थोडा है थोडे की जरुरत है
जिंदगी फिर भी यहां खूबसूरत है
ऐकायला खूप छान वाटतं पण मानवी प्रवृत्ती ह्याच्या अगदी विरुद्ध असते, जरा काही कमी असलेलं चालत नाही. भारतीय क्रिकेटमधली तज्ज्ञ मंडळी तरी सध्या हे अनुभवत आहेत. आणि हे जरूरत असलेलं थोडं त्यांना डोंगऱ्याएवढ्या दुःखाइतकं भासतंय पण डोंगराएवढे सुख त्यांना जवाइतकं हे वाटत नाहीये. पण खरं पाहता त्या सुखामुळे क्रिकेट परत खूबसूरत वाटतंय. तर जरुरत असलेलं थोडं म्हणजे रहाणेचं सध्याचं अपयश. कारण ही तसेच आहे म्हणा, रहाणे हा भारतातील मध्यम वर्गाला सध्याच्या भारतीय संघातला जवळचा वाटणारा खेळाडू आहे (ह्याची कारणीमिमांसा मी करत नाही, ज्याने त्याने आपल्या वाकुबी प्रमाणे ह्याचा अर्थ समजून घ्यावा). रहाणेचं अपयश त्यांना खुपतंय स्वतः रहाणेपेक्षा ही कदाचित जास्त. विराट, पुजारा , विजय , धवन हे एवढे अफलातून खेळत आहेत पण ह्यांना चिंता लागून राहिलीय ती रहाणेच्या अपयशाची. त्यामुळेच सर्व मीडियामध्ये (इलेक्ट्रॉनिक म्हणा प्रिंट म्हणा किंवा सोशल म्हणा) सगळीकडे चर्चा आहे ती रहाणेच्या अपयशाची आणि त्यापेक्षाही त्याला डिफेन्ड करायची!! वर्तमानपत्रांचे, वेब साईटसचे रकाने आणि facebook वरचे uploads हेच सांगतायत की आफ्रिकेत रहाणे किती गरजेचा आहे?
पण मुळात हा प्रश्न आहे की रहाणेला येवढं डिफेन्ड करायची गरज का लागतेय आणि कोणापुढे डिफेन्ड करायचंय? निवडसमितीकडे की कर्णधार आणि प्रशिक्षकांकडे की फक्त आत्मसमाधानासाठी? निवडसमिती म्हणाल तर कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या शब्दाबाहेर नाही. कर्णधाराचा तर त्याला किती पाठिंबा आहे हे त्याने करुण नायरच्या त्रिशतकानंतरही त्याला डच्चू देऊन रहाणेला संघात जागा देऊन दाखवून दिले होते. तो संघाचा उपकर्णधारही आहे. हे सगळे असताना त्याला काढण्याची भीती का? बरं प्रेक्षक/रसिक कोणाकडून ही राहणेला काढा अशी मागणी होत नाही मग ही सगळी आकडेवारी आणि हे समर्थनाचे लेख का?
दुसरा प्रश्न असा की धवन, विजय अन राहुल हे चांगली कामगिरी करत आहेत. त्यातला धवन वगळता बाकीचे दोघं व्यायवस्थित तंत्र असलेले फलंदाज आहेत जे कुठल्याही खेळपट्टीवर उभे राहू शकतात, पुजारा ज्याला 'वॉल'च बिरुद चिटकवलं गेलंय तो द्रविडप्रमाणेच सातत्यपूर्ण कामगिरी करतोय आणि खुद्द विराट ज्याने सचिनची जागा कधी भरून काढली हे कळलं देखील नाही, तो दृष्ट लागावी अशी कामगिरी करत असताना, ते आफ्रिकेत अपयशी ठरतील अशी भीती का? की ते अपयशी ठरावेत ही सुप्त भावना आहे?
आणि ह्या सगळ्यात आपण विराटवर अन्याय करतोय ही जरा ही भावना नाही का? एवढे तो विक्रमांवर विक्रम रचतोय, वामनाप्रमाणे दोन पावलात त्याने सचिनचे विक्रम जवळजवळ पादाक्रांत केलेत त्याची दखल नाही (का हेच जास्ती दुखतंय). त्याची फलंदाजी बघत राहावी अश्या खेळी करतोय पण त्याविषयी कौतुकाचे चुकून माकून एकाद दुसरे शब्द. बरं ते ही मुक्तकंठाने नाहीत. त्यात ही इंग्लंड, न्यूजीलँड, आफ्रिकेत खेळू देत मग त्याच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब होईल वगैरे वगैरे. काय तथ्य आहे त्यात? पॉन्टिंग भारतात यशस्वी नव्हता म्हणून तो उत्कृष्ट फलंदाज नाही? कोहलीला तशी अन्यायाची सवय आहेच म्हणा. त्याच्या पदार्पणापासूनच त्याला सचिन सारखं सहज स्वीकारलं गेलं नाहीच. कधी त्याच्या आक्रमक वृत्तीवर कधी अनुष्काला दिलेल्या फ्लायिंग किस वरून तर अगदी ताजं म्हणजे कुंबळे वादावरून त्याला नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय. एवढे बोल तर तारे जमीन पर मध्ये ईशानच्या बापाने ईशानला हे लावले नसतील. भारतीय मानसिकतेला दुसऱ्याने वागण्यात दाखवलेली आक्रमकता आवडते पण आपण आक्रमकता दाखवली की पोटात दुखतं. ऑस्ट्रेलिया , पाकिस्तानी खेळाडूंच्या आक्रमक वागणं,स्लेजिंग आवडतं पण तेच आपल्या खेळाडूने केलं की कशाला हवंय, आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावं, आपल्या खेळाने प्रत्युत्तर द्यावं वगैरे शेलक्या प्रतिक्रिया तयार. अरे पण का ऐकून घ्यावं समोरच्याचं?? किंवा समोरच्याला त्याचाच डोस व्याजासकट परत दिल्यास काय बिघडतं? कोहली हे सगळं करतोच आणि यशस्वीही होतो हे आपल्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे म्हणून कदाचित खुपत असावा. कुंबळे प्रकरणात ही चूक नक्की कोणाची होती हे काही समोर नाही आलं किंबहुना विराटने स्वतःची बाजू मांडलीच नाही पण कुंबळेच्या धीरगंभीर, सद्गृहस्थ ह्या प्रतिमेमुळे सहानुभूती सगळी त्यालाच. कुंबळे चुकू शकत नाही? पण आपल्या मालिकांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे मॉडर्न कपडे घालणाऱ्या स्त्रिया कुटील, कारस्थानी आणि साडीतल्या सोज्ज्वळ , त्याप्रमाणे फ्लॅशी राहणारा/वागणारा विराट चूक. (ह्या मालिका बघणं सोडलं पाहिजे). हर्षा भोगले म्हणतो त्याप्रमाणे कोहली खरंच 'फेरोशीअस' (Michael Atherton used the word "ferocity" to describe the Aussies. It is a word that goes well with Kohli too. It is a state of mind where you are constantly attacking the opponent and not conceding that inch.- हर्षा भोगले) अत्ता अत्ता पर्यंत आपण ऑस्ट्रलियन क्रिकेटचं उदाहरण द्यायचो आणि आता तशाच पद्धतीने विराट खेळतोय तर लागलं पोटात दुखायला?
वास्तविक पाहता कंमिटमेण्टच्या बाबतीत विराटचा हात धरणारा कोणीही नाही (कदाचित राहणेही नाही). टेम्पेरामेन्टची तुलना सचिनशीच होऊ शकेल कदाचित!!! (सहसा कोहली एकाच चुकीची पुनरावृत्ती करत नाही). फिटनेस म्हणाल तर आजच्या घडीला फिट क्रिकेट विश्वात अजून कोणी असेल असे वाटत नाही. त्याच्या अंगावर चरबीचा 'च' ही दिसत नाही एवढेच नव्हे तर फिटनेस बाबतीत जागरूकता आणण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे म्हटल्यास वावगे ठरू नये. एवढा सगळं असताना फक्त आणि फक्त तो आक्रमक आहे किंवा एक्सप्रेससिव्ह म्हणून त्याला नावडतीचे नजरेने बघत राहण्यात काय अर्थ आहे? सहसा आपला तो बाब्या दुसऱ्याचंते कार्ट असा प्रकार असतो (आमच्या घरी वगळता :)), आपण कोहलीला आपला समजलोच नाही. मजरूह सुल्तानपुरींनी म्हटल्याप्रमाणे नेहमीच 'सदा तुमने ऐब देखा, हुनर तो ना देखा'. आजच्या घडीला जगातल्या सर्वोत्तम फलंदाजाच्या त्याची तुलना होते. शॉर्ट फॉरमॅट मधला तर तो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेच पण कसोटी क्रिकेट मध्ये ही तो त्याच मार्गाने चाललाय, चाललाय म्हणण्यापेक्षा धावतोय. त्याचे कर्तृत्व खरं पाहता त्याच्या खेळातूनच स्पष्ट होतंय (जसं आपल्या लोकांना हवं तसं, बॅट बोलतेय) पण ते स्वीकारण्याची आपली तयारी आहे का?
राहणे विषयी माझ्या मनात आकस नाही किंबहुना तो मुंबईचा म्हणून असलाच तर एक सॉफ्ट कॉर्नरच आहे पण उद्या चुकून कोहली अपयशी ठरलाच (तो ठरणार नाहीच हा ठाम विश्वास आहे तरी एक शक्यता म्हणून) तर ही तज्ज्ञ मंडळी विराटच्या किती पाठी उभी राहतील? मला राग आहे ह्या दुटप्पी वागणुकीचा आणि टिपिकल मानसिकतेचा बाकी काही नाही! तसं ही कोंबडं झाकलं म्हणून उगवायचं राहत नाही.