गल्फमधे नोकरीला आलं की एक टार्गेट असतं दुबई बघायचं, त्या शिवाय तुमच्या गल्फ वारीची पूर्तता होत नाही... आता साधारण दोन वर्ष होत आलीत इथल्या वाळवंटात येऊन पण अजून काही दुबई वारीचा योग नव्हता आला ... म्हणजे एकतर पहिल्या वर्षात आर्थिक दृष्ट्या थोडा स्थिरस्थावर व्हायचा असतं न दुसरं म्हणजे सुट्टी आली की किंवा वार्षिक रजेच्या वेळी आपला मोहन भार्गव होऊन जातो आणि कधी एकदा स्वदेशला पाय लागतात असे होऊन जाते..ह्या ही वर्षी योग दिसत नव्हता पण सध्या वाळवंटातले वारे खराब वाहत आहेत मग ईदच्या सुट्टीसाठी घरी जायचा विचारच नाही आणला मनात आणि आयत्या वेळी विमान कंपन्या एवढी किंमत वाढवतात की तिकिट विकत घ्यायची आपली ऐपत राहत नाही....त्यात ऑफिसमधल्या एकाने पिल्लू सोडलं की सुट्टीत काय करणार 5 दिवस चला दुबईला जाऊ मग जाऊन आलेल्या एकाने असं काही वर्णन केलं की मग इलाही मेरा दिल चाहे सुरू झालं ... मग काय माहिती, चौकशी आणि चर्चा सुरू झाल्या ...
शेवटी भावेश भाई म्हणून एक दुबईच्या eclipse tourism च्या सेल रेप्रेसेंटेटिव्हला गाठले ...आमच्या कंपनीतली बरीचशी लोक त्याच्या कडून जाऊन आल्याने न त्यांचा त्याच्याबद्दल फीडबॅक चांगला होता ज्याचा अनुभव आम्हाला आलाच पुढे ... पण negotiate करताना फार नाकीनऊ आणले...जायच्या 3 दिवस आधीपर्यंत जायच बुकिंग नव्हत बाकी सगळं तयार होत, म्हणजे हॉटेल बुकिंग, दुबई प्रोग्राम आणि व्हिसाही .. शेवटी सर्वच दृष्ट्या सोयीस्कर (आर्थिक वगळता) fly dubai ने fly करायचा ठरवलं .... दुबईच्या भव्य दिव्याच्या हव्यासाची प्रचिती fly dubai च्या टर्मिनल वर आल्या आल्याच येते... म्हणजे fly dubai ही low cost aviation company असून ही तिचे स्वतःचे एक टर्मिनल आहे.. ओमान - दुबई हा विमान प्रवास फार तर 1 तासाचा .... दुपारी आम्ही हॉटेल वर होतो...पहिल्या दिवशी आमची मरीना dhow cruise होती ....dhow cruise ची 2 तासांची निवांत सफर नव्या दुबईच्या स्कायलाईनचे दर्शन घडवते आणि दुबईच्या ह्या पहिल्याच दर्शनाने माणूस अचंबीत होऊन जातो आणि प्रेमात पडतो.. dhow cruise च्या धक्क्यावर आम्ही आल्या आल्याचं किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते पण त्या धक्कयावर फारच आर्द्रता असल्याने कॅमेराच्या लेन्सवर लगेच बाष्प जमायचे आणि फोटो धूसर येत होते... शेवटी कॅमेरा बंद करून ठेवला पण सुदैवाने आमची cruise येईस्तोवर आर्द्रता कमी झाली आणि मनासारखे फोटो काढता आले ....वेगवेगळ्या आकाराच्या आणि उंच उंच बिल्डींग्स पाहून इथल्या अराबांविषयी कमाल वाटू लागली .... architect ने फक्त त्याच्या डोक्यातली कल्पना कागदावर उतरवावी आणि ह्या अरबांनी ते करून टाकावे अशातला प्रकार ... खास करून muscat वरून आल्यावर तर दुबई निशब्दच करून टाकते...(फोटोसाठी ह्या साखळी वर टिचकी मारा Dubai Diary : Day 1 @ Marina Dhow Cruise)
जगातल्या सगळ्या प्रमुख शहरात त्यांची स्कायलाईन दाखवण्याची व्यवस्था करण्यात आलीय...बाकीच्या देशांनी त्यांच्या नैसर्गिक स्रोतांचा उत्तम प्रकारे वापर केलाय... दुबई ने तर क्रीक बांधून त्यात समुद्राचे पाणी खेळवलेय आणि आणि अशा डिनर cruises आयोजित केल्यात ...पण दुर्दैवाने आपल्याकडे ह्यातली काही व्यवस्था नाही ... कारण इच्छाशक्ती नाही ... आहे त्या स्रोतांची गटारं करून टाकलीत आणि नवीन बांधायचे तर तशी इच्छाशक्ती नाही आणि चुकून उसने अवसान आणलेच तर पर्यावरणवादी वगैरे त्याला पन्नास फाटे फोडणार ...त्यामुळे आपण फक्त अचंबित व्हायचे
दुसऱ्या दिवशी आमची दुबई सिटी टूर , दुबई मॉल आणि अरबांचे प्रतिष्टेचे प्रतीक बुर्ज खलिफा चे दर्शन असणार होते... प्रत्यक्षात हा सगळं कार्यक्रम तिसऱ्या दिवशी होत आपण आम्हाला बुर्ज खलिफाचे तिसऱ्या दिवशीचे prime time तिकिट नव्हते मिळाले आणि दुसऱ्या दिवशीचे मिळत असल्याने हा छोटासा बदल करण्यात आला...
दुबई टूर च्या वेळी तो भावेश भाई स्वतः ही होता दुबई ची माहिती द्यायला....जुनं दुबई (बर दुबई आणि डेहरा दुबई) दाखवलं... मीरा बाजार मधून ही फिरवलं ....मीरा बाजार म्हणजे तर चक्क मुंबईतला भेंडी बाजारच आणून बसवलाय ... सगळॆ भारतीय आणि पाकड्यांची दुकानं त्यांचीच वस्ती... अरब त्या भागात औषधाला ही सापडत नाहीत ...इव्हन वडा पाव आणि पाणी पुरी ही मिळते आणि मीना बाजार आमच्या हॉटेल पासून 5-10 मिनीटाच्याच अंतरावर असल्याने आम्हाला रात्रीच्या जेवण्याचा काही प्रश्नच उरला नाही ,... मीना बाजार अजून एका गोष्टी साठी प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे ब्रँडेड घडाळ्यांची first copy ... rado , tag heuer , michael kors , armani birmani असल्या महागडया घडाळ्यांची first कॉपिय मिळते आणि अक्षरशः काही ही फरक नाही ओरिजिनल आणि कॉपिय मध्ये (फक्त आत मधला मशीन सिको वगैरे लोकल कंपन्यांचे बसवतात) ते घेताना मात्र तुमची ओळख पाहिजे आणि bargaining skills , ते असले तर 2500$ ची घड्याळ तुम्ही 50$ मध्ये मिळवू शकता ... डेहरा दुबई मध्ये गोल्ड souq आहे .. souq म्हणजे मार्केट किंवा बाजार.... सोन्याची दुकानं अशी शेकड्यात लागून आहेत...नशिबाने तो ईद चा दिवस असल्याने दुकानं बंद होती आणि आमच्या खिशाला काही चाट नाही पडली ... ते झाल्यावर दुबईच्या जुमेरा भागातून फिरलो हा जुमेरा भाग म्हणजे आपली दक्षिण मुंबई ... अति श्रीमंतांचा भाग... तिकडे एक भागात काही सरकारी बंगले आहेत ...त्यांच्याविषयी सांगितलं जातं की ते बंगले सरकारने गरिबांसाठी बांधले होते (बघा गरिबांसाठी ही बंगले आणि आपण गरिबांना अन्न वस्त्र आणि निवारा ही देताना मारामार) तर त्यांच्याकडे असे काही अर्ज च नाही आले मग सरकारने ते श्रीमंतांना घ्यायची विनंती केली तर श्रीमंतांनी घेतले नाहीत कारण ते बांधले होते गरिबांसाठी म्हणजे त्यांची गणती गरीबांमध्ये ...शेवटी त्या श्रीमंतांनी ते घेऊन त्यांच्या कंपन्यांमध्ये कामाला असलेल्या expatschi राहायची व्यवस्था केलीय ...
तिथूनच पुढे बुर्ज अल-अरब म्हणून 7 स्टार हॉटेल आहे...त्या बुर्ज अल-अरब च्या स्काय लॉन्ज मध्ये म्हणे सोन्याच्या ग्लासातून मदिरा दिली जाते आणि दारू पिऊन झाल्यावर तो ग्लास तुम्हाला भेट दिला जातो...आता ह्या सगळ्या आख्यायिकाच असाव्यात कारण कोण जाऊन पाहणार खरे काय नि खोटे काय ते... त्याच पाल्म जुमेरा वर पुढे वेगवेगळी थिम हॉटेल्स आहेत ...एक तर चक्क व्हेनिस च्या धर्तीवर बांधलय म्हणजे तिथल्या वेगवेगळ्या बंगल्यांमध्ये जायच तर जलवाहतूक करून ... जल वाहतुकीवरून लक्षात आला... सध्या तिथे 33 km क्रीक बांधायचा काम चालू आहे ... जलवाहतूक आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी .. चालना देणं हा शब्द वापरलाय खरा पण तो अजिबात उचित नाही कारण चालना अशा गोष्टींना देतात के जेणे करून पर्यटक आकर्षित होतील आणि तिथल्या लोकांना काही रोजगार मिळेल...पण दुबई हे तर खरंच जगात प्रसिद्ध पावलंय पर्यटनासाठी ... आणि वर्षाचे 12 महिने 24 काळ दुबई हे टूरिस्ट्स ने भरून अखंड वाहत असतं... असो तर त्या क्रीक मधून पाणी खेळवून शेवटी ते समुद्रात नेऊन सोडणार ...त्या पाण्याचा उपयोग जलवाहतूक आणि पर्यटनासाठी ...बर दुबई आणि डेहरा दुबई ह्या छोटयाशा अंतरासाठी ही जल वाहतूक चालते आणि एकदम स्वस्तात ... आपल्या इथे पाण्याचा उपयोग फक्त पेटवण्यासाठी (लोकांची मने) केला जातो.. असो ...
तिथून पुढेच पाल्म जुमेरा ही जगप्रसिद्ध कृत्रिम बेटांची कॉलोनी आहे आणि त्याच्या शेवटी पाल्म अटलांटिस हे 7 स्टार हॉटेल (इथेच Happy New Year ह्या फराह खान आणि शाहरुख ह्या जोडगोळीला अत्यंत टुकार चित्रपटाचं शूटिंग झाल होतं).. तर ह्या पाल्म जुमेरा बेटांचा आकार पाल्म तरी आणि त्याच्या फांद्यांसारखा आहे आणि प्रत्येक फांदीच्या मधून सेन्ट्रल रोड पर्यंत पाणी खेळवलंय आणि त्या फांद्या म्हणजे एक एक गल्लीच असल्यासारखा आहे आणि त्या गल्ल्यामंध्ये private villas ... आणि त्या प्रत्येक villa ला परिवते बेच असल्यासारखा आहे ...फक्त aerial view मधून त्याची उत्तम कल्पना येऊ शकते ..जुमेरा रोड ते पाल्म जुमेरा आणि अटलांटिस हॉटेल ह्यांना जोडणारी मोनोरेल आहे जी गल्फ मधली सगळ्यात पहिली मोनोरेल ... ह्या मोनोरेल ने आम्ही अटलांटिस हॉटेल पर्यंत प्रवास केला...ह्या मोनोरेल ने पाल्म जुमेराच वैभव पाहत प्रवास करणे हे शब्दातीतच ...कुठल्याही क्षणी आपण गल्फच्या वाळवंटात आहोत ही जाणीव मनाला स्पर्श करूनदेत नाही....खरंच ह्या अरबांची कमाल वाटते...पैसा आहे हे मान्य पण त्या पैशांच्या जोरावर वेगळीच दुनिया उभारणं ह्या साठी प्रचंड इच्छाशक्ती लागते ... ह्यांच्या हातात असतं तर वातावरणावर ही ताबा मळवून कायम pleasant temperature maintain केलं असतं... ह्या पाल्म अटलांटिस ला आम्हाला यायचंच आहे परवा aquaventure मध्ये दिवस घालवायला पण तेव्हा रोड मार्गे...म्हणून आज ही मोनोरेल ची सफर....
क्रमशः