ना. स. इनामदारांची शहेनशाह वाचत असताना आग्र्याहून सुटका हा प्रसंग आला आणि आग्र्याहून सुटका होवोस्तोवर विचारांना बरेच खाद्य मिळाले. ऐतिहासिक कादंबरी खुलवण्यात त्यांचा हातखंडा आहेच त्या विषयी काही दुमत नाही.... वाचताना विचारचक्र चालू होण्याचे प्रसंग अनेकदा आले पण त्याची उत्तरे पुढे जाताना मिळत गेली किंवा स्वतःला तर्कसंगती लावता आली पण इथे मात्र कोडं न सुटल्यात जमा आहे... कारण तसा काही दस्तऐवजच नाही किंवा माझ्या वाचनात आला नाही आणि अजून time machine हा फक्त fantacy चा भाग असल्याने इतिहासात जाऊन शोधून काढू शकत नाही :)
तर महत्वाचा मुद्दा की शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले म्हणजे पेटाऱ्यान्मधून पळाले हे खरोखरच घडले की ही निव्वळ दंतकथा आहे आणि आग्र्याहून सुटका औरंगझेबाने होऊ दिली (अप्रत्यक्षपणे) की मिर्झाराजे जयसिंघ ह्यांच्या मुत्सद्देगिरीचा परिणाम आहे ..... कारण औरंगझेबाच्या कैदेतून पळून जाणे हि वाटते तेव्हढी आणि जितक्या सहज इतिहासाने सांगितली तेव्हढी सोपी गोष्ट नाही.....
औरंगझेब हा बाकी कसा ही असला तरी मुरलेला राजकारणी आणि हल्लीच्या भाषेत सांगायचे तर एकदम shrewed होता हे मान्य करावेच लागेल....त्याशिवाय दारा शुकोह आणि बाकीच्या 2 भावाचा बिमोड करून तख्त वर बसला होता आणि खास करून दारा शुकोहचे दिल्लीवर वर्चस्व असून आणि राजपुतांची साथ असून ही त्याचा त्याने व्यवस्थित बिमोड केला होता ....आणि औरंगझेब किती पाषाणहृदयी होता मी सांगण्याची काही वेगळी गरज नाही .तख्तावर बसण्यासाठी आणि ते राखण्यासाठी तो काही ही करू शकत होता........एवढा सगळं असून ही महाराज त्याच्या हातावर तुरी देऊन सटकले असे म्हणणे म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा होईल कदाचित कारण त्याला जाणीव होती की त्याच्या तख्ताला राहता राहिला धोका फक्त दक्खनच्या बगावतखोर जमीनदार सिवा (म्हणजे शिवाजी महाराज) कडून आहे आणि ताक ही फुंकून पिणाऱ्या माणसाकडून दुधाचे भांडे सरळ तोंडाला लावले जाईल ह्यावर थोडा विश्वास बसने कठीण होतेय
मुळात शिवाजी महाराज आग्र्याला मिर्झा राजा जयसिंघाने जवाबदारी घेतल्याने औरंझेबाला भेटण्यास आले होते ... औरंझेबानेही त्यास परवानगी दिली ती निव्वळ मिर्झा राजांनी एवढी मोठी कामगिरी बजावली (जी शाहिस्तेखान आणि औरंझेबाचे इतर मनसबदार ह्यांना जमले नाही) तर त्यांना कसे दुखावणार आणि त्या निमित्ताने शिवाजी महाराज दक्खन मधून बाहेर पडतील आणि जमल्यास काही दगा फटका करू हा विचार ....
मग ती दरबारातील ऐतिहासिक घटना घडल्यावर औरंझेबाने राजांना दरबारात येण्यास मनाई केली आणि त्यांना जवळ जवळ नझरकैदेत टाकले ....मग तिथूनच त्यांना काबूलच्या कामगिरीवर पाठवण्याचा त्याचा हेतू होता ....म्हणजे तिथून परत आले नाही आले तरी तिथपर्यंत निर्नायकी परिस्थितीमुळे दक्खन मधल्या मराठ्यांना काबूत आणता येईल....
पण महाराज काही न काही कारण काढून जाणे टाळत राहिले आणि औरंगझेब कधी नव्हे ते त्यांचे बहाणे ऐकत राहिला....का???... त्यानंतर ही शिवाजी महाराज मुत्सद्देगिरीचा डाव मांडत राहिले कि मी घाबरलोय आणि मला दक्खन ला जाऊ द्यावे...तिथे राहून मी तुमची चाकरी करेन किंवा माझ्या ताब्यातले अजून गड मी द्यायला तयार आहे पण मला तिथे जाऊन ते हस्तांतरीत करावे लागतील वगैरे वगैरे पण औरंगझेब हे सगळे ओळखून होता कारण अशाच प्रकारचा काहीसा डाव ते शाहीस्तेखानाबरोबर खेळले होते आणि त्याला गाफील ठेऊन म हल्ला केला होता....आणि हे न ओळखायला औरंझेब काही शाहिस्तेखान नव्हता.... मग तो राजांच्या वेळखाऊ धोरणाला का बळी पडत होता किंवा तसे का दाखवत होता???
एकंदर पाहता, राजे नझर कैदेत होते म्हणजे मिर्झा राजा जयसिंगचा मुलगा रामसिंग ह्याचा महालात होते आणी तिथे रामसिंगचा पहार होता आणी राजांची आग्र्यात असतानाची सर्व जवाबदारी रामसिंग ने घेतली होती .. काही दिवसांनी औरंगझेबाने फुलोद्खानाचाही पहारा बसवला आणी ही संधी साधून महाराजांनी रामसिंगला औरंगझेबकडे शब्द टाकून त्याने घेतलेल्या राजांच्या जवाबदारीतून मुक्त व्हायला सांगितले ..... रामसिंगने ही तसा अर्ज केला आणि औरंगझेबाने तो मान्य केला आणि असा अर्ज मान्य करण्यापूर्वी त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली नसेल??... रामसिंगला मुक्त करून तो महाराजांच्या सुटकेची वाटतर मोकळी करत नव्हता?? ...बरं फुलोद्खानाचाही पहारा त्याने का बसवला तर महाराजांच्या जीवाला आग्र्यात त्याच्याच पदरच्या शाहिस्तेखानच्या जवळच्या लोकांकडून धोका आहे हे तो जाणून होता आणि ते संकट त्यांच्यावर येऊ नये म्हणून औरंग्याने ही खबरदारी घेतली होती .........रामसिंग शी संधान साधून महाराज सुटू शकले असते पण फुलोद्खानाच्या पहार्य्तून हि निसटले आणि ते हि पेटाऱ्यातून???
एक वेळ महाराज कैदेतून हुलकावणी देऊन सुटून गेले हे मान्य केले तरी १४००-१५०० किमीच्या प्रवास ही निर्धोक पार पडला ते ही गुजरात पर्यंत मुघली सत्ता असताना??.... त्याचे हेर खाते एकदम जबरदस्त असताना आणि विशेष असा पहाडी मुलुख नसताना ही ते दरमजल करत दक्खनला पोहोचले??? वेशभूषा बदलून आणि संन्यासी बिन्यासीच्या रुपात ते होते असा म्हटलं तरी असा अंदाज आहे कि त्याच्या हेरांनी संन्यासी , फकीर वगैरे कोणाला ही सोडले नव्हते ....सगळ्यांची झाडाझडती घेतली होती ....तरी ही सुटले????
हे प्रश्न पडण्याच कारण म्हणजे वाचताना जाणवतं की ना. स. अडून अडून सुचवत आहेत की महाराजांच्या सुटकेमागे अप्रत्यक्षपणे औरंगझेबाचाच हात आहे .... आणि त्याचा वैचारिक सल्लागार नंतर त्याला विचारतो ही की जनतेला वाटतेय शिवाजीला तूच सुटू दिलाय कैदेतून पण औरंगझेब ह्या प्रश्नाच उत्तर टाळताना दाखवलाय ... कदाचित इतिहासात असे काही पुरावे नसल्याने लेखकाने हा विषय फार नाही वाढवलाय ..... पण .... पण आपल्या डोक्यात मात्र विचारांचा भुंगा भुणभुण करायला लागला आणि औरंगझेबाने त्यांना जाऊ देण्यामागे काय कारण असू शकेल किंवा माझ्या बुद्धीला काय वाटले ते सांगण्यासाठी म्हणून हा लेखप्रपंच
तर कारण म्हणजे मिर्झा राजा जयसिंघ हे ..... मिर्झा राजा जयसिंघने स्वताच्या जवाबदारी वर महाराजांना आग्र्यास पाठवले होते ....आणि औरंगझेबाच्या दरबारी असणाऱ्या राजपुतांमध्ये जयसिंघचे बर्यापैकी प्रस्थ होते....म्हणजे मिर्झा राजांना नाराज करून बाकीच्या राजपुतांची गैरमर्जी ओढवून घेण्याचा संभाव्य धोका त्याने ओळखला होता...तसेच जर मिर्झाराजांला दिलेला शब्द पाळला नाही व त्यामुळे मिर्झा राजा रागावला असता आणि त्याने त्यामुळे आदिलशाही आणि कुतुबशाही आणि मराठे ह्यांची मोट बांधण्याचा संभाव्य धोका होता ज्यामुळे हिंदुस्तानभर राजवटीचे स्वप्न लयास गेले असते आणि परत दरबारातले इतर राजपूत ही मिर्झा राजास जाऊन मिळू शकले असते आणि हातचा राजपुताना ही जाऊ शकला असता.... तसेच हिंदुस्थानभर सत्ता स्थापन करण्याचे त्याचे स्वप्न धुळीस मिळू शकले असते
आणि ह्या तर्कास पुष्टी मिळते म्हणजे शिवाजी राजांसारख्या शत्रूस (ज्यांच्य्मुळे औरंगझेबास दिल्लीच्याही तख्तास धोका वाटत होता) जेरबंद करून पाठवल्याबद्दल आणि २३ किल्ले जिंकल्यानंतर (जे त्याच्या नामांकित मनसबदारानाहॆ जमले नाही) वास्तविक मिर्झा राजांना त्याने कुठे ठेऊ न कुठे नको असे म्हणत डोक्यावर घेऊन नाचावयास हवे होते पण तसे न होता त्याने त्यांना बाजूला करत काबुलच्या मोहिमेवर पाठवले आणि बुऱ्हाणपूरच्या छावणीत विषप्रयोग करून काटाकाढला म्हणजे कोणालाच काही संशय नको.... आणि परत रामसिंघास हि मामुली सजा देऊन मोकळे केले ...वास्तविक त्याचा स्वभाव पाहता रामसिंघास त्याने जिवंतच सोडावयास नको होते ....
हेच जर शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटी च्या वेळेस मिर्झा राजा ही आग्र्यास उपस्थित असता तर कदाचित शिवाजी महाराज सुटणे कठीण होते कारण मिर्झा राजा त्याच्या टप्प्यात असले असते आणि त्यांना काबूत ठेवणे त्यास शक्य झाले असते ....
आपल्यास इतिहासाच्या पाठ्य पुस्तक आणि तत्सम साहित्य किंवा मालिका, चित्रपट ह्यांनी आग्र्याहून सुटका पेटाऱ्यातूनच झाली हे असे बिम्बवलेय की आपण बाकी कसल्या गोष्टींचा म्हणजे शक्यता-अशक्यता , धोके वगैरे गोष्टींचा दुरान्वये ही विचार करत नाही ....हा लेख वाचून तुमच्या मनात विचारांचा भुंगा भुण भुण करायला लागला असल्यास ते माझ्या लेखाचे यश च म्हणावे लागेल :)
विशेष सूचना :- हा लेख पुढे कोणास पाठवू नये कारण हा कोन जहाल आणि संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यान्सारख्या विचारवंत व्यक्तीच्या वाचनास आला आणि त्यास माझे विचार न पटल्यास ते माझ्या घराचे नुकसान करू शकतील :)
आणि हो
शिवाजी महाराज हे माझे दैवतच आहेत आणि त्यांना ह्या लेखातून त्यांचे थोरपण कमी करण्याचा अजिबात प्रयत्न नसून फक्त माझ्या सध्या रिकाम्या डोक्यात आलेले विचार कागदावर उतरवण्याचा आणि जमल्यास सम विचारी लोकांमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न आहे ....

तुझ्या रिकाम्या डोक्यात आलेले विचार तुझ्याच डोक्यात राहू दे
ReplyDelete