आज सकाळी नियमाप्रमाणे ऑफिसला जाताना fb बघत असता १ notification आले.......शिखरवेध चे वेळास च्या कासव महोत्सवासाठी आयोजित केलेल्या सहलीचे ......... आणि वेळास ला आम्ही शिखरवेध तर्फे च दिलेल्या भेटीचे सुखद २-३ दिवस तरळून गेले आणि असह्य उकाड्यात अचानक आलेल्या वाऱ्याच्या गार झुळूकेमुळे जी प्रसन्नता जाणवते तशी प्रसन्नता जाणवली....मन भूतकाळातील वेळास च्या सुखद आठवणीत कधी रमून गेले न बस ऑफिस च्या दाराशी कधी उभी राहिली कळलेच नाही...............
वेळास हा डेडली म्हणतो त्या प्रमाणे माझ्या काळजाचा ठोका आहे (मी फक्त २-३ दिवस तिथे घालवून हि वेळास ची भुरळ पडली आहे) आणि 'का' हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्या कारणाने मी सुरवाती पासून च सुरवात करतो ....
वेळास च्या कासव महोत्सव उर्फ turtle festival बाबत फार आधीपासून वाचले होते आणि मनात त्याबाबत उत्सुकता होती पण माझ्या मित्र-मंडळींमध्ये त्या बाबत अनभिन्यता होती ....मग तर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता ............ वेळास आणि महाराष्ट्राच्या काही समुद्रकिनाऱ्यावर olive ridley जातीची कासवे साधारण डिसेंबर च्या सुमारास अंडी घालण्यासाठी येतात .......आणि समुद्रकिनारी घरटे करून अंडी घालून निघून जातात ........सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण चे कार्यकर्ते तेथील ग्रामस्थांच्या मदतीने त्या अंड्यांचे जतन आणि संवर्धन करतात आणि साधारण मार्च-एप्रिल च्या सुमारास त्या अंड्यातून कासवाची पिल्ले बाहेर येऊ लागतात आणि आपल्या जीवन प्रवासास उर्फ सागरी सफरीस सुरवात करतात .......ह्या olive ridley जातीच्या कासवांचे वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या किनाऱ्यावर मादी ने जन्म घेतलेला असतो त्याच किनाऱ्यावर ती मादी अंडी घालण्यासाठी येते ....... १ दिवसाचं पिल्लू जे अथांग सागरात जीवन प्रवासास सुरवात करते .......ते साधारण अचूक त्याच किनारयावर प्रसुतीस कसे येते हे विज्ञानाला न उकललेलं कोडं आहे..........
तर गौरव ने शिखर वेध च्या शेड्युल मध्ये वेळास असल्याचे सांगितले न तो तिथे जाणार असल्याचे बोलला. मला तर फार जायचे होते सो मी लगेच तयार झालो पण कठीण होते आमच्या सौ. ना तयार करणे .........कसे बसे तिला तयार केले आणि ती हि नाईलाजास्तव तयार झाली .......आमच्याच ऑफिसचे अजून दोघे विश्वेश न संदीप सातपुते हि अचानक यायला तयार झाले....
पण म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न त्याप्रमाणे जायच्या आधी दोन दिवस आम्हास (आदरार्थी एकवचन) ताप आला (कि झाला कोणास ठाऊक) आणि 'घरच्यांची भुणभुण सुरु झाली कि जाण्याचे काही अडलेय का'....'विकनेस आहे तर आराम करावा' एक ना हजार ........पण मी हि जाण्याचे ठरवलेच होते सो त्यांच्या किरकिरी कडे फार से लक्ष दिले नाही .......... आणि शुक्रवार उजाडण्याची वाट पाहत राहिलो ......शिखर वेध ची बस आम्हाला कांजुरमार्ग स्टेशन बाहेर flyover वर पकडायची होती ११.३० च्या सुमारास....पण बस किमान पाऊन तास उशिरा आणि डासांनी उच्छाद मांडलेला (ह्या परिस्थितीत मला किती शाब्दिक मार सहन करावा लागला असेल हे जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला वेगळे सांगायला नको) ......१२.१५-१२.३० च्या सुमारास बस आली नि मी सुटकेचा निश्वास सोडला .......रात्रीचा प्रवास असल्याने झोपेतच गेला आणि सकाळी ६.१५ च्या सुमारास आम्ही वेळास ला पोहोचलो श्री. प्रकाश जोशींच्या घरी...... त्यांच्या कडे आमची भोजन आणि निवासाची सोय करण्या आली होती..........अजून उजाडायचे होते, त्या मुळे आजूबाजूला काय आहे काही जाणवत नव्हते .........आम्ही जरा स्थिर स्थावर झालो....चहा घेतला आणि उजाडण्याची वाट पाहत होतो............
साधारण 8.00-8.30 वाजता आम्ही वेलास च्या बीच वर गेलो आणि SNM च्या कार्यकर्त्यांनी संवर्धन केलेल्या घरट्यान्मधल्या १३-१५ अंड्यामधून इवल्याश्या जीवiनी जन्म घेतल्याचे सांगितले आणि साधारण पाण्यापासून १०० फूट अंतरावरून त्या कासवांना त्यांच्या पुढील प्रवाशासाठी समुद्राच्या दिशेने मुक्त केले ...........त्यांना थेट समुद्रात न सोडता किनाऱ्यावरून चालत सोडण्यामागे वैज्ञानिक कारण असे कि त्यामुळे भू चुंबकीय क्षेत्र का काय त्यांच्या मेंदूत ठसते आणि पुढे विणी च्या वेळेस ते ह्याच किनाऱ्यावर येतात :) ............. छान प्रसन्न वातावरणात आम्ही त्यांच्या जीवन प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या ......... आणि SNM च्या कार्यकर्त्यांचे कौतुक कि हे सर्व अगदी शिस्तीत काही हि गडबड गोंधळ न होऊ देता पार पडले .........म हे पार पडल्यावर आम्ही ६ जणांनी (४ जेकबाइटस, गौरव चा मित्र आणि कल्पिता) त्या मस्त लोनली बीच वर खूप TP केला ... फोटो सेशन पार पडले......अगदी कंटाळा येईस्तोवर आम्ही तिथे होतो आणि पहिल्यांदीच जाणीव झाले कि समुद्रावर मजा येण्यासाठी भिजणे काही गरजेचे नाहीये ..........नंतर आम्ही परत जोश्यांच्या वाड्यावर आलो नाश्ता केला आणि शुचिर्भूत झालो .......मग मोकळा वेळ होता जेवणा पर्यंत .......... म काही जण आराम करत मागे राहिले आणि आम्ही तिथून बाणकोट च्या किल्ल्यावर प्रस्थान केलं
बाणकोट चा किल्ला म्हणजे सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला आहे त्या किल्ल्याबाबत इतिहासाला फारसे ज्ञात नाही पण आदिलशाही- पोर्तुगिस असे करत कान्होजी अंग्रे ह्यांनी तो ताब्यात घेतला...,, फारसा प्रसिद्ध नसलेल्या ह्या किल्ल्यावरील बुरुज आणि दरवाजा मात्र बऱ्यापैकी चांगल्या परिस्थितीत आहेत .........निवांत असलेल्या ह्या किल्ल्यावरून समुद्राचा अप्रतिम देखावा दिसतो ... हा किल्ला पाहिला कि DCH मधल्या किल्ले aguada ची आठवण येते ........ आम्ही किल्ला पूर्ण फिरून घेतला आणि मग किल्यावर मनसोक्त फोटो सेशन करून घेतले विश्वेश कडून :) ...... येताना उन असल्याने आम्ही बाणकोट च्या बाजारपेठेकडून किल्ल्यापर्यंत रिक्षा केली होती....... जाताना मात्र उतरत जाण्याचे ठरवले...... आणि shortcut पकडला.......मध्ये जरा चुकल्यासारखे वाटले मात्र तसाच मार्ग काढत काढत आम्ही बाणकोट - वेळास च्या रस्त्याला लागलो......हा रस्ता अप्रतिम आहे समुद्राच्या बाजूने अगदी शांत असा .......येताना आम्ही ह्या रस्त्याने चालत च आलो होतो ......जाताना हि चालत जाण्याचा विचार होता पण एक महामंडळाची गाडी (s t ) येताना दिसली आणि उन्हाचे का चाला म्हणून s t ने वेळास पर्यंत आलो............s t मध्ये बरीच शाळकरी मुले होती ......बहुदा शाळा सुटली असावी.....त्यांची मजा मजा चालली होती..आणि आम्ही हि त्यांच्या गप्पा ऐकून मजा घेत होतो....... येताना आम्ही नाना फडन्विसंच्या समाधीचे दर्शन घेतले .... नाना फडणवीस हे पेशवाइ तील प्रसिद्ध सचिव........ त्यांचे जन्म गाव वेळास. तिथेच देवळाच्या बाजूला त्यांची समाधी आहे ..........एकंदरीत छोटासा पण फार छान ट्रेक झाला..........मग आम्ही शिखर वेध च्या सहप्रवाशांबरोबर गप्पा मारत बसलो..........एव्हाना जेवणाची वेळ झालीच होती
जोश्यांनी जेवणाची फार उत्तम व्यवस्था केली होती.......... त्यांच्या अंगणात केळीच्या पानावर सात्विक घरगुती जेवण .......... आ हा हा ..........अप्रतीम....... त्या दुपारी साधारण १०० पानं उठली असतील...शिखर वेध चे ३० आणि इतर हि ग्रुप असे ...........आणि जेवणानंतर मस्त ताक.......आता झोपणं गरजेचंच होतं.............एक जागा पकडून आम्ही पथाऱ्या पसरल्या .....गौरव ची किरकिर चालू होती....घोरनार्यांच्या बाजूला नको वगैरे पण पर्याय नव्हता .........छान शांत झोपून ४ -४.३० च्या सुमारास उठलो तर गौरव न त्याचा मित्र गायब .......... चहा पिउन आम्ही गौरव ला फोन केला तर तेवढ्यात तो हि आलाच आणि आम्हा घोरनार्यांच्या नावाने शंख करून मोकळा झाला...... पण आम्ही दुर्लक्ष केले कारण किती हि म्हटला तरी ती प्रतिक्षिप्त क्रिया आणि विक्षिप्त माणसाला आम्ही काय समजावणार :) ....
संध्याकाळी हि कासवांची पिल्ल पाण्यात सोडण्याचा प्रोग्राम होता पण आम्ही बाणकोट च्या रस्त्याने जाणे पसंत केलं....आम्ही ६ जन ...........४ jacobites ....... कल्पिता न गौरव चा मित्र ............बाणकोट चा रस्ता आधी च वर्णन केल्याप्रमाणे समुद्राला लागून च बांधला आहे....थोडा पुढे गेल्यावर साधारण खडकाळ जागा बघून आम्ही तिथे थांबलो लाटा पायावर घेत ....अप्रतिम वातावरण होता....सुर्य अस्ताला चाललेला आणि छान वारा वाहत होता आणि महत्वाचा म्हणजे रस्त्यावर अजिबात वर्दळ नव्हती....मस्त फोटो सेशन झालं....गप्पा , मस्करी न गोस्सिपिंग.......वेळ कसा गेला कळलच नाही..........मी घालवलेल्या काही अविस्मरणीय evening पैकी एक ..... शब्दात वर्णन कारण अशक्य....
गावात आलो तर वीज नव्हती.........गावात येताना जागोजागी शंकासूर दिसले........होळी जवळ आली कि कोंकणात लोक शंकासुराच्या वेशात फिरायला लागतात आणि घराघरासमोर जाऊन गाणी वगैरे म्हणतात सुपारीच्या रुपात काही मिळेल ह्या आशेने ......आम्ही त्या शंकासुरासोबत हि फोटो काढले........... s . t. stand वर आम्ही वडा पाव खाल्ला न कडक चहा घेऊन जोश्यांकडे निघालो.... गावात वीज नव्हतीच ......... प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेला पांगला होता ........काही गाणी म्हणून , काही जण अंताक्षरी खेळून तर काही जण टिंगल टवाळ्या करून वेळ घालवत होते ......शेजारच्या वाड्यात आलेल्या पाव्हणे मंडळीनी त्या शंकासुराना बोलावून घेतले न त्यांच्या कडून गाणी म्हणवून घेऊन न नाचून घेऊन स्वताची करमणूक करून घेत होते ......... तो मला बाल मजुरीचा च प्रकार वाटला पण पिकनिक ला आल्यावर पर्त्येक गोष्टीचा विचार करून चालत नाही असे समजावले स्वतःला आणि बाकीच्यान्प्रमाणे त्या शंकासुरांचे चाले बघत विजेची वाट पाहत होतो
अजून जेवायला बराच वेळ होता... तेवढ्यात वीज आली न सह्याद्री निसर्ग मित्र तर्फे गावच्या देवळात त्यांच्या संस्थेची माहिती देणारी आणि त्यांनी हाती घेतलेल्या प्रोजेक्ट्स ची माहिती देणारी फिल्म दाखवण्यात आली...त्यात गिधाडांचे संरक्षण न संवर्धन, समुद्री घारीच्या घरट्याचे संरक्षण आणि संवर्धन आदि प्रोजेक्ट सध्या चालू आहेत...(अधिक माहिती साठी इथे क्लीच्क करा http://www.snmcpn.org/)..............छान माहिती मिळाली आणि आपल्याला हि त्यात काही हातभार लावता आला तर बरे असे वाटून गेले....... पण नेहमीच्या गदारोळीत ह्या सगळ्या गोष्टी मागे पडतात आणि त्याला काही पर्याय हि नसतो....पण कोणी न कोणी काही निमित्ताने निसर्ग संवर्धनाचे काम करतोय विशेषतः इतर समाज निसर्ग ओरबाडत असताना ह्याचे समाधान वाटते.......
रात्रीचे जेवण हि पंगत मांडून च केळीच्या पानावर आणि अफलातून च होते..... मस्त वदनी कवळ घेतां म्हणून पंगतीला सुरवात झाली....छानच वाटले..जेवण हि अप्रतिम च होते न शेवटी मस्त घुसळलेले ताक.......शेवटचे ताक पिताना आमच्या गौरव ने थोडा गोंधळ घातला म्हणजे त्याने वाटी ऐवजी पेल्यात घेतले तर जोशींनी ऐकून दाखवले कि पेला घासताना त्रास होतो वगैरे म्हणून आम्ही वाटीत देतो आणि ओशट पण भांड्याचा आता कोण काढणार .... आम्ही गौरव म्हटले च कि तू आता सगळीच भांडी घासून दे.... जेवण झाल्यावर आम्ही ४-५ जण s t stand जवळ च्या मंदिरात गेलो...आमच्या सौ. झोपल्या होत्या सो आता जिभेला लगाम लावायची आवश्यकता नव्हती :) ........ बराच वेळ निरथर्क गप्पा आणि गोसीप चालू होते...मग डोळे पेंगायला लागले आणि मग परत जोश्यांच्या वाड्याकडे परतलो...
झोपण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे बांधलेल्या guest house कम घरात व्यवस्था करण्यात आली होती... गौरव माझ्या आणि संदीप सातपुतेच्या शेजारी झोपण्यास तयार नवता (घोरणे हे १मेव कारण) त्याने त्यासाठी बरेच प्रयत्न केले पण जगदीश ने त्यास दाद नाही दिली..... शेजारच्या रूम मध्ये दोन मुली अजून जागेवर आल्या नवत्या म्हणून गौरव ने तिथे जाऊन जागा पकडण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या इथे झोपावे लागत नसल्यामुळे खुश होऊन celebration वगैरे केले .... पण नशीब त्याची साथ द्यायला तयार नवते ........त्या मुली आल्या च आणि गौरव ला तिथून हाकलण्यात आले आणि शेवटी आमच्या शेजारीच येउन त्याला पथारी पसरायला लागली.....आणि त्या नंतर चा अर्धा तास आम्ही फक्त हसत होतो ....आणि तो हेल्पलेस चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होता.......... त्या एका रात्रीत सातपुते प्रसिद्ध झाला...........शेरा या नावाने .............. तुम्ही चतुर असाल तर तुम्ही ओळखलेच असेल..........नाही तर शेवटी मी सांगेन च....
आज अजून हरिहरेश्वर ला हि जायचे असल्याने फार वेळ न दवडता प्रस्थान केले...........बाणकोट खडीवरून बस सकट आम्ही लौंच मधून आम्ही खाडी पार करून हरिहरेश्वर ला पोहोचलो... तिथे काळ भैरवाचे चे दर्शन घेऊन प्रदक्षिणा मार्गावर आलो.... हरिहरेश्वर ला तुम्ही गेला असाल तर घळीतून दिणारे समुद्राचे दर्शन तर अप्रतिम च आहे....तिथे खूप group फोटो सेशन करण्यात आले........... बरीच लोकं समुद्रावर खेळ खेळण्यात मग्न होती....आम्हाला भूक लागली होती ...तसेही आज दुपारचे जेवण सहलीच्या खर्चात नवते.....प्रत्येकाच्या आवडी निवडी नुसार घ्यायचे होते..........आम्ही थोडकेच शाकाहारी आमच्या साठी खानावळ शोधली आणि उदर भरणाचेनित्य कर्म करून घेतले......... एक एक जण मग हळू हळू बस जवळ येत गेला आणि आम्ही साधारण ३ च्या सुमारास परतीच्य प्रवासास सुरवात केली... खर्च अपेक्षेपेक्षा कमी झाल्या असल्याने बहुदा जगदीश उर्फ जग्गू ने संध्याकाळचा नाश्ता हि आम्हास त्याच्या तर्फे दिला......साधारण ७ च्या सुमारास आम्ही पनवेल आणि ८.३०-८.४५ पर्यंत घरी पोहोचलो...
वेळास चे ते २ दिवस आज इतक्या वर्षांनी हि जसेच्या तसे आठवत आहेत..............त्या जागेने मनात कायमचे घर केले आहे............. ते पूर्णतः commercial होण्याआधी प्रत्येकाने किमान एकदा तरी भेट द्यावयास हवी ..............
वेळास सहलीचे फोटो इथे पाहावेत https://plus.google.com/photos/109764916559690377798/albums/5716462368131516225?authkey=COyn3vOHvaT1-wE
कळावे
लोभ असावा हि विनंती
ता. क. :- ब्लॉग लिहायला सुरवात केली तेव्हा वेळास ला जायचे आमचे ठरलेच होते पण अमेय ला अचानक साईट वर जावे लागल्याने आणि माझी हि मधल्या काळात अतिशय धावपळ झाल्याने ते हवेतच विरले.......... ते म्हणतात त्याप्रमाणे "There is always next time " ......... पुढच्यावेळी.........
वेळास हा डेडली म्हणतो त्या प्रमाणे माझ्या काळजाचा ठोका आहे (मी फक्त २-३ दिवस तिथे घालवून हि वेळास ची भुरळ पडली आहे) आणि 'का' हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्या कारणाने मी सुरवाती पासून च सुरवात करतो ....
वेळास च्या कासव महोत्सव उर्फ turtle festival बाबत फार आधीपासून वाचले होते आणि मनात त्याबाबत उत्सुकता होती पण माझ्या मित्र-मंडळींमध्ये त्या बाबत अनभिन्यता होती ....मग तर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता ............ वेळास आणि महाराष्ट्राच्या काही समुद्रकिनाऱ्यावर olive ridley जातीची कासवे साधारण डिसेंबर च्या सुमारास अंडी घालण्यासाठी येतात .......आणि समुद्रकिनारी घरटे करून अंडी घालून निघून जातात ........सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण चे कार्यकर्ते तेथील ग्रामस्थांच्या मदतीने त्या अंड्यांचे जतन आणि संवर्धन करतात आणि साधारण मार्च-एप्रिल च्या सुमारास त्या अंड्यातून कासवाची पिल्ले बाहेर येऊ लागतात आणि आपल्या जीवन प्रवासास उर्फ सागरी सफरीस सुरवात करतात .......ह्या olive ridley जातीच्या कासवांचे वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या किनाऱ्यावर मादी ने जन्म घेतलेला असतो त्याच किनाऱ्यावर ती मादी अंडी घालण्यासाठी येते ....... १ दिवसाचं पिल्लू जे अथांग सागरात जीवन प्रवासास सुरवात करते .......ते साधारण अचूक त्याच किनारयावर प्रसुतीस कसे येते हे विज्ञानाला न उकललेलं कोडं आहे..........
पण म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न त्याप्रमाणे जायच्या आधी दोन दिवस आम्हास (आदरार्थी एकवचन) ताप आला (कि झाला कोणास ठाऊक) आणि 'घरच्यांची भुणभुण सुरु झाली कि जाण्याचे काही अडलेय का'....'विकनेस आहे तर आराम करावा' एक ना हजार ........पण मी हि जाण्याचे ठरवलेच होते सो त्यांच्या किरकिरी कडे फार से लक्ष दिले नाही .......... आणि शुक्रवार उजाडण्याची वाट पाहत राहिलो ......शिखर वेध ची बस आम्हाला कांजुरमार्ग स्टेशन बाहेर flyover वर पकडायची होती ११.३० च्या सुमारास....पण बस किमान पाऊन तास उशिरा आणि डासांनी उच्छाद मांडलेला (ह्या परिस्थितीत मला किती शाब्दिक मार सहन करावा लागला असेल हे जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला वेगळे सांगायला नको) ......१२.१५-१२.३० च्या सुमारास बस आली नि मी सुटकेचा निश्वास सोडला .......रात्रीचा प्रवास असल्याने झोपेतच गेला आणि सकाळी ६.१५ च्या सुमारास आम्ही वेळास ला पोहोचलो श्री. प्रकाश जोशींच्या घरी...... त्यांच्या कडे आमची भोजन आणि निवासाची सोय करण्या आली होती..........अजून उजाडायचे होते, त्या मुळे आजूबाजूला काय आहे काही जाणवत नव्हते .........आम्ही जरा स्थिर स्थावर झालो....चहा घेतला आणि उजाडण्याची वाट पाहत होतो............
जोश्यांचा वाडा |
साधारण 8.00-8.30 वाजता आम्ही वेलास च्या बीच वर गेलो आणि SNM च्या कार्यकर्त्यांनी संवर्धन केलेल्या घरट्यान्मधल्या १३-१५ अंड्यामधून इवल्याश्या जीवiनी जन्म घेतल्याचे सांगितले आणि साधारण पाण्यापासून १०० फूट अंतरावरून त्या कासवांना त्यांच्या पुढील प्रवाशासाठी समुद्राच्या दिशेने मुक्त केले ...........त्यांना थेट समुद्रात न सोडता किनाऱ्यावरून चालत सोडण्यामागे वैज्ञानिक कारण असे कि त्यामुळे भू चुंबकीय क्षेत्र का काय त्यांच्या मेंदूत ठसते आणि पुढे विणी च्या वेळेस ते ह्याच किनाऱ्यावर येतात :) ............. छान प्रसन्न वातावरणात आम्ही त्यांच्या जीवन प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या ......... आणि SNM च्या कार्यकर्त्यांचे कौतुक कि हे सर्व अगदी शिस्तीत काही हि गडबड गोंधळ न होऊ देता पार पडले .........म हे पार पडल्यावर आम्ही ६ जणांनी (४ जेकबाइटस, गौरव चा मित्र आणि कल्पिता) त्या मस्त लोनली बीच वर खूप TP केला ... फोटो सेशन पार पडले......अगदी कंटाळा येईस्तोवर आम्ही तिथे होतो आणि पहिल्यांदीच जाणीव झाले कि समुद्रावर मजा येण्यासाठी भिजणे काही गरजेचे नाहीये ..........नंतर आम्ही परत जोश्यांच्या वाड्यावर आलो नाश्ता केला आणि शुचिर्भूत झालो .......मग मोकळा वेळ होता जेवणा पर्यंत .......... म काही जण आराम करत मागे राहिले आणि आम्ही तिथून बाणकोट च्या किल्ल्यावर प्रस्थान केलं
बाणकोट चा किल्ला म्हणजे सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला आहे त्या किल्ल्याबाबत इतिहासाला फारसे ज्ञात नाही पण आदिलशाही- पोर्तुगिस असे करत कान्होजी अंग्रे ह्यांनी तो ताब्यात घेतला...,, फारसा प्रसिद्ध नसलेल्या ह्या किल्ल्यावरील बुरुज आणि दरवाजा मात्र बऱ्यापैकी चांगल्या परिस्थितीत आहेत .........निवांत असलेल्या ह्या किल्ल्यावरून समुद्राचा अप्रतिम देखावा दिसतो ... हा किल्ला पाहिला कि DCH मधल्या किल्ले aguada ची आठवण येते ........ आम्ही किल्ला पूर्ण फिरून घेतला आणि मग किल्यावर मनसोक्त फोटो सेशन करून घेतले विश्वेश कडून :) ...... येताना उन असल्याने आम्ही बाणकोट च्या बाजारपेठेकडून किल्ल्यापर्यंत रिक्षा केली होती....... जाताना मात्र उतरत जाण्याचे ठरवले...... आणि shortcut पकडला.......मध्ये जरा चुकल्यासारखे वाटले मात्र तसाच मार्ग काढत काढत आम्ही बाणकोट - वेळास च्या रस्त्याला लागलो......हा रस्ता अप्रतिम आहे समुद्राच्या बाजूने अगदी शांत असा .......येताना आम्ही ह्या रस्त्याने चालत च आलो होतो ......जाताना हि चालत जाण्याचा विचार होता पण एक महामंडळाची गाडी (s t ) येताना दिसली आणि उन्हाचे का चाला म्हणून s t ने वेळास पर्यंत आलो............s t मध्ये बरीच शाळकरी मुले होती ......बहुदा शाळा सुटली असावी.....त्यांची मजा मजा चालली होती..आणि आम्ही हि त्यांच्या गप्पा ऐकून मजा घेत होतो....... येताना आम्ही नाना फडन्विसंच्या समाधीचे दर्शन घेतले .... नाना फडणवीस हे पेशवाइ तील प्रसिद्ध सचिव........ त्यांचे जन्म गाव वेळास. तिथेच देवळाच्या बाजूला त्यांची समाधी आहे ..........एकंदरीत छोटासा पण फार छान ट्रेक झाला..........मग आम्ही शिखर वेध च्या सहप्रवाशांबरोबर गप्पा मारत बसलो..........एव्हाना जेवणाची वेळ झालीच होती
जोश्यांनी जेवणाची फार उत्तम व्यवस्था केली होती.......... त्यांच्या अंगणात केळीच्या पानावर सात्विक घरगुती जेवण .......... आ हा हा ..........अप्रतीम....... त्या दुपारी साधारण १०० पानं उठली असतील...शिखर वेध चे ३० आणि इतर हि ग्रुप असे ...........आणि जेवणानंतर मस्त ताक.......आता झोपणं गरजेचंच होतं.............एक जागा पकडून आम्ही पथाऱ्या पसरल्या .....गौरव ची किरकिर चालू होती....घोरनार्यांच्या बाजूला नको वगैरे पण पर्याय नव्हता .........छान शांत झोपून ४ -४.३० च्या सुमारास उठलो तर गौरव न त्याचा मित्र गायब .......... चहा पिउन आम्ही गौरव ला फोन केला तर तेवढ्यात तो हि आलाच आणि आम्हा घोरनार्यांच्या नावाने शंख करून मोकळा झाला...... पण आम्ही दुर्लक्ष केले कारण किती हि म्हटला तरी ती प्रतिक्षिप्त क्रिया आणि विक्षिप्त माणसाला आम्ही काय समजावणार :) ....
संध्याकाळी हि कासवांची पिल्ल पाण्यात सोडण्याचा प्रोग्राम होता पण आम्ही बाणकोट च्या रस्त्याने जाणे पसंत केलं....आम्ही ६ जन ...........४ jacobites ....... कल्पिता न गौरव चा मित्र ............बाणकोट चा रस्ता आधी च वर्णन केल्याप्रमाणे समुद्राला लागून च बांधला आहे....थोडा पुढे गेल्यावर साधारण खडकाळ जागा बघून आम्ही तिथे थांबलो लाटा पायावर घेत ....अप्रतिम वातावरण होता....सुर्य अस्ताला चाललेला आणि छान वारा वाहत होता आणि महत्वाचा म्हणजे रस्त्यावर अजिबात वर्दळ नव्हती....मस्त फोटो सेशन झालं....गप्पा , मस्करी न गोस्सिपिंग.......वेळ कसा गेला कळलच नाही..........मी घालवलेल्या काही अविस्मरणीय evening पैकी एक ..... शब्दात वर्णन कारण अशक्य....
गावात आलो तर वीज नव्हती.........गावात येताना जागोजागी शंकासूर दिसले........होळी जवळ आली कि कोंकणात लोक शंकासुराच्या वेशात फिरायला लागतात आणि घराघरासमोर जाऊन गाणी वगैरे म्हणतात सुपारीच्या रुपात काही मिळेल ह्या आशेने ......आम्ही त्या शंकासुरासोबत हि फोटो काढले........... s . t. stand वर आम्ही वडा पाव खाल्ला न कडक चहा घेऊन जोश्यांकडे निघालो.... गावात वीज नव्हतीच ......... प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेला पांगला होता ........काही गाणी म्हणून , काही जण अंताक्षरी खेळून तर काही जण टिंगल टवाळ्या करून वेळ घालवत होते ......शेजारच्या वाड्यात आलेल्या पाव्हणे मंडळीनी त्या शंकासुराना बोलावून घेतले न त्यांच्या कडून गाणी म्हणवून घेऊन न नाचून घेऊन स्वताची करमणूक करून घेत होते ......... तो मला बाल मजुरीचा च प्रकार वाटला पण पिकनिक ला आल्यावर पर्त्येक गोष्टीचा विचार करून चालत नाही असे समजावले स्वतःला आणि बाकीच्यान्प्रमाणे त्या शंकासुरांचे चाले बघत विजेची वाट पाहत होतो
अजून जेवायला बराच वेळ होता... तेवढ्यात वीज आली न सह्याद्री निसर्ग मित्र तर्फे गावच्या देवळात त्यांच्या संस्थेची माहिती देणारी आणि त्यांनी हाती घेतलेल्या प्रोजेक्ट्स ची माहिती देणारी फिल्म दाखवण्यात आली...त्यात गिधाडांचे संरक्षण न संवर्धन, समुद्री घारीच्या घरट्याचे संरक्षण आणि संवर्धन आदि प्रोजेक्ट सध्या चालू आहेत...(अधिक माहिती साठी इथे क्लीच्क करा http://www.snmcpn.org/)..............छान माहिती मिळाली आणि आपल्याला हि त्यात काही हातभार लावता आला तर बरे असे वाटून गेले....... पण नेहमीच्या गदारोळीत ह्या सगळ्या गोष्टी मागे पडतात आणि त्याला काही पर्याय हि नसतो....पण कोणी न कोणी काही निमित्ताने निसर्ग संवर्धनाचे काम करतोय विशेषतः इतर समाज निसर्ग ओरबाडत असताना ह्याचे समाधान वाटते.......
रात्रीचे जेवण हि पंगत मांडून च केळीच्या पानावर आणि अफलातून च होते..... मस्त वदनी कवळ घेतां म्हणून पंगतीला सुरवात झाली....छानच वाटले..जेवण हि अप्रतिम च होते न शेवटी मस्त घुसळलेले ताक.......शेवटचे ताक पिताना आमच्या गौरव ने थोडा गोंधळ घातला म्हणजे त्याने वाटी ऐवजी पेल्यात घेतले तर जोशींनी ऐकून दाखवले कि पेला घासताना त्रास होतो वगैरे म्हणून आम्ही वाटीत देतो आणि ओशट पण भांड्याचा आता कोण काढणार .... आम्ही गौरव म्हटले च कि तू आता सगळीच भांडी घासून दे.... जेवण झाल्यावर आम्ही ४-५ जण s t stand जवळ च्या मंदिरात गेलो...आमच्या सौ. झोपल्या होत्या सो आता जिभेला लगाम लावायची आवश्यकता नव्हती :) ........ बराच वेळ निरथर्क गप्पा आणि गोसीप चालू होते...मग डोळे पेंगायला लागले आणि मग परत जोश्यांच्या वाड्याकडे परतलो...
झोपण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे बांधलेल्या guest house कम घरात व्यवस्था करण्यात आली होती... गौरव माझ्या आणि संदीप सातपुतेच्या शेजारी झोपण्यास तयार नवता (घोरणे हे १मेव कारण) त्याने त्यासाठी बरेच प्रयत्न केले पण जगदीश ने त्यास दाद नाही दिली..... शेजारच्या रूम मध्ये दोन मुली अजून जागेवर आल्या नवत्या म्हणून गौरव ने तिथे जाऊन जागा पकडण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या इथे झोपावे लागत नसल्यामुळे खुश होऊन celebration वगैरे केले .... पण नशीब त्याची साथ द्यायला तयार नवते ........त्या मुली आल्या च आणि गौरव ला तिथून हाकलण्यात आले आणि शेवटी आमच्या शेजारीच येउन त्याला पथारी पसरायला लागली.....आणि त्या नंतर चा अर्धा तास आम्ही फक्त हसत होतो ....आणि तो हेल्पलेस चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होता.......... त्या एका रात्रीत सातपुते प्रसिद्ध झाला...........शेरा या नावाने .............. तुम्ही चतुर असाल तर तुम्ही ओळखलेच असेल..........नाही तर शेवटी मी सांगेन च....
दुसऱ्यादिवशी प्रात: सकाळी उठून चहा नाश्ता आटोपून परत बीच वर गेलो
छोट्याश्या पिल्लांच्या प्रवासास शुभेच्छा देण्यासाठी......... आणि आज सकाळी
तर ८०+ छोट्या olive ridleys नि जीवन प्रवासास सुरवात केली
............रविवार असल्याने बऱ्यापैकी गर्दी हि होती ........तरी हि सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध रीतीने वेळेत पार पडला आणि मुख्य म्हणजे ह्या सोहळ्याचा आनंद व्यवस्थित सगळ्यांना मनसोक्त रीतीने दृश्य डोळ्यात, कॅमेऱ्यात साठवून घेता आला .......(तुम्ही हि हा आनंद ह्या लिंक वर पाहू शकता http://youtu.be/bmTzwfHeyAQ ) .............