्यास वेळास ची olive ridley कासवांची घेऊन च भेटीस येईन......तब तक शब्बा खैर
जाता जाता सावत्या :- 'काही कारणामुळे दुधापासून साय वेगळी झाली तरी ती मुळचा दुधाचा च भाग असते....तुम्ही मला वेगळे समजू नका' (त्याला येता येत नसल्याने आम्ही जाम ताणले होते त्यामुळे तो कष्टी झाला होता ....त्यातून अमेय ने whatsapp चालू न केल्याने त्याच्या मेसेजस ला उत्तर देऊ शकला नाही....सो शेवटू सावत्याने न राहवून फोन केलाच अन आम्ही त्याला हाणून पडून बोलून घेतलं ...त्यावर सावत्या म्हणे ''काही कारणामुळे दुधापासून साय वेगळी झाली तरी ती मुळचा दुधाचा च भाग असते....तुम्ही मला वेगळे समजू नका".....मी सुटलेलो असल्यानें म्हटले कि आम्हाला साय आवडत नाही आम्ही ती गळून घेतो अन बिचारा अजून च हिरमुसला.......पुढच्या वेळी नक्की सावत्या
भिगवण चे पक्षी निरीक्षण पूर्ण पाहण्यासाठी खालील लिंक वर click करा
https://www.facebook.com/makarand.gosavi/media_set?set=a.10152137880682708.1073741836.622207707&type=3