कर्नाळा - माझ्या अगदी आवडीचा किल्ला ......
ह्या मार्च-एप्रिल मध्ये आमचे बरेच मनसुबे होते - वेळास, ताडोबा -अंधेरी व्याघ्रप्रकल्प , एखादा सागरी किल्ला वगैरे वगैरे........... पण ऑफिसमध्ये ही बरीच कामं होती, घरी ही काही कामं होती अन अमेय हि मलेशिया ला गेला होता डेप्यूटेशन वर ............ अगदीच कुठे गेलो नाही असे व्हयला नको...bagpackers ला लांच्छनास्पद ठरले असते आणि क्षीण ही थोडा घालवायचा होता ....... मग मी प्रशांत बेंद्रे, अतुल सावत्या न अमोद असे जायचे ठरले ...बाकी कोणी कर्नाळ्याला एप्रिल च्या उन्हात येईल ही सुतराम शक्यता नव्हती......आमचे ही बरेच पर्याय चाचपून झाले खास करून प्रशांत बेंद्रे साठी (त्याची मानसिक तयारी होत नव्हती) बाकीच्यांचा प्रश्न नव्हता कारण अतुल काटक आहे, सावत्या obess असला तरी त्याच्यात उत्साह फार आहे न माझा ट्रेक शी फार संबंध राहिला नसला तरी हौसला अब भी बुलंद है :) .... अमोद ला कसे न्यायचे हा प्रश्न होताच ....पण मला कर्नाळ्याला च जायचे असल्याने त्यांना तयार केले .....उन्हाची धास्ती होतीच बाकीच्यांना पण म्हटलं कि कर्नाळ्यायेवढी झाडी कुठे असणं शक्य नाही आणि वारा ही अफलातून असतो...कसे बसे तयार केले सगळ्यांना.........
कर्नाळाच का......... १ तर तो सगळ्यात जवळ आहे .............. २ माझ्या पक्षी निरीक्षणाचा आणि पक्ष्यांचे फोटो काढण्याचा नव्याने लागलेला छंद जोपासता आला असता आणि कर्नाळा म्हणजेच लिंगोबाचा डोंगर ......जैत रे जैत ह्या चित्रपटातली मराठीतली काही अजरामर गाणी (जी माझी खूप आवडती आहेत) ज्या चित्रपटात आहेत त्याचे चित्रीकरण ही इथेच झालेय त्या मुळे तो ही १ धागा जुळलाय ......माझे शिक्षण (डिग्री चे) पेण म्हणजे ह्याच भागातले .........लग्नानंतर जोड्याने केलेला पहिला किल्ला असे एक ना अनेक धागे जुळले आहेत ह्या किल्लाय्शी ........पावसाळ्यात तर ह्याचे सौंदर्य अप्रतिम खुलते आणि वारा म्हणजे वारा असतो ....एवढा वारा मी फक्त eiffel वर च अनुभवला आहे ................. नभ उतरू आलं म्हणा काय किंवा हिरव्या रानात चावड चावड चालती म्हणा काय हे शब्दशः इथे अनुभवता येते आणि ही गाणी माझ्या अविस्मरणीय अनुभवात नेहमीच साथ सांगत करत आली आहेत .........जस कि पेण ला पावसाळ्याच्या सुरवातीला (पेपरच्या मधल्या PL मध्ये) पेंडश्यांच्या वाड्यात राजू ने मस्त जैत रे जैत ची गाणी लावलेली असायची आणि खिडकीतून पाउस अनुभवात ती गाणी क्लास च वाटायची (अजून वाटतात) ....... रिलायंस मध्ये असताना बस मधून प्रवास करताना ह्या गाण्यांवर चर्चा व्हायची आणि संध्याकाळी परतताना पिकनिक सारखे वातावरण असायचे ....मोस्टली गाणी म्हणत आम्ही यायचो आणि जीत रे जैत ची गाणी त्यात असायचीच .......असे कैक प्रसंग आहेत. .........फार च nostalgic झालो का????
तर शनिवारी सकाळी साधारण ७ ला निघायचे ठरले............सावत्या वगैरे अजून लवकर म्हणत होते पण फार लवकर उठणे मला काही जमत नाही.......सो परत ७ साठी सगळ्यांना convince केले.....शुक्रवारी च अमोद चा फोन आला कि त्याच्या सौ आजारी असल्याने त्याला यायला जमणार नाही (फेब. मध्येच त्याचं लग्न झाल असल्याने तो येईल असे वाटलं नव्हतं पण तो यायला हो म्हणाला हेच खूप होतं)........म आम्ही तिघं डोंबिवली वरून आणि अतुलला कळंबोलीला वाटेत बरोबर घेऊ असं ठरलं .........साधारण ७.३० ला आम्ही डोंबिवली सोडल्यावर अतुलला तयार राहा म्हणून फोन केला पण भाई नी उचललाच नाही ......आम्हाला वाटलं तयार होत असेल ......मग अजून १० मिनिटांनी केला परत उचलला नाही ........मग कळंबोली आल्यावर करू असे ठरले .......कळंबोली आल्यावर केला तरीही उचलेना......मग आम्ही फोन करण्याचा सपाटाच लावला. पण काही केल्या उचलेना मग आम्ही निष्कर्ष काढला की ह्याने कल्टी दिलीय .......मग आम्ही पुढे जाऊन पनवेलला नष्ट करण्यासाठी थांबलो ....माझा तर उपास होता आणि ट्रेक करताना सहसा मी फार तेलकट खात नाही... बाकी दोघांनी नाश्ता आणि मी चहा पिउन पुढे जाण्यास निघालो ........... कर्नाळ्याला पोहोचतो न पोहोचतो तर अतुल चा फोन की अरे आत्ता उठलो अन मी येतोय म आम्ही तिघे च होतो म ठरवलं थांबू.....नसतो थांबलो तरी त्याने गाठलेच असते म्हणा आम्हाला ..............
कर्नाळ्याला एन्ट्री करताना तुम्हाला काही अनामत रक्कम भरावी लागते आणि तुमच्या कडचे प्लास्टिक किंवा तत्सम आधीच सांगावे लागते.......... येताना जर तुम्ही ते जसेच्या तसे आणले तरच अनामत रक्कम परत मिळते..........पैशांसाठी का होईना लोकं किल्ल्यावर आणि अभायरण्यात कचरा करत नाहीत ......... आपल्यासारख्या बेशिस्त देशाला अशा काही कठोर उपयानीच काही शिस्त लागली तर ...........थोडं वर चढून गेल्यावर पुढे गेस्ट रूम आणि महिला बचत समितीची खानावळ आहे तिथे काही पिंजरे आहेत ......त्या पिंजऱ्यात जंगलात सापडलेले जखमी पक्षी वगैरे उपचारासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी ठेवतात आणि एकदा का ते व्यवस्थित तंदुरुस्त झाले की म्हणे ते जंगलात सोडतात पण मला काही तसे वाटले नाही मला ते प्रदर्शनासाठीच ठेवले असावेत असे वाटले . पहिल्या २-३ पिंजऱ्यात वेगवेगळ्या जातीचे पोपट होते..........पुढे एका पिंजऱ्यात १ मोर होता आणि त्याच्या पुढच्या पिंजऱ्यात मोर आणि लांडोर होते ....... त्या मोराने अचानक पिसारा फुलवला आणि नाचायला लागला .... आम्ही आजूबाजूला पपाहिले पण मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागला ह्याचे आश्चर्यच वाटले आणि आम्हास रेड कार्पेट वेलकम केल्यासारखे वाटू लागले....आणि मनुष्य स्वभावास अनुसरून बरेच फोटो ही काढले .......पण ही निव्वळ कवी कल्पना (पाउस पडायला लागला कि मोराचे नाचणे वगैरे) हे आम्हास ठाऊक आहे .....
तो मोर त्या लांडोरीला आकर्षित करण्यासाठी नाचत होता आणि ती लांडोर त्याच्याकडे ढुंकून हि पाहत नव्हती आणि सारखी त्या आधीच्या पिंजऱ्यात असलेल्या मोराकडे धाव घेई ...............इथे हि प्रेमाचा त्रिकोण पाहून आम्हास हसायला आले .......तेवढ्यात अतुल आला आणि मार्गक्रमणास सुरवात केली ... उन्हाचा तडाखा जाणवत च होता आणि पहिलाच १ चढ चढल्यावर प्रशांत बेंद्रे साहेबांनी ब्रेक ची आज्ञा केली ..... आता गड आम्हाला त्याच्याच चालीने चढायचा होता आणि त्यातून त्याचा पहिला ट्रेक........तिथे अतुलने आणलेला वडापाव खाण्याचा प्रोग्राम केला....
प्रशांत म्हणाला मी इथेच बसतो तुम्ही जाऊन या .......त्याला समजावून पुढे चालण्यास तयार केले.........फारशी गर्दी आणि trekkers नव्हते....जरा पुढे गेल्यावर १ बरयापैकी सपाट जागा होती आणि झाडी ही होती उन्हामुळे त्यांनी आपली पानं गाळून भार कमी केला होता तरीही शेंड्याकडे बरीच पानं होती ...आता मला पक्ष्यांची चाहूल लागली .....बरेच छोटे छोटे पक्षी , कोतवाल, सातभाई म रान चिमण्या ह्यांची वटवट चालू होती आणि तेवढ्यात एका हळद्याचे दर्शन झाले आणि माझा येण्याचा उद्देह्श सफल झाल्यासाखे वाटले सुरवातीलाच.......हळद्या चा पिवळा रंग काय वर्णावा ....तोडच नाही .....
बाकीचे सावलीत पुढे थांबले होते सो मला पण जाणे गरजेचे होते....आता एक मोठा चढ चढायचा होता जो चढला कि म फार काही चढण नव्हती ... मोकळा plateu च चालायचं होता ......पण हा चढ चढताना वाट लागणार ह्याची जाणीव होती आणि त्यात बरेच थांबे घ्यावे लागणार हे ही माहित होते ......त्या प्रशांत मध्ये उत्साह पेरण्याचे काम सावत्याने अंगावर घेतले होते आणि तो त्याचे काम चोख पार पडतोच....तो एकदा भूमिकेत शिरला की त्याला थोपवणे कठीण असते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ह्या चढणावर झाडी असल्याने उन आमच्यापर्यंत पोहोचत नव्हते ,,,,,,,,,,कर्नाळा आवडण्यामागचे हेच तर कारण आहे न भाऊ....पाहिजे तेव्हा पाहिजे त्या झाडाखाली पथारी पसरता येते .........
तो चढ चढल्यावर पुढे सपाटीच्या जागी शेड आणि बेंचेस बांधलेत विश्रांतीसाठी आणि हे बर्याच ठकाणी करण्यात आलंय.....हि नवीन development .....कदाचित डोंगरावर असलेल्या देवाच्या उत्सवासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी असावी ................. आता पाठीमागे रसायनी तिथून जाणारी कोंकण रेल्वे आणि रसायनी चा औद्योगिक विभाग स्पष्ट दिसत होतं....आता अजून एक चढ (पण मगाचच्या पेक्षा कमी) ती चढली कि सपाटीचा रस्ता आणि किल्ल्याच्या प्रवेशदाराशी असणाऱ्या पायथ्यांशी ........ती चढ एका दमात चढली आणि पुढे बांधलेल्या शेड मध्ये अंग टाकून दिला ....वारा ही होता छान आणि थंड वाटत होते ...गटागट पाण्याच्या बाटल्या संपवल्या आता आणि पडून होतो कित्येक वेळ....थंड फरशीवर शेड खाली .... सावत्या म्हणाला आता कळले की कुत्री पाणवठ्याजवळ किंवा ओल्या जागी जीभ काढून का बसतात ...........कधीही त्याला काहीही उपमा सुचू शकतात .....तसाही कुत्र्यांचा न त्याचा फार जवळचा संबंध आहे .....दत्तगुरूंच्या पायाशीही एवढी कुत्री नसतात जेव्हढी सावत्याच्या पायाशी असतात (इति deadley ) ....
तिथून उठावेसे वाटत नव्हते पण आपले लक्ष्य पुढचे असल्याकारणाने पुढे जाणे गरजेचे होते ....किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच भव्य लिंगोबा दिसतो (आमच्या अतुल ने मागच्याच आठवड्यात लिंगोबासर केला होता) आणि परत सर करूया का असा विचार आला पण नसते धाडस नको म्हणून तो विचार मनातच गिळला ....एका ट्रेकर चा लिंगोबा सर करतना अपघाती मृत्यू झाल्यानंतर तिथे चढाईस बंदी आहे आणि वर चढताना दोरी वगैरे सामुग्रीही लागते ....आता आम्हास पाणी हवे होते आणि समोर लिंगोबाच्या गुहेतील पाणी खराब होऊ नये म्हणून त्यावर जाळ्यांचे कव्हर टाकले होते ....ते उचकटावेसे वाटत नव्हते म्हणून अजून कुठे पाणी आहे का टाक्यांमध्ये ह्याची पाहणी करत आम्ही पाठच्या बाजूला आलो........
पाठच्या बाजूला थोडे traverse मारल्यावर आत गुहेमध्ये १ टाके आहे पाण्याचे ...आणि पाठच्या बाजूला खूप शांत वाटत होते आणि भर उन्हाची वेळ असून ही अफलातून थंडगार वर वाहत होता ..... आणि मुख्य म्हणजे किल्ल्यावर आम्ही आणि अजून कुणी १-२ जन असतील फारतर ....पण पाणी थोडे आत गुहे मध्ये होते आणि थोडे traverse मारून जावे लागणार होते .... अतुल सराईत असल्यामुळे पटकन गेला आणि त्याने आमची तहान भागवण्याचे काम केले.....मग सावत्या गेला.... प्रशांत आणि मी सुरवातीला गेलो नाही पण डर के आगे जीत है म्हणत मी हि गेलो ....पण प्रशांत काही आला नाही....त्या गुहेच्या (पाण्याच्या टाक्याच्या) तोंडाशी मस्त पाय टाकून आम्ही बसलो....एवढं अफलातून वाटत होतं .......गुहेतलं म्हणजे टाक्यातल पाणी आत कातळ असल्यामुळे थंड होतं आणि वारा गुहेत जाऊन आतील थंड पाण्यामुळे अजून थंड येउन बाहेर परत येत होता ........ घरातला A C . झक मारेल त्या हवेपुढे.....आणि समोर नजर जाईल तेथवर कोकणचा भव्य मुलुख दिसत होता .......... कर्नाळ्याच महत्वच बोर घाटावर लक्ष ठेवण्यासाठी होतं जो कोंकण आणि विदर्भाला जोडतो .....सध्या आम्ही कोकणावर लक्ष ठेऊन होतो :)
बाजूलाच पानोरमा रिसोर्ट मध्ये DJ वर गाणी वाजत होती ....तिथे असणाऱ्या लोकांची आम्हाला कीव वाटली ......आम्ही थोडाच वेळ तिथे होतो पण प्रशांत एकटाच खाली असल्याने आम्हाला पटकन उतरणे भाग होते ...ते स्वर्गीय सुख मोडवत नव्हते पण प्रशांतने त्याच्या मानाने खूप धीर धरला आणि आता त्याच्या सहनशक्तीची आम्हाला कल्पना असल्याने पुढची स्तुती -सुमनं ऐकण्याआधी आम्ही खाली उतरलो .....
आता परतीच्या मार्गाला लागणे भाग होते आणि आमच्या बरोबर आणलेला शिधा हि संपवावा अशी जाणीव झाली...प्रशांतने येता येता एक मोक्याची जागा पहिली होती....झाडांची सावली होती ...वारा अफलातून वाहत होताआणि खालची खोल दरी पण सुंदर भासत होती ..... तिथेचं जाऊन आम्ही निवांत पसरलो ......वेफर्स , मोसंबी असा माझा सात्विक आहार आणि उपास नसलेल्यांनी ब्रेड बटर आणि आम्लेट असा चौरस आहार करून आम्ही क्षुधा शांती केली आणि आता त्या झाडाखालीच निवांत पसरलो ....सावलीत खूप छान झोप लागली ....हे सुख घेण्यासाठीच तर कर्नाळ्याची निवड केली होती ....निवांत जागी कोणाची गडबड नाही , कोलाहल नाही .... अशा जागी झोप किंवा लोळत पडण्यास किती मजा असते हे सांगून समजायचे नाही ....
.काही ग्रुप जे देवीच्या दर्शनाला आले असावेत असे वाटले ते जाता जाता आमच्याकडे पाहून जायचे आणि त्यांची काही कुजबुज चालायची .....कदाचित हेवा च वाटत असेल आमचा त्यांना.....थोडा वेळ झाल्यावर आमचे अतिसाहानशील व्यक्तिमत्व प्रशांत ह्यांची चुळबुळ चालू झाली आणि आम्हाला आता निघावे लागेल ह्याचे संकेत मिळाले......आम्हास फार आश्चर्य वाटते कि देव नेमके patience कसे द्यायला विसरला .... एखाद्या ठिकाणी ह्यांना जाण्याची फार घाई असते आणि एकदा गेलो की त्याचा मनसोक्त आस्वाद घ्यावा की नाही पण ह्यांना फक्त त्या जागी गेलो ह्यातच समाधान असते आणि पोहोचलो त्या जागी की तेवढीच निघायची ही घाई ....... असो
वाटेत उतरत उतरत माझे पक्षी निरीक्षण चालूच होते आणि मला एक छोटा धनेश हि दिसला पण टिपता (म्हणजे कॅमेरा मध्ये) काही आला नाही ....वातावरण आता बरेच निवळले होते आणि पक्ष्यांचा मुक्त विहार चालू होता पण ते फार आत झाडींमध्ये असल्याने माझ्या लेन्सेस पोहोचत नव्हत्या ..... आता पायथ्याच्या जवळ आलो होतो न आम्हाला काही प्रेमीयुगुल दिसले ....कॉलेज मधलीच पोरं असतील ....आणि कर्नाळ्याचसारखी निवांत जागा त्यांना कुठे भेटणार होती प्रेमाच्या आणा-भाका घ्यायला ...आम्ही त्यांना डिस्टर्ब न करता चालत होतो आणि काहीच अंतरावर २-३ जोड्या आमचीच वाट पाहत उभ्या होत्या....झाले असे होते कि ते उतरत असता त्यांच्या समोरच एक साप खाली पडला ..... झाडावरून की एखाद्या पक्ष्याने त्यास मारण्यासाठी वरून सोडून दिल्यामुळे कुणास ठाऊक पण पडला खरे.... आणि त्यामुळे ते घाबरले होते आणि कोणाची पुढे जाण्याची हिम्मत होईना....तो साप वरून पडल्याने अर्धमेला झाला होता आणि हाडं मोडल्याने हालचालपण करू शकत नव्हता .... सावत्या आणि अतुल ने पुढे होऊन त्याला रस्त्याच्या बाजूला केले आणि सगळ्यांचा मार्ग सुकर केला.....
अर्धमेला झालेला साप
आत उतरून महिलाबाचत गटाची खानावळ आहे तिथे आलो आणि चहाची नितांत आवश्यकता जाणवायला लागली आणि माझ्या शरीरातली चहाची लेवल तर फार पटकन कमी होते :) ......पण बाकीच्यांच्या आग्रहामुळे 3-४ ग्लास लिंबू सरबत घेऊन ती कमतरता भरून काढली सर्वानीच .....मग पोटभर जेवण झाले नसल्याने अतुल ने जेवणाची ऑर्डर मग बराच वेळ होता म्हणून मी परत पक्षी निरीक्षणासाठी गेलो आणि मला शिकारी बुलबुल चे काही चांगले फोटो मिळाले ....परत आलो तर बाकीचे तिघे मस्त चटई वगैरे घालून वन-भोजनाचा आनंद घेत होते .....बटाट्याची भाजी आणि फोडणीचे वरण/आमटी (डाळ) फार च tempting वाटत होते .........पण माझा उपास :( ....
आता आम्ही उतरायच्या तयारीस लागलो होतो पण तिथे पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या लोकांसाठी खास तयार केलेल्या मार्गिके वरून जायची हुक्की आली आणि बाकीच्यांना पुढे पाठवले .... थोडा वेळ मी फिरलो असेन नसेन म मला प्रशांत चा चेहरा आणि त्याची चल - बिचल आठवली आणि क्षणाचाही विचार न करता मागे फिरलो ...उगाच शिव्या कोण खाणार :) ...तरी नंतर कळलेच मला कि माझ्या नावाने गजर केलाच त्याने :) .....परत मगाचच्या मोराच्या पिंजर्याकडे आलो ...तर तो मोर अजून ही पिसारा फुलवून नाचत होता आणि ती लांडोर शेजारच्या पिंजर्याकडे अधीर झालेली ..... पण त्या मोराने त्या लांडोरीची निर्भया मात्र केली नव्हती ..... एकाच पिंजऱ्यात राहून ही... खरच आपण फक्तच शिक्षित झालोय पण प्राणीमात्र न शिकता सवरता सुशिक्षित आहेत हे जाणवून गेले .....असो
अतुल आम्हास आपट्या वरून नदीकिनार्या जवळून पनवेलला जाणारा जो रस्ता जो तिथून जा असे सांगत होता पण प्रशांतचे patience आता संपलेले आणि घरचे वेध लागलेले त्याला .......वाटेत त्याने चहा साठी पण गाडी थांबवली नाही ह्या वरून कल्पना यावी .....पण एकंदरीतच छानट्रेक झाला छोटासा आणि पुढच्या वेळी कर्नाळ्याला यायला कारण आहेच वन भोजनाचा आणि चविष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी ..............
आता तर पावसाळा चालू झाला आहे आणि कर्नाळ्याने हिरवे गालिचे अंथरले असतील आमच्या स्वागतासाठी .....अगदीच कुठे जाणे नाही झाले तर कर्नाळा आहेच...अगदी हक्काच्या माणसासारखा...............
फोटोसाठी इथे क्लिक करा
https://plus.google.com/photos/115038496210123492293/albums/6035177022458228129?authkey=CIin-Nqj8quAcA
ह्या मार्च-एप्रिल मध्ये आमचे बरेच मनसुबे होते - वेळास, ताडोबा -अंधेरी व्याघ्रप्रकल्प , एखादा सागरी किल्ला वगैरे वगैरे........... पण ऑफिसमध्ये ही बरीच कामं होती, घरी ही काही कामं होती अन अमेय हि मलेशिया ला गेला होता डेप्यूटेशन वर ............ अगदीच कुठे गेलो नाही असे व्हयला नको...bagpackers ला लांच्छनास्पद ठरले असते आणि क्षीण ही थोडा घालवायचा होता ....... मग मी प्रशांत बेंद्रे, अतुल सावत्या न अमोद असे जायचे ठरले ...बाकी कोणी कर्नाळ्याला एप्रिल च्या उन्हात येईल ही सुतराम शक्यता नव्हती......आमचे ही बरेच पर्याय चाचपून झाले खास करून प्रशांत बेंद्रे साठी (त्याची मानसिक तयारी होत नव्हती) बाकीच्यांचा प्रश्न नव्हता कारण अतुल काटक आहे, सावत्या obess असला तरी त्याच्यात उत्साह फार आहे न माझा ट्रेक शी फार संबंध राहिला नसला तरी हौसला अब भी बुलंद है :) .... अमोद ला कसे न्यायचे हा प्रश्न होताच ....पण मला कर्नाळ्याला च जायचे असल्याने त्यांना तयार केले .....उन्हाची धास्ती होतीच बाकीच्यांना पण म्हटलं कि कर्नाळ्यायेवढी झाडी कुठे असणं शक्य नाही आणि वारा ही अफलातून असतो...कसे बसे तयार केले सगळ्यांना.........
कर्नाळाच का......... १ तर तो सगळ्यात जवळ आहे .............. २ माझ्या पक्षी निरीक्षणाचा आणि पक्ष्यांचे फोटो काढण्याचा नव्याने लागलेला छंद जोपासता आला असता आणि कर्नाळा म्हणजेच लिंगोबाचा डोंगर ......जैत रे जैत ह्या चित्रपटातली मराठीतली काही अजरामर गाणी (जी माझी खूप आवडती आहेत) ज्या चित्रपटात आहेत त्याचे चित्रीकरण ही इथेच झालेय त्या मुळे तो ही १ धागा जुळलाय ......माझे शिक्षण (डिग्री चे) पेण म्हणजे ह्याच भागातले .........लग्नानंतर जोड्याने केलेला पहिला किल्ला असे एक ना अनेक धागे जुळले आहेत ह्या किल्लाय्शी ........पावसाळ्यात तर ह्याचे सौंदर्य अप्रतिम खुलते आणि वारा म्हणजे वारा असतो ....एवढा वारा मी फक्त eiffel वर च अनुभवला आहे ................. नभ उतरू आलं म्हणा काय किंवा हिरव्या रानात चावड चावड चालती म्हणा काय हे शब्दशः इथे अनुभवता येते आणि ही गाणी माझ्या अविस्मरणीय अनुभवात नेहमीच साथ सांगत करत आली आहेत .........जस कि पेण ला पावसाळ्याच्या सुरवातीला (पेपरच्या मधल्या PL मध्ये) पेंडश्यांच्या वाड्यात राजू ने मस्त जैत रे जैत ची गाणी लावलेली असायची आणि खिडकीतून पाउस अनुभवात ती गाणी क्लास च वाटायची (अजून वाटतात) ....... रिलायंस मध्ये असताना बस मधून प्रवास करताना ह्या गाण्यांवर चर्चा व्हायची आणि संध्याकाळी परतताना पिकनिक सारखे वातावरण असायचे ....मोस्टली गाणी म्हणत आम्ही यायचो आणि जीत रे जैत ची गाणी त्यात असायचीच .......असे कैक प्रसंग आहेत. .........फार च nostalgic झालो का????
तर शनिवारी सकाळी साधारण ७ ला निघायचे ठरले............सावत्या वगैरे अजून लवकर म्हणत होते पण फार लवकर उठणे मला काही जमत नाही.......सो परत ७ साठी सगळ्यांना convince केले.....शुक्रवारी च अमोद चा फोन आला कि त्याच्या सौ आजारी असल्याने त्याला यायला जमणार नाही (फेब. मध्येच त्याचं लग्न झाल असल्याने तो येईल असे वाटलं नव्हतं पण तो यायला हो म्हणाला हेच खूप होतं)........म आम्ही तिघं डोंबिवली वरून आणि अतुलला कळंबोलीला वाटेत बरोबर घेऊ असं ठरलं .........साधारण ७.३० ला आम्ही डोंबिवली सोडल्यावर अतुलला तयार राहा म्हणून फोन केला पण भाई नी उचललाच नाही ......आम्हाला वाटलं तयार होत असेल ......मग अजून १० मिनिटांनी केला परत उचलला नाही ........मग कळंबोली आल्यावर करू असे ठरले .......कळंबोली आल्यावर केला तरीही उचलेना......मग आम्ही फोन करण्याचा सपाटाच लावला. पण काही केल्या उचलेना मग आम्ही निष्कर्ष काढला की ह्याने कल्टी दिलीय .......मग आम्ही पुढे जाऊन पनवेलला नष्ट करण्यासाठी थांबलो ....माझा तर उपास होता आणि ट्रेक करताना सहसा मी फार तेलकट खात नाही... बाकी दोघांनी नाश्ता आणि मी चहा पिउन पुढे जाण्यास निघालो ........... कर्नाळ्याला पोहोचतो न पोहोचतो तर अतुल चा फोन की अरे आत्ता उठलो अन मी येतोय म आम्ही तिघे च होतो म ठरवलं थांबू.....नसतो थांबलो तरी त्याने गाठलेच असते म्हणा आम्हाला ..............
कर्नाळ्याला एन्ट्री करताना तुम्हाला काही अनामत रक्कम भरावी लागते आणि तुमच्या कडचे प्लास्टिक किंवा तत्सम आधीच सांगावे लागते.......... येताना जर तुम्ही ते जसेच्या तसे आणले तरच अनामत रक्कम परत मिळते..........पैशांसाठी का होईना लोकं किल्ल्यावर आणि अभायरण्यात कचरा करत नाहीत ......... आपल्यासारख्या बेशिस्त देशाला अशा काही कठोर उपयानीच काही शिस्त लागली तर ...........थोडं वर चढून गेल्यावर पुढे गेस्ट रूम आणि महिला बचत समितीची खानावळ आहे तिथे काही पिंजरे आहेत ......त्या पिंजऱ्यात जंगलात सापडलेले जखमी पक्षी वगैरे उपचारासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी ठेवतात आणि एकदा का ते व्यवस्थित तंदुरुस्त झाले की म्हणे ते जंगलात सोडतात पण मला काही तसे वाटले नाही मला ते प्रदर्शनासाठीच ठेवले असावेत असे वाटले . पहिल्या २-३ पिंजऱ्यात वेगवेगळ्या जातीचे पोपट होते..........पुढे एका पिंजऱ्यात १ मोर होता आणि त्याच्या पुढच्या पिंजऱ्यात मोर आणि लांडोर होते ....... त्या मोराने अचानक पिसारा फुलवला आणि नाचायला लागला .... आम्ही आजूबाजूला पपाहिले पण मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागला ह्याचे आश्चर्यच वाटले आणि आम्हास रेड कार्पेट वेलकम केल्यासारखे वाटू लागले....आणि मनुष्य स्वभावास अनुसरून बरेच फोटो ही काढले .......पण ही निव्वळ कवी कल्पना (पाउस पडायला लागला कि मोराचे नाचणे वगैरे) हे आम्हास ठाऊक आहे .....
तो मोर त्या लांडोरीला आकर्षित करण्यासाठी नाचत होता आणि ती लांडोर त्याच्याकडे ढुंकून हि पाहत नव्हती आणि सारखी त्या आधीच्या पिंजऱ्यात असलेल्या मोराकडे धाव घेई ...............इथे हि प्रेमाचा त्रिकोण पाहून आम्हास हसायला आले .......तेवढ्यात अतुल आला आणि मार्गक्रमणास सुरवात केली ... उन्हाचा तडाखा जाणवत च होता आणि पहिलाच १ चढ चढल्यावर प्रशांत बेंद्रे साहेबांनी ब्रेक ची आज्ञा केली ..... आता गड आम्हाला त्याच्याच चालीने चढायचा होता आणि त्यातून त्याचा पहिला ट्रेक........तिथे अतुलने आणलेला वडापाव खाण्याचा प्रोग्राम केला....
प्रशांत म्हणाला मी इथेच बसतो तुम्ही जाऊन या .......त्याला समजावून पुढे चालण्यास तयार केले.........फारशी गर्दी आणि trekkers नव्हते....जरा पुढे गेल्यावर १ बरयापैकी सपाट जागा होती आणि झाडी ही होती उन्हामुळे त्यांनी आपली पानं गाळून भार कमी केला होता तरीही शेंड्याकडे बरीच पानं होती ...आता मला पक्ष्यांची चाहूल लागली .....बरेच छोटे छोटे पक्षी , कोतवाल, सातभाई म रान चिमण्या ह्यांची वटवट चालू होती आणि तेवढ्यात एका हळद्याचे दर्शन झाले आणि माझा येण्याचा उद्देह्श सफल झाल्यासाखे वाटले सुरवातीलाच.......हळद्या चा पिवळा रंग काय वर्णावा ....तोडच नाही .....
हळद्या |
तो चढ चढल्यावर पुढे सपाटीच्या जागी शेड आणि बेंचेस बांधलेत विश्रांतीसाठी आणि हे बर्याच ठकाणी करण्यात आलंय.....हि नवीन development .....कदाचित डोंगरावर असलेल्या देवाच्या उत्सवासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी असावी ................. आता पाठीमागे रसायनी तिथून जाणारी कोंकण रेल्वे आणि रसायनी चा औद्योगिक विभाग स्पष्ट दिसत होतं....आता अजून एक चढ (पण मगाचच्या पेक्षा कमी) ती चढली कि सपाटीचा रस्ता आणि किल्ल्याच्या प्रवेशदाराशी असणाऱ्या पायथ्यांशी ........ती चढ एका दमात चढली आणि पुढे बांधलेल्या शेड मध्ये अंग टाकून दिला ....वारा ही होता छान आणि थंड वाटत होते ...गटागट पाण्याच्या बाटल्या संपवल्या आता आणि पडून होतो कित्येक वेळ....थंड फरशीवर शेड खाली .... सावत्या म्हणाला आता कळले की कुत्री पाणवठ्याजवळ किंवा ओल्या जागी जीभ काढून का बसतात ...........कधीही त्याला काहीही उपमा सुचू शकतात .....तसाही कुत्र्यांचा न त्याचा फार जवळचा संबंध आहे .....दत्तगुरूंच्या पायाशीही एवढी कुत्री नसतात जेव्हढी सावत्याच्या पायाशी असतात (इति deadley ) ....
तिथून उठावेसे वाटत नव्हते पण आपले लक्ष्य पुढचे असल्याकारणाने पुढे जाणे गरजेचे होते ....किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच भव्य लिंगोबा दिसतो (आमच्या अतुल ने मागच्याच आठवड्यात लिंगोबासर केला होता) आणि परत सर करूया का असा विचार आला पण नसते धाडस नको म्हणून तो विचार मनातच गिळला ....एका ट्रेकर चा लिंगोबा सर करतना अपघाती मृत्यू झाल्यानंतर तिथे चढाईस बंदी आहे आणि वर चढताना दोरी वगैरे सामुग्रीही लागते ....आता आम्हास पाणी हवे होते आणि समोर लिंगोबाच्या गुहेतील पाणी खराब होऊ नये म्हणून त्यावर जाळ्यांचे कव्हर टाकले होते ....ते उचकटावेसे वाटत नव्हते म्हणून अजून कुठे पाणी आहे का टाक्यांमध्ये ह्याची पाहणी करत आम्ही पाठच्या बाजूला आलो........
पाठच्या बाजूला थोडे traverse मारल्यावर आत गुहेमध्ये १ टाके आहे पाण्याचे ...आणि पाठच्या बाजूला खूप शांत वाटत होते आणि भर उन्हाची वेळ असून ही अफलातून थंडगार वर वाहत होता ..... आणि मुख्य म्हणजे किल्ल्यावर आम्ही आणि अजून कुणी १-२ जन असतील फारतर ....पण पाणी थोडे आत गुहे मध्ये होते आणि थोडे traverse मारून जावे लागणार होते .... अतुल सराईत असल्यामुळे पटकन गेला आणि त्याने आमची तहान भागवण्याचे काम केले.....मग सावत्या गेला.... प्रशांत आणि मी सुरवातीला गेलो नाही पण डर के आगे जीत है म्हणत मी हि गेलो ....पण प्रशांत काही आला नाही....त्या गुहेच्या (पाण्याच्या टाक्याच्या) तोंडाशी मस्त पाय टाकून आम्ही बसलो....एवढं अफलातून वाटत होतं .......गुहेतलं म्हणजे टाक्यातल पाणी आत कातळ असल्यामुळे थंड होतं आणि वारा गुहेत जाऊन आतील थंड पाण्यामुळे अजून थंड येउन बाहेर परत येत होता ........ घरातला A C . झक मारेल त्या हवेपुढे.....आणि समोर नजर जाईल तेथवर कोकणचा भव्य मुलुख दिसत होता .......... कर्नाळ्याच महत्वच बोर घाटावर लक्ष ठेवण्यासाठी होतं जो कोंकण आणि विदर्भाला जोडतो .....सध्या आम्ही कोकणावर लक्ष ठेऊन होतो :)
हीच ती जागा जिथे a c ही झक मारेल |