Sunday, 8 May 2022

कबुतरं

कबुतर हा घाणेरडा पक्षी आहे ह्याबाबत दुमत नसावं पण ते बिनडोक ही आहे हे मी माझ्या अथक निरिक्षिणातून काढलेले अनुमान आहे. तर प्रयोग आणि कृती खालील प्रमाणे :

 फक्त रेलिंग च्या वर ...खाली रेलिंग मधून कबुतरं आत येतातच आणि ती आली की अस्मादिक त्यांना हाकलयला तयारच. त्या रेलिंग मधून sunbird, मैना, बुलबुल असे ही पक्षी येतात पण त्यांचे फोटो काढायला 📸 आणि कबुतरं आली की 🧹आपसूकच हातात घेतला जातो ...कारण कबुतर हा पक्षी जात्याच घाणेरडा .... घरात आला की पहिले काम विष्ठा करायचं आणि दुसरं घरटी करायला जागा शोधायचं!!!! 

तर कबुतरांना हाकलताना असं जाणवलं की ती सरबरून जातात...कुठून आत आली त्यांच्या लक्षातच येत नाही... मुर्खासारखे जाळी वर काय जाऊन बसतात ....फडफड करत बसतात....एकंदरीत च त्यांचा 'brain fade' होत असावा....पण त्या दिवशी सातभाई घरात आला. रेलिंगवर निवांत बसला. आणि छानशी Pose देऊन 
त्याने फोटो ही काढून घेतला….अजून जवळ जाव म्हटलं तर अजिबात पॅनिक न होता तो गॅलरीच्या दुसऱ्या टोकाला गेला....बाहेर जायला जागा कुठून आहे बघितलं आणि पसार ही झाला...मग हेच निरीक्षण मी बाकी पक्ष्यांबाबत हे केलं आणि जाणवलं की ते ही शांत पणे विचार करून बाहेर पडतात पण हेच बेणं (पक्षी : कबुतर) सरबरित होऊन कुठे अडकलो आणि कसं बाहेर पडणार असा जिवाच्या आकांताने फडफडाट करत राहतात!!!

अनुमान आणि सिद्धता :

तर अशा ह्या आपसूक घडलेल्या प्रयोगांती काढलेले अनुमान असे की कबुतर हे बिनडोक आहे. कदाचित ह्यात त्याच्या पूर्वासुरींवर नेहरूंनी जीवापाड केलेल्या प्रेमाचा परिणाम असावा. नाहीतरी हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी बोट तिथेच दाखवायची प्रथा आहे.

मग प्रश्न हा पडतो की मैने प्यार किया मध्ये बडजात्यानी कबुतराला येवढं हुशार कसं दाखवलं... तो मोहनीश बहल कधी काळी त्याच्या वर चाप ओढणार असतो ते आठवत त्याला आणि ते त्याचा जीव घेत अरे पण वास्तविक आयुष्यात त्याचा गझनी असतो ... 5 मिनिटांपूर्वी आपण आत कसे आलेलो हे त्याला आठवत नाही....तर I blame bollywood....bollywood ही काँग्रेसच्या धोरणांच उदात्तीकरण करत आलीय (संदर्भ : शोले मधला रहमान चाचा, पुजाऱ्यांची/साधूंची खलनायकी प्रतिमा, दीवार मधला 786 नंबर वगैरे) तर म्हणूनच 90 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या ह्या सिनेमात कबुतराला नायक केले आहे हे ही जाता जाता सिद्ध होतं.