मध्यंतरी हृदयगंधर्व हे पुस्तक वाचताना त्यातील स्वरोत्सव ह्या डॉक्टर लीना आगाशे ह्यांच्या लेखात, पंडितजींच्या एका वाक्याचा संदर्भ येतो, की त्यांना तिन्हीसांजा हे गाणं करताना त्यांना यमन राग पिवळसर रंगासारखा दिसू लागला होता. प्रत्येक राग हा कुठल्याही रंगात, कुठल्यातरी विशिष्ट रूपात त्यांना दिसतो.
त्यांचं हे बोलणं ऐकून लेखिकेने स्वतःचा ह्या वाक्याशी संबंधित एक अनुभव मांडलाय.
'तिन्हीसांज ही माझी आवडती कविता आहे. आता त्या कवितेबरोबरच एक चित्र हि माझ्या मनात वास्तव्याला आलं. दिवस ढळलेला असावा. दूर क्षितिजावर संध्यकाळ मावळात असावी. दूर कुठेतरी डोंगरांच्या रांगा एकमेकांमध्ये मिसळून गेलेल्या असाव्यात. मावळतीचा सूर्य बुडायला आलेला असावा. नदीसुद्धा एखाद्या नि:शब्द रेषेसारखी भासावी. हळूहळू श्वास घेणाऱ्या सावल्यांसारखी संध्याकाळ पसरत जावी, संपणाऱ्या दिवसाची जाणीव करून देत! नित्याची सगळी हालचाल थांबलेली असावी. एक अबोल, आर्त शांतता जाणवत असावी, इतकी की घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या रागांनीसुद्धा ती शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घेतलेली असावी. हे चित्र आणि यमन रागाचं सोनेरी रूप माझ्या अंत:श्चक्षूंसमोर कायमचं कोरलं गेलं आहे.'
हे वर्णन वाचलं मात्र आणि कान्हाला अनुभवलेली अशीच एक संध्याकाळ माझ्या नजरेसमोर साकारायला लागली. सकाळी आम्ही जंगल सफारी केली होती, व्याघ्रदर्शन काही झाले नव्हते...दुपारची आम्ही सफारी नव्हती घेतली पण आम्ही 'नेचर ट्रेक' करून आलेलो.दिनकर नुकताच मावळलेला, रिसॉर्टच्या बाजूने शांत वाहत असलेल्या नदीच्या किनारी खुर्च्या टाकलेल्या आणि वाघ न दिसल्याची रुखरुख आणि दुसऱ्या दिवशीच्या सफरीत वाघ दिसेल की नाही ह्या विवंचनेत किंवा दिसावाच ही अपेक्षा. आधीची निराशा आणि उद्याची अपेक्षा व त्या अपेक्षांचं दडपण, अशी काहीशी मिश्र मनस्थिती आणि त्याला काहीसे साजेसे समोरचे वातावरण. जरी ती संध्याकाळ 'कॅमेरा' बद्ध केली असेल तरी ती शब्दबद्ध करता येत नव्हती.पण ती स्मरणात मात्र नेहमीच होती. वरील शब्दचित्र वाचलं मात्र आणि तीच संध्याकाळ अचानक स्मृतीपटलावर आली शब्दशः वर्णन केल्याप्रमाणे. आता
पुस्तकातील त्या लेखातील त्या शब्दचित्रांशी ती संध्याकाळ जोडली गेली आहे किंबहुना तिन्ही सांजा ह्या गाण्याशी ही!!!
असाच माझा एक अनुभव घन तमी शुक्र बघ राज्य करी ह्या गाण्याशी निगडीत आहे. हायवे एक सेल्फी आरपार ह्या चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि रेणुका शहाणे दोन अनोळखी व्यक्ती योगायोगाने मुंबई पुणे प्रवास एकाच टॅक्सितून करत असतात आणि जेव्हा घाटातील ट्रॅफिक स्टॅन्ड स्टील होते तेव्हा एकमेकांशी गप्पा मारत बसलेले दाखवलेत. तेव्हा गिरीश कुलकर्णी रेणुका शहाणेला गाणं म्हणायची विनंती करतो (मधल्या प्रवासात तिला गुणगुणताना ऐकलेलं असतं). तेव्हा ती हीच कविता म्हणते. त्याचे चित्रीकरण ही उत्तम केलंय. रात्रीची धीरगंभीर आणि निश्चल शांतता, दिवसभराच्या दगदगीने आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्याने आणि ते सुटण्याची काही चिन्हे नसल्याने वैतागून शेवटी पेंगुळलेले जीव आणि बॅकग्राऊंड ला हे गाणे (कविता). हा प्रसंग मस्त झालाय. छान वाटतो. पण हे गाणं घेण्यामागचे प्रयोजन मला समजले नव्हते. पण हृदयगंधर्व वाचल्यावर बऱ्याचशा गाण्यांचं/कवितेचं पंडितजींचं निरूपण वाचायला मिळालं आणि बऱ्याचशा गाण्यांचे अर्थ नव्याने कळले. आणि हे गाणं ही हायवे मध्ये का घेतलंय ह्याच उत्तर मिळालं. (ह्या गाण्याविषयी पुस्तकात फार लिहिलेलं नाही, पण पुस्तक वाचत असताना बरीचशी गाणी ऐकत गेलो आणि अर्थबोध होण्यासाठी त्यांचे lyrics ही वाचत गेलो , त्यात ह्याचे ही lyrics लक्ष देऊन वाचले)
ह्या सिनेमातल्या १५-१६ व्यक्तिरेखा अशाच एका धावपळीच्या दिवसात वेगवेगळ्या कर्णनाने मुंबई पुणे प्रवासास निघतात आपापले प्रॉब्लेम सोबत घेऊनच. कोणी गरोदर बायकोस माहेरी सोडण्यासाठी, कोणी घर शिफ्ट करून सामानासकट, कोणी आजारी वडिलांना बघायला थेट अमेरिकेवरूनच आलेला, तर कोणी प्रतारणा केलेल्या नवऱ्याला जबरदस्तीने बांधून घेऊन चाललेला तर कोणी एका सेंट्रल अभिनेत्रीस एका कार्यक्रमासाठी घेऊन चाललेलं..ह्यातला प्रत्येकाला काही ना काही विवंचना आहेतच आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्यानांचयाकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. अशा वेळी अचानक ट्रॅफिकमुळे मिळालेला स्वल्पविराम त्यांना घन तमी ह्या गाण्याप्रमाणे जीवनाकडे वेगळ्या , सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा आणि नव्याने विचार करण्याचा वाव देतो आणि त्याक्षणी हे गाणं त्या प्रसांगात किती चपखल बसलाय ह्याची जाणीव करून देतं.
आता हायवेमधला तो प्रसंग आणि घन तमी माझ्या अंत:श्चक्षूंसमोर कायमचं कोरलं गेलं आहे!
त्यांचं हे बोलणं ऐकून लेखिकेने स्वतःचा ह्या वाक्याशी संबंधित एक अनुभव मांडलाय.
'तिन्हीसांज ही माझी आवडती कविता आहे. आता त्या कवितेबरोबरच एक चित्र हि माझ्या मनात वास्तव्याला आलं. दिवस ढळलेला असावा. दूर क्षितिजावर संध्यकाळ मावळात असावी. दूर कुठेतरी डोंगरांच्या रांगा एकमेकांमध्ये मिसळून गेलेल्या असाव्यात. मावळतीचा सूर्य बुडायला आलेला असावा. नदीसुद्धा एखाद्या नि:शब्द रेषेसारखी भासावी. हळूहळू श्वास घेणाऱ्या सावल्यांसारखी संध्याकाळ पसरत जावी, संपणाऱ्या दिवसाची जाणीव करून देत! नित्याची सगळी हालचाल थांबलेली असावी. एक अबोल, आर्त शांतता जाणवत असावी, इतकी की घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या रागांनीसुद्धा ती शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घेतलेली असावी. हे चित्र आणि यमन रागाचं सोनेरी रूप माझ्या अंत:श्चक्षूंसमोर कायमचं कोरलं गेलं आहे.'
हे वर्णन वाचलं मात्र आणि कान्हाला अनुभवलेली अशीच एक संध्याकाळ माझ्या नजरेसमोर साकारायला लागली. सकाळी आम्ही जंगल सफारी केली होती, व्याघ्रदर्शन काही झाले नव्हते...दुपारची आम्ही सफारी नव्हती घेतली पण आम्ही 'नेचर ट्रेक' करून आलेलो.दिनकर नुकताच मावळलेला, रिसॉर्टच्या बाजूने शांत वाहत असलेल्या नदीच्या किनारी खुर्च्या टाकलेल्या आणि वाघ न दिसल्याची रुखरुख आणि दुसऱ्या दिवशीच्या सफरीत वाघ दिसेल की नाही ह्या विवंचनेत किंवा दिसावाच ही अपेक्षा. आधीची निराशा आणि उद्याची अपेक्षा व त्या अपेक्षांचं दडपण, अशी काहीशी मिश्र मनस्थिती आणि त्याला काहीसे साजेसे समोरचे वातावरण. जरी ती संध्याकाळ 'कॅमेरा' बद्ध केली असेल तरी ती शब्दबद्ध करता येत नव्हती.पण ती स्मरणात मात्र नेहमीच होती. वरील शब्दचित्र वाचलं मात्र आणि तीच संध्याकाळ अचानक स्मृतीपटलावर आली शब्दशः वर्णन केल्याप्रमाणे. आता
पुस्तकातील त्या लेखातील त्या शब्दचित्रांशी ती संध्याकाळ जोडली गेली आहे किंबहुना तिन्ही सांजा ह्या गाण्याशी ही!!!
हीच ती संध्याकाळ |
ह्या सिनेमातल्या १५-१६ व्यक्तिरेखा अशाच एका धावपळीच्या दिवसात वेगवेगळ्या कर्णनाने मुंबई पुणे प्रवासास निघतात आपापले प्रॉब्लेम सोबत घेऊनच. कोणी गरोदर बायकोस माहेरी सोडण्यासाठी, कोणी घर शिफ्ट करून सामानासकट, कोणी आजारी वडिलांना बघायला थेट अमेरिकेवरूनच आलेला, तर कोणी प्रतारणा केलेल्या नवऱ्याला जबरदस्तीने बांधून घेऊन चाललेला तर कोणी एका सेंट्रल अभिनेत्रीस एका कार्यक्रमासाठी घेऊन चाललेलं..ह्यातला प्रत्येकाला काही ना काही विवंचना आहेतच आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्यानांचयाकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. अशा वेळी अचानक ट्रॅफिकमुळे मिळालेला स्वल्पविराम त्यांना घन तमी ह्या गाण्याप्रमाणे जीवनाकडे वेगळ्या , सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा आणि नव्याने विचार करण्याचा वाव देतो आणि त्याक्षणी हे गाणं त्या प्रसांगात किती चपखल बसलाय ह्याची जाणीव करून देतं.
आता हायवेमधला तो प्रसंग आणि घन तमी माझ्या अंत:श्चक्षूंसमोर कायमचं कोरलं गेलं आहे!
फार छान लिहलस मकरंद दादा..
ReplyDeleteवाचताना परत तिन्ही सांजा हे गाणं कानात गुजल्यासारखं झालं.तुम्ही कादंबरी वाचा,ललित लेख वाचा पण कविता फार जास्त परिणामकारक ठरते हे अनुभवलय.
फारच सुंदर. ......
ReplyDeleteपरत वाचला.परत तिन्ही सांजा ऐकले.ही वेळ नाही.पण संगीत प्रेमाला वेळेचे बंधन असते??
ReplyDelete